Tuesday, 25 June 2013

जून २ ० १ ३ मुंबई चौफेर 

सूड 

                               समस्त मानवजातीला अचाद्णारी, करुणा व चीड ह्या दोन्हींची सांगड मांडणारी सूड हि दीर्घ कथा आहे. हि नवीन दलित साहित्यातील उर्ध्वायू म्हंटले जाणारे बाबुराव बागुल यांची दीर्घ कथा आहे. बाबुराव बागुलांच्या प्रत्येक लिखाणात भेदा भेद संपवून माणूसपण जागवण्याची जिद्द, अन्याया बद्दलची चीड, त्वेष संताप ओतप्रोत दिसतो... 
                                सूड कथेतील बाबुराव बागुलांनी उभी केलेली नाईका जानकी अशीच पेटलेली, आणि मुरळी च्या पोरीच, सतत नागवल्या जाणार्या स्त्री म्हणून असलेल, मटणाची उधारी चुकविण्यासाठी विकल गेलेलं शरीर आणि आयुष्य झुगारून टाकायला बघतेय...तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया अगदी तिच्या आई पासून सर्व स्त्रिया शरीर आहेत तो पर्यंत जगणाऱ्या किंबहुना स्वतःच्या आणि स्वतःच्या मुळीच हि  शरीरचा  लिलाव करूनच जगणाऱ्या आहेत आणि 'मुरळी च्या पोरीला कुठून आली इज्जत' ह्या वास्तवतेमुळे मुरळी हि अगदी रस्त्यात वाटेल तिथे वाटेल त्याने भोगायची वस्तू आहे, स्त्री चा जन्म मिळाला म्हणजे आपल्याला खूप मोठ्या पापाची मिळालेली शिक्षा आहे, स्त्री हि कायम वाममार्गाला नेणारी, पापिणी, वाईट वृत्तीची हि पुराण काळापासून समाजाची बनवली गेलेली, समाजाने बाळगलेली कोती मानसिकता हि नाईका देखील आईच्या उदरातून जन्म घेण्या आधीपासूनच हेच शिकून आली होती ...परंतु अमानुष, दुबळ्या, जातीव्यवस्थेने गांजलेल्या, वासनेने पछाडलेल्या ह्या राक्षसी समाजामध्ये ती संकोचित पणे जगू इच्छित नव्हती आणि आजूबाजूला तिला दिसणारी स्त्री आणि पुराणातील सतत देवांच्या दासी म्हणून आणि सत्वपरीक्षा देत शिक्षा भोगत आलेल्या, देव्या पाहून स्त्री म्हणजे वाईट हि प्रतिमा मानत साठवून ठेवलेली नाईका जानकी पुरुषी बैराग्याच वेश करून हातात त्रिशूल आणि कमंडलू घेऊन बाहेर पडते ती मोठ तप करून पुरुष बनण्यासाठी, स्त्री चा पापी जन्म झुगारण्यासाठी बाहेर पडल्यावर हि एकट्या केशवपन केलेल्या सुंदर देहाच्या बैराग्या कडे बघून अगदी तश्याच कषाय वस्त्रातील बैराग्यांपासून सामन्यांच्या हि डोळ्यात किती वाईट भावना तिला सतत पाहायला मिळतात ज्याने तिला स्वतःच्या गत आयुष्यातील जखमा ओरबाडून काढल्याचाच भास होत राहतो ज्याने ती प्रचंड अस्वस्थ होत राहते...पुरुषत्व मिळविण्यासाठी, हिमालयावर जाण्यासाठी अत्यंत निष्पाप बालाकासारख्या गुरु चा ती आधार घेते, ह्या जीवन कधी न पाहिलेल्या गुरु च्या सोबतीने राहताना ज्ञानार्जन करताना तिला सापडलेल तीच स्त्रीत्व ती स्वीकारते आणि पुरुषत्व मिळविण्याचा विचार सोडते त्रिशूल टाकून देते ..     
                                   दलित साहित्यात मोडणारी हि कथा अत्यंत वेगळी, चाकोरीबाहेरील कथा आहे, अत्यंत परिणामकारक आणि चौकट  तोडणारी कथा आहे...

