मतांसाठी काय पण..
मुंबईत लोकल ट्रेनचा प्रवास हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे ...लोकल ट्रेनच्या संबधित कोणताही मुद्दा असो, दर वाढवणे असो किंवा ट्रेनचे डब्बे वाढवणे असो ...रेल्वे सोबत होणार्या प्रत्येक घटनेचा थेट परिणाम पडत असतो तो दररोज ट्रेनने प्रवास करणाऱ्या सामन्यांवर म्हणजेच आपल्यावर...कदाचित सामन्यांसारखा प्रवास करून पाहावा ह्याच हेतू ने कि काय....राजकारणात ग्रेटच म्हणून ओळखल जाणार, त्यांच्या राजनीतीवर चक्क पुस्तक छापली गेली आहेत ,जे उत्तम जन संवादासाठी ओळखले जातात.. त्यांच्या अनेक उद्योगांमुळे त्याचं थोर मोठ्यांमध्ये खूपच नाव आहे असे....केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार.....यांनी काही मिनिटांसाठी का होइना, फर्स्ट क्लास ने चक्क रविवारी सिक्युरिटीच्या भर गर्दीत प्रवास केला.....ठाण्यातील काही प्रगती संदर्भातील कामांनिमित्त आलेले पवारसाहेब मुंब्रा ते कळवा ट्रेनने आले...काही मिनिटांचा पवार साहेबांचा हा प्रवास...सगळ्या मुंब्रा कळवा भागात गर्दी करून गेलाच आणि ..तरुणांमध्ये काहीसी छाप पडून गेला...
तसा नेत्यांचे ट्रेनचे प्रवास काही आपल्याला नवीन नाहीत या आधी हि राज्यकर्ते गांधी घराण्यातील सुपुत्र, तरुणांचे हितचिंतक, युवा नेते राहुल गांधी यांनीही असाच पश्चिमरेल्वे मार्गाने प्रवास केला होता ..ज्याची सगळीकडे भारीच हवा पसरली होती .....आणि तरुणांमध्ये हि जोरदार चर्चा होती.....तशी ट्रेनच्या प्रवासात संवाद साधण्याची सुरुवात यांचीच ......त्यानंतर ठाकरे घराण्यातील मराठी तरुणाचे नेते, मराठी तरुणाचे उद्धारकर्ते राज ठाकरे यांनीही असाच विकास कामांच्या पाहणी साठी , मध्य रेल्वे मार्गाने ट्रेनचा प्रवास केला होता......
तरुणांसंदार्भातील , सामान्यांसंदार्भातील या सर्व जनसेवकांचा जिव्हाळा पहिला कि अगदी तरुणांमध्ये जोरदार तरुण नेत्यांचे वारे वाहू लागतात....तसेही यांच्या सभा आणि भाषणे, आश्वासने, याच वाटप-त्याच वाटप, मजुरीत केलेल्या अचानक ८% ने केलेला वाढी यांमुळे आपण वेडे झालेलोच असतो....त्यानंतर च्या यांच्या अश्या दोर्यांमुळे त्याचं सामन्यांमध्ये भारीच वजन तयार होत ...या सर्व जनसेवक, हितचिंतक, जन सामन्यांच्या तारणहारांचा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा असा जनतेबद्दलचा कळवळा पहिला कि प्रश्न पडतो....यांचा विचार काय असेल नक्की??? सामन्यांच जीवन थोडे क्षण जागून पाहूया? कि बरेच वर्ष झाले ट्रेनचा प्रवास केलाच नाही चला आज करूया..., जनतेसाठी काय पण.. कि मतांसाठी काय पण????
No comments:
Post a Comment