हरवतोय आनंद पहिल्या पावसाचा ..
दोन दिवस झाले हा पाउस रोज चांगलाच बरसतो आणि सुखावूनही जातो.. लहानच काय मोठे सुद्धा त्याच्या बरसण्याचा पुरे पूर आनंद लुटतात .. हल्लीच्या कॉन्व्हेंट च्या जमान्यात हि' 'येरे येरे पावसा हे पिढ्यानु पिढ्या बोलल जाणार बडबड गीत चिमुरड्यांच्या ओठांवर शाबूत आहे त्यांच्या तोंडून ती बडबड गीत ऐकताना मला माझ्या जुन्या चिंब दिवसांची आठवण झाली कसल भयंकर वेद होत मला भिजायचं अगदी रोज शाळेतून घरी येताना, घरी आल्यावर, बाहेर जाण्याचा कोणताही चान्स मी गमवायचे नाही फक्त भिजायला मिळव म्हणून खूप भिजायचेही आणि आईचा मार हि निमुटपणे सहन करायचे... मातीचा पहिला गंध घेण्यासाठी कसली धावपळ असायची.. वह्याच्या वह्या होड्या बनून पाण्यावर तारांगायाच्या ... दोन दिवस झाले चांगला धोधो कोसळतोय पाऊस पण ह्यावेळी मात्र मला भिजावसच वाटत नाही...
हल्ली नेहमीसारखा मातीचा गंध हि येत नाही...ह्यावेळी पहिल्या पावसात भिजून आलेली चिल्लरपार्टी च्या अंगाला खाज येत होती, पुरळ हि उठली होती ..मातीच्या गंधाएवजी ह्या वेळी खूपच खराब वास येतोय, का बर व्हाव असं? पहिल्या पावसात भिजण्याच्या आनंदच अगदी कुठे तरी हरवला आहे ...पहिल्या पावसात भिजल्याने शरीरातली उष्णता कमी होते म्हणून पहिले आई नेहमी पहिल्या पावसात भिजायला सांगायची...आता पहिला पाऊस गारवा नाही तर प्रदूषित हवेतील घातक रसायन घेऊनच जमिनीवर कोसळतोय( ज्याला वैज्ञानिक भाषेत आम्लवर्षा म्हणतात)....वर्षभर वाढत्या वाहनांमुळे, वाढते कारखाने आणि रसायनयुक्त धुरामुळे, निसर्गाच्या होणार्या र्हासाकडे केलेलं दुर्लक्ष या सर्व कारणांचा परिणाम नंतर आपल्याच आनंदावर होतोय हे आपल्या लक्षात कस येत नाही...या जीवनातल्या एवढ्या मोठ्या आनंदाला आपण आपल्या काही क्षुल्लक चुकांमुळे गमावणार तर नाही ना??...चार माणसांसाठी असलेली चारचाकी जेंव्हा एका माणसासाठी रस्त्यावर धावते तेंव्हा अश्या असंख्य चारचाकिंमुळे होणार वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, आणि त्याचे आपल्यावर होणारे परिणाम आपण कस रोखणार? याचा आपण थोड्या अंतरासाठी चारचाकी मध्ये फिरताना कधीच विचार करत नाही...कारखान्यांमुळे आपल्या डोळ्यासमोर होणार प्रदूषण आपण अगदी दुर्लक्षितच करतो अगदी त्यामुळे होणारे परिणाम आपल्यावर वेगवेगळ्या मार्गाने होत असताना...आपल्या सततच्या दुर्लक्षामुळे हे आपल्या जीवावर तर बेतणार नाही न याचा विचार आपण कधी करणार???
No comments:
Post a Comment