पुस्तकच नाव : सूड
लेखल           : बाबुराव बागुल 
मुल्य             : ५० रु 
प्रकाशन         :लोकवांगमय गृह प्रकाशन  

Thursday, 20 June 2013

june 2013 mumbai choufer

' एक होती तार'


                                         एखाद्या महत्वाच्या निरोपासोबत पोस्टाच पाकीट भरून प्रेम, माया, जिव्हाळा, राग, आशीर्वाद, गोड गोड पापे, इतक्या भावना एका हाती आपल्या जीवलगांकडे पोहचवल्या जायच्या त्या म्हणजे पत्र किंवा तारे मार्फत... पत्र आठवतच असेल कारण ते दहावीपर्यंत तिन्ही भाषांमध्ये शिकव लागल होत आणि त्याचे हक्काचे मार्क मिळायचे...एवढाच काय तो पत्रांचा आणि आपला संबंध, आणि तार हा प्रकार तार आपल्या पैकी फारच कमी लोकांना माहित असेल, तार कशी करतात हे बघायला मिलन हा तार आपल्यासाठी अहोभाग्यम क्षण असेल..हो कारण आपल्याला कधी पाहायलाच मिळाली नाही तार म्हणजे काय ते...कारण आपल्या लहानपाणी तार आपल्या हाती फोनच येऊ लागला त्यामुळे बालगीतांमध्ये हि मामाच पत्र आणि हेलो हेलो करायला छोटासा फोन असे बोल येत होते..आणि आता मोठे झालो तर मोबाईल, मेसेज, वाटस अप अशी धडधड संपर्क साधन येउन ठेपली आणि आपला अगदी सहज संपर्क होऊ लागला अर्थातच आपल्याशी काहीही संबंध नसलेल्या, ह्या माणसांना जोडणाऱ्या, इझी टु contact जगाची प्रगती ज्या संपर्क साधनांच्या जोरावर साधली गेली, ज्या संपर्क साधनाचा जगाला जवळ करण्यात खूप मोठा वाट आहे ते म्हणजे पत्र आणि तार....जे आता इतिहास जमा झाले आहेत..
                                            तसा पत्राचा आराखडा आपल्याला माहिती आहेच, सुरवातीला सा न वि वि मध्ये भरपूर निरोप आणि प्रेम, मागण्या, सगळ सगळ आणि शेवटी मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना गोड गोड पापे..असा काहीसा पत्रांचा आराखडा असे जो अगदी रमत गमत सहा सात दिवसांनी पोहचे आणि 'पत्र आल  पत्र आल' अस अतिशय उत्साहाच वातावरण घरात तयार होई ..आणि तार मात्र अगदी त्याच्या विरुद्ध अगदी मोजक्या शब्दात महत्वाचाच निरोप देण्यासाठी, लवकरात लवकर पोहचण्याच्या दृष्टीने जास्त तिकिटे लावलेली आणि सगळ्यांना  थोडीशी चिंतेत टाकणारी...पत्र आल कि लहान थोर सगळे अगदी उत्साहाने ज्याला वाचता येई त्याच्या समोर बसून पत्र वाचून घेत आणि खूप मायेच वातावरण तयार होई...तार आली कि वाईट बातमीच आली असणार अश्या भीतीने घरातली मोठी मंडळी दडपणाखाली येत...तश्या नेहमी वाईटच नाही तर चांगल्या हि बातम्या असत तारेत..पण तार हे अतिशय महत्वपूर्ण सेवा होती...
                                              त्यावेळची पत्राची जागा मेल ने तर तारेची जागा मेसेज आणि वाटस अप ने घेतलेली दिसते कला नुसार त्यामध्ये प्रगती आणि वेग हि तेवढाच वेगात वाढला, ज्या पत्राला पोहचायला आठवडा आणि तारे ला तीन चार दिवस लागत तिथे आत्ताचा मेल आणि मेसेज सेकंदाच्या चौथ्या भागाला समोरच्या पर्यंत पोहचलेला असतो पण या एवढ्या वेगामध्ये भावनांनी भरलेली पोस्टाची तिकीट लावलेली पाकीट आणि महत्वाच म्हणजे पोस्टमन काका कायमचे हरवले...आणि पत्रे, तार इतिहासजमा झाली.... 
june 2013 mumbai choufer

जीवन फुलवणारा पाऊस  आणि जीवन उध्वस्त पाऊस 



                                    " अगदी मी म्हणत होते न तसच झाल....मी म्हंटल होत न ह्यावेळी खूपच जास्त पाऊस पडणार आहे म्हणून".... खूप मोठा गड जिंकल्याच्या तोर्यात शेजारच्या जाधव काकू त्याचं भाकीत खर ठरल्याच सांगत आल्या, त्यांच्याशी चांगलच वाकड असलेली रिया त्यांच्या तोर्याला ठेचत म्हणाली'' अहो तुम्ही पाऊस पंधरा तारखेपर्यंतच पडणार, त्यानंतर एक थेंब हि पडणार नाही अस हि म्हणाला होतात, आणि पाऊस तर पंधरा तारखेनंतरच जास्त पडतोय..'' रियाने केलेला अपमान सहन न झाल्याने काकू मात्र नाक मुरडत घरात निघून गेल्या...पाऊस मात्र खरचं ऐकायला तयार नाही हे सतत जाणवत होत आणि उन्हाळ्यात बरेच दिवस वाट पहिल्याने  दिवस रात्र कोसळणारा, रस्त्यावर संसार असलेल्या कुटुंबांच आयुष्य उध्वस्त करणारा( तसा पाऊस हे सासर उध्वस्त व्हायला जबाबदार आहे का? हा मोठा वादाचा विषय आहे) हा पाऊस देखील आपल्या स्वर्थी मनाला आनंद देऊन जातो, कारण कॉलेजपासून रेल्वे च्या ट्रक्स मध्ये, रस्त्यांवर पाणी साठत आणि त्यामुळे       आपल्याला सुट्टी मिळणार असते...आपल्याला बाईकवर भिजत फिरायला, मक्याचा बुट्टा खायचा आनंद लुटायला, भजी खायला हक्काची सुट्टी मिळणार असते,...आणि अगदी त्याच्या उलट दिवस मजुरीवर काम करणार्यांना हि सुट्टी उपवास घडवणारी असते, पावसामुळे फुटपाथ हि सोडवा लागतो मग महिन्या महिन्याच्या चिलया पिल्यांना घेऊन पाऊस थांबेपर्यंत रस्त्याच्या कडेला उभे असलेले छोटे टेम्पोमध्ये , हातगाड्यांच्या खाली, पाईपलाईनच्या कामासाठी ठेवलेले मोठे गोल पाईप असे तात्पुरते आसरे शोधावे लागतात...असे आसरे हि त्याचा मालक हकालावत नाही तोपर्यंतच ... ह्या घनघोर पावसात 'भुकेसाठी जीव पण' अशी उदाहरण ह्या दोन दिवसात पाहायला मिळाली...सकाळी टी व्ही मध्ये बघून बाहेर पदाय्च्च कि नाही ते ठरवतो...त्याच बरोबर दोन हि दिवस दादर स्टेशन बाहेर डोफा डोफा भर तुंबलेल्या पाण्यात नेहमीची, वयाची ऐंशी गाठलेली म्हातारी आजी तशीच तुटलेल्या छत्रीच फाटलेल कापड सावरत, फुल लवकर विकली जावी म्हणून लोकांना हाक मारत फुल विकत पाण्यातच बसली होती, रोज दादर ब्रिजवर उभे राहून छोट्या गृहपयोगी वस्तू विकणारे डोळे नसलेले काका हि दोन्ही दिवस दिसले..अशी रोजची रस्त्यात प्रचंड उदाहरण दिसली आणि त्यांच्या कडे बघून का कोण जाणे खूप काही विचार हि डोक्यात कालवाकालव करून गेले...हि परिस्थिती बघून का? याच कारण काय? याला जबादार कोण? हे कधी बदलणार? कस बदलणार? असे प्रश्न हि मेंदू बधिर करायला लागले पण...हे विचार तेवढ्यापुरतेच....पुन्हा हे स्वार्थी मन बुडाल वर्षासहलीच प्लान्निंग करण्यातच ...
june 2013 mumbai choufer

भविष्य 

                               दहावीच्या परीक्षेनंतर आपल्या भविष्याच काय होणार अश्या चिंतेत असलेल्या आणि भविष्याची स्वप्न बघत तरुणांना आपल पुढे छानच होणार अस कन्फर्मेशन सर्तीफिकेटच हव असत....प्रश्न पडला असेल ' ते तर प्रत्येकालाच हव असत' मग मी अस का बोलतेय?....तर त्या मागे छोटीशी गोष्ट आहे... दहावीच्या सुरुवातीला माझ्या लहान बहिणीला फ्रेश होण्यासाठी रोजचा पेपर वाचत जा असा सल्ला मी दिला...दहावीच्या सुरुवातीला दहावीच विशेष टेन्शन घेतलेलं नसल्याने बहिणाबाई नी माझा सल्ला हि काही विशेष मनावर घेतला नाही आणि काही दिवसांनी अभ्यासाला सुरुवात झाल्यापासून अचानक रोजच पेपर वाचन सुरु झाल माझ्यातली मोठी बहिण ते पाहून थोडी सुखावली...त्यानंतर आता काही दिवस बहिणाबाई रोज कॉलेज बघायला, क्लास ची चौकशी करायला बाहेर जातात रोज न चुकता पेपर वाचून जातात ..मला ते बघून समाधान वाटत होत चल हिला पेपर वाचायची चांगलीच सवय लागली...काळ अचानक फ़ोर्म भरण्यासाठी निघालेली आमची बहिणाबाई पायर्या उतरून खाली गेलेली असताना पुन्हा धावत घरात आली आणि चपळ न काढताच पेपर चालायला लागली काही तरी बघितलं स्वताशीच पेपर हातात घेऊनच नमस्कार केल्यासारखं केल आणि निघाली स्वरी धावतच ..तो प्रकार बघून मला कळेनाच ..म्हणून तिला अडवलं आणि विचारल ''काय प्रकार होता हा?'' बहिणाबाई म्हणल्या ''अग माझ भविष्य बघितल होत सकाळी, स्नेहाच राहील होत...तिची रास कुंभ आहे मी वर्षभर पेपर मधल भविष्य वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात नाही केली आणि सगळ भविष्य खर्च ठरत होत.. बघ इंग्रजीच्या पेपरला माझा दिवस खराब सांगितला होता म्हणून मला पेपर पण खराब गेला '' अस भरभर बोलून बहिणाबाई पसार झाल्या भविष्य घडवायला....मला मात्र हसू कि रडू असे झाले...शेजारच्या काकी घरातल्या सध्या सध्या समस्यांवर तोडगा काढायला कुठल्याश्या बुवा बाबाकडे जातात म्हणून त्यांना हसणारी हीच माझी बहिण गेल्या वर्षभर पेपारान्माधल्या भविष्याच्या आधारावर जगत होती....अजून एका महाशयाने भविष्यकाराने सांगितलं कि 'तुझा राहिलेला विषय ह्यावेळी सुटणारच' म्हणून अभ्यासच नाही केला ....आणि मग पुढे काय होणार आहे ते झालच....काय म्हणजे ..अहो अभ्यास नव्हता केला तर नापासच होणार ना...
                                            थोडक्यात काय अस भविष्य वैगेरे जर समजत असते आणि खरे हि होत असते तर सगळ्या डॉक्टर, उद्योजक, वैज्ञानिक अगदी सगळ्यांनीच भविष्य विद्याच शिकून घेतली असती..
जर कायम आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट विचार करून केली, प्रत्येक निर्णय विचार करून घेतला आणि स्वतःवर विश्वास ठेऊन स्वताच्या निर्णयांवर ठाम राहिलो तर का गरज लागेल आपल भविष्य कोणीतरी तिसर्यानेच ठरवण्याची...आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर आपण आपल भविष्य ठामपणे ठरवू शकतो अगदी आपल्याला हव तसं..                                                      
june 2013 mumbai choufer

अनधिकृत 

                                अनधिकृत शब्द वाचला कि प्रथम आठवते ठीक ठिकाणी वाढलेली झोपडपट्टी वाढलेली झोपडपट्टी जणू अनधिकृत हा शब्द झोपड्यांना समानार्थी शब्द असावा... पण गेल्या काही दिवसांमध्ये अगदी कंपा कोला कंपाउंड सारख्या इमारती सुद्धा अनधिकृत असल्याच्या उघडकीस आल्या...म्हणजेच झोपड्याच अनधिकृत असतात हा आपला समज चुकीचा आहे...'अनधिकृत' ह्या शब्दाची फोड केल्यास लक्षात येते कि अधिकृत नसलेले, म्हणजेच सरकारमान्य नसलेले असा ह्या शब्दाचा अर्थ होतो..प्रत्येक घर बांधताना, कोणताही व्यवसाय सुरु करताना त्याची क्षेत्रानुसार महानगर पालिकेत नोंदणी करावी लागते थोडक्यात आपण विशिष्ट व्यवसाय सुरु करतोय किंवा विशिष्ट जागेत घर बांधातोय याची सरकारला खबर करायची...आणि मुख्य म्हणजे त्याचे सरकारला पैसे भरायचे तेंव्हा ती वस्तू अधिकृत म्हणून ठरवली जाते.
                                 यावरून आता पर्यंत माध्यमांनी समोर आणलेल्या अनेक अनधिकृत गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यात अनेक नामवंत लोकांची नाव निघतात... मुख्यतः आत्तापर्यंत च्या घोटाळ्यांमध्ये सगळे नेतेच सामील होते आणि तेही अतिशय प्रमुख पदे भूषवणारे... ह्या गोष्टी उघड आलेल्या पण उघड न झालेल्या अनधिकृत उद्योग, व्यवसाय, घरे, जमिनी, यांचा तोटाच नाही, इथे खोटी प्रतिष्ठा असलेल्या लोकांची संपत्ती त्यांच्या नावांमुळे अपॉप्च दुर्लक्षित होते पण छपराच्या गरजेसाठी बांधलेली झोपडी मात्र अनधिकृतच....असे कित्येक दारू,गांजा चे अड्डे बार,क्लब, गुठ्ख्यांचे कारखाने, केमिकल, कापड, अश्या अनेक गोष्टींचे अनेक कारखाने जेंव्हा लोकांच्या पिण्याच्या पाण्यात सोडले जातात , समाज उध्वस्त करणारे असताना त्यांचे परवाने सहज रग्गड पैसा दाबून घेतले जातात आणि काही तर बिना परवाने अतिशय जोमात चालतात पण ते कधी मोडल्याच्या बातम्या येत नाहीत मध्येच एखादी ह्या ह्या नेत्याचा हा हा बार अशी बातमी येते आणि दोन च दिवसात दिसेनाशी होते... आता काळ पर्व माहीम आणि बोरीवली मध्ये इमारती ख्च्ल्याच्या आणि कोसळल्याच्या बातम्या येऊनच गेल्या असे किती तरी मोठे मोठे कंत्राटदार आहेत जे अश्या दुर्घटनांना  कारणीभूत असतात आणि ह्या लोकांचे असे अनेक अनधिकृत जीवघेणे कारभार असतात ह्या अश्या कंत्राट दारांकडे    मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. ज्या गोष्टींसाठी मान्यताच दिली नाही गेली पाहिजे त्या गोष्टी अगदी अधिकृतपाने चालू असतात. ज्वारी बाजरी सडून त्यापासून वाईन बनविली जाणार हा निर्णय किती आनंदात मोठ्ठ  मंत्रिपद भूशविणार्यां जन्सेव्कांनी सगळ्या लोकांसमोर आणि माध्यमांसमोर जाहीर केला होता आता खर सांगा हा निर्णय अधिकृत होण चुकीच आहे कि बरोबर?..अशी किती तरी उत्तम उदाहरण अधिकृतते बाबत देता येतील...
                               अनधिकृत म्हंटल कि कायम झोड्यांवर येणाऱ्या धाडी बघितल्याकी आपसूक वाटायला लागत, उच्चभ्रू सुटा कोटातल्या मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये नावाजलेल्या कापन्यांमध्ये होणार्या अनधिकृत कामांवर, अगदी सरकारमध्ये होणार्या अनधिकृत कामांपासून सरकारमान्य अनेक वाईट कामांपर्यंत कश्या धाडी वळत नाहीत? कि ह्या झोपड्यांबरोबर हि झोपड्यांमध्ये राहणारी लोकच यांच्या दृष्टीने अनधिकृत झाली आहेत...               
june 2013 mumbai choufer

डोनेशन 


                             अगदी बरोबर, अगदी तेच मी त्याच डोनेशन बद्दल बोलतेय....सध्याच्या अडमिशन च्या काळात कोणत डोनेशन आठवणार....काळा पैसा लपवण्यासाठी समाजसेवी संस्थांना दिल जाणार कि हुशार मुलाच्या अडमिशनसाठी, गरीब बापाच्या डोळ्यात आसव आणणार डोनेशन. हो अगदी आसव आणणारच,..दहावी चा जोरदार अभ्यास करणारी आपली मुलगी\ मुलगा बघितल्यावर आपला मुलगी\मुलगा आपल स्वप्न नक्कीच पूर्ण करणार, आणि पुढे जाऊन खूप मोठा होणार, नाव कमावणार अस प्रत्येक आई बापाला वाटत असतच आणि त्याला उच्च शिक्षण देण्यासाठी, त्याला कोणतीच गोष्ट कमी पडू नये म्हणून ते अगदी रात्र दिवस एक करायला तयार असतात.
                                 ज्या आई बापाने पोटाला चिमटा काढून , वयक्तिक गरजांकडे दुर्लक्ष करून मुलाच्या पुढच्या उच्च शिक्षणासाठी पैसा जमवलेला असतो, लोकांकडून मागून आणलेला पैसा असतो ते फक्त जेमतेम वर्षभराची फी देता येईल  इतकाच...त्यात आता मुलाची सोयीसुविधा असलेल्या, कायम पुढे असलेल्या  कॉलेजला जावून चांगल्या मार्कांनी पास होण्याची क्षमता असताना त्या मुलावर कायम अन्याय होतो ते फक्त त्याच्याकडे शिक्षण सम्राटांना चारायला, लाच द्यायला पैसा नसतो. तशीच दुसर्या बाजूला पूर्ण उलटी परिस्थिती दिसून येते ज्या घरांमध्ये पैसा जास्तच येत असतो त्या घरांमध्ये मात्र पहिल्या इयत्ते पासूनच डोनेशन चारून मुलांना अगदी जबरदस्ती पुढे ढकललं जात आणि त्यांची कुवत नसताना ते कोणत्याही लाईन मध्ये उभ न राहता, कोणताही फॉर्म न भरता फक्त पैस्याच्या जीवावर थेट वर्गात असतात मग पुढे हेच अगदी कॉलेज ला कधीही न येता पास हि होतात आणि बापाच्याच जागेवर बसतात आणि आपल्यापेक्षा जास्त हुशार असलेल्या आपल्याच वर्गातील मुलांवर हुकुमत गाजवत असतात..तर हा होता ह्या डोनेशन चा होणारा दुष्परिणाम आणि आपल्यासारख्या सामन्यांवर होणारा अन्याय ...
                                     अतिशय नावाजलेल्या सगळ्याच, अगदी  महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर गणल्या गेलेल्या कॉलेजेस मध्ये देखील प्राचार्यांच्या ऑफिस बाहेर मोठी लाईन असते ती थेट अडमिशन घेण्यासाठी, आणि कधी क्वचित कॉलेजमध्ये दिसणारे, फार कमी विध्यार्थ्यांना माहित असणारे प्राचार्य सुट्टीत मात्र रोज कॉलेजला हजर असतात...किंबहुना कॉलेजच नाव जितक मोठ तितक डोनेशनचा आकडा मोठा, आणि आकडा ठरवणारे शिक्षण सम्राट हि मोठे, अशी हि  शिक्षणाची परिस्थिती लक्षात येते .... हुशार मुलांच्या शिक्षणात आडव येणार आणि सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या आई बापाच्या स्वप्नांवर पाणी फिरवणार डोनेशन हे भयंकर संकट आहे...ह्या भयंकर संकटाला संपुष्टात आणण्यासाठी आपण तरुणांनीच त्याला खडा विरोध करायला हवा..
june 2013 mumbai choufer

आपण आत्मकेंदी होतोय का???

                        
                                 पावसान इंट्री काय मारली अन सगळ जीवन विस्कळीत झाल... उकडतंय म्हणून   पावसाची आतुरतेने वाट पाहणारे सगळे  चाकरमानी दोन तीन दिवसातच पावसाला शिव्या घालायला लागले....हा अनुभव आहे दोन दिवस पावसात फिरण्याचा...मी हि त्यातलीच एक....आपल कॉलेज आणि पाउस एकत्रच सुरु होतात त्यामुळे पावसाचा आनंद आणि त्रास याचा चांगलाच अनुभव आपण तीन चार महिने घेत असतो...आणि त्यामुळे आपली अनेकदा भारीच चीडचीड होते..
                                  या होणार्या त्रासावरुनच आठवलं तसा आपल्याला अनेक गोष्टींचा त्रास हा होत असतो त्यामध्ये नको त्या  छोट्या छोट्या गोस्तींचाही आपल्याला भयंकर त्रास होत असतो... कल्याण स्टेशन पर्यंत पंधरा मिनिटांचा रस्ता पार करायला जेंव्हा काल ट्रेनने पाऊण तास लावला तेंव्हा अगदी गाडीत बसून असलेल्या लोकांना सुधा नकोस झाल होत आणि तीच गत ट्रेनची वाट बघत प्लाटफॉर्मवर थांबलेल्यांची झाली होती...त्याच एवढ्या भर पावसात, माश्यांच्या ताफ्यामध्ये एक पस्तीस चाळीसीची स्त्री स्टेशन वरील प्रतीक्षालायाच्या खिडकीमध्ये मुटकुळ करून गाढ झोपली होती, अंगावर संपूर्ण ठीगळानी भरलेली,  रंग हि ओळखून येणार नाही इतकी मळलेली साडी अगदी कुठलीही पर्वा न करता झोपलेल्या त्या स्त्रीकडे बघून घरातल्या सुशिक्षित स्त्रियांनी त्यांच्या सुरक्षेसाठी काय करावे काय करू नये यावर झालेले ,प्रत्येक बालात्काराच्याप्रकारानंतर होणारे सेमिनार आठवले, चानेलपासून टपरीपर्यंत सगळ्याचा स्त्रियानविषयीचा  कळवळा आठवला......कॉलेजच्या समोरच्या फुटपाथवर गेली सहा सात वर्ष घरात रहाव तशी फुटपाथवर राहणारी कुटुंब आठवली, पाठ्ठेबाबुराव रोड, ग्रांट रोड वर कोंबून कोंबून बसवलेली वस्त्या, पावसाळ्यात पाणी घरात शिरलाय कि यांनी पाण्यातच घर बांधल्यात असा प्रश्न पडावा अश्या वस्त्या आठवल्या, कोणत्याही प्रकारची ओळख, रेशनकार्ड, चेहराच नसलेली, गेली कित्येक वर्ष वेड्यासारखी एकाच कपड्यांवर आणि अतिशय घाणेरड्या अवस्थेत रस्त्यावर फक्त फिरताना आणि वेड्यासारखं बडबडताना ज्यांना पाहिलंय ज्याच तासनतास बोलण एकलय जे अतिशय विदारक आणि भयानक होत ती सारी लोक आठवत होती...आणि प्रचंड भेडसावत , सतावत होता तो त्यांच्या जिवंत असण्याचा प्रश्न....एखादी छोटी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर चार चौघात ओळख, कुटुंब, पैसा, धेय्य असणारे आपण  मानसिक तणावात येउन आत्महत्येचा शेवटचा पर्याय निवडतो...म्हणजे कोणतीही ओळख नसताना, कोणीही तिच्या सुरक्षेसाठी झटत नसताना, जगतेय कशाला याच धेय्य  नसताना जगणारी ती प्लाटफॉर्म वरची स्त्री नक्कीच जीवन जगण्याच्या स्पर्धेची विजेती आहे.
                                         थोडक्यात काय तर, नको तेंव्हा जागा होणारा आपल्यातला समाजसेवकास  a  जे कधी माणसांमध्ये गृहीतच धरले गेले नाहीत, कायम दुर्लक्षित राहिल्यात असे हे होमलेस, परिस्थितीमुळे शेमलेस आणि फेसलेस लोक आजूबाजूला अगदी कोणताही बंड न करता जेंव्हा जगत असतात तेंव्हा आपल्याला डोळे, असतानाही ते का दिसत नाही किंवा योग्य अयोग्य ओळखण्याची समाज असताना आजूबाजूच्या अयोग्य परिस्थितीची जाणीव आपल्याला का होत नाही? आपण इतके ढिम्म का? त्यांच्या माणूस असण्याची, हक्काच्या छपराची जाणीव त्यांना कधी करून देणार ?? आपण आपल्याच आयुष्यात प्रचंड आत्मकेन्द्री होतोय का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा...