Thursday, 20 June 2013

june 2013 mumbai choufer

अनधिकृत 

                                अनधिकृत शब्द वाचला कि प्रथम आठवते ठीक ठिकाणी वाढलेली झोपडपट्टी वाढलेली झोपडपट्टी जणू अनधिकृत हा शब्द झोपड्यांना समानार्थी शब्द असावा... पण गेल्या काही दिवसांमध्ये अगदी कंपा कोला कंपाउंड सारख्या इमारती सुद्धा अनधिकृत असल्याच्या उघडकीस आल्या...म्हणजेच झोपड्याच अनधिकृत असतात हा आपला समज चुकीचा आहे...'अनधिकृत' ह्या शब्दाची फोड केल्यास लक्षात येते कि अधिकृत नसलेले, म्हणजेच सरकारमान्य नसलेले असा ह्या शब्दाचा अर्थ होतो..प्रत्येक घर बांधताना, कोणताही व्यवसाय सुरु करताना त्याची क्षेत्रानुसार महानगर पालिकेत नोंदणी करावी लागते थोडक्यात आपण विशिष्ट व्यवसाय सुरु करतोय किंवा विशिष्ट जागेत घर बांधातोय याची सरकारला खबर करायची...आणि मुख्य म्हणजे त्याचे सरकारला पैसे भरायचे तेंव्हा ती वस्तू अधिकृत म्हणून ठरवली जाते.
                                 यावरून आता पर्यंत माध्यमांनी समोर आणलेल्या अनेक अनधिकृत गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यात अनेक नामवंत लोकांची नाव निघतात... मुख्यतः आत्तापर्यंत च्या घोटाळ्यांमध्ये सगळे नेतेच सामील होते आणि तेही अतिशय प्रमुख पदे भूषवणारे... ह्या गोष्टी उघड आलेल्या पण उघड न झालेल्या अनधिकृत उद्योग, व्यवसाय, घरे, जमिनी, यांचा तोटाच नाही, इथे खोटी प्रतिष्ठा असलेल्या लोकांची संपत्ती त्यांच्या नावांमुळे अपॉप्च दुर्लक्षित होते पण छपराच्या गरजेसाठी बांधलेली झोपडी मात्र अनधिकृतच....असे कित्येक दारू,गांजा चे अड्डे बार,क्लब, गुठ्ख्यांचे कारखाने, केमिकल, कापड, अश्या अनेक गोष्टींचे अनेक कारखाने जेंव्हा लोकांच्या पिण्याच्या पाण्यात सोडले जातात , समाज उध्वस्त करणारे असताना त्यांचे परवाने सहज रग्गड पैसा दाबून घेतले जातात आणि काही तर बिना परवाने अतिशय जोमात चालतात पण ते कधी मोडल्याच्या बातम्या येत नाहीत मध्येच एखादी ह्या ह्या नेत्याचा हा हा बार अशी बातमी येते आणि दोन च दिवसात दिसेनाशी होते... आता काळ पर्व माहीम आणि बोरीवली मध्ये इमारती ख्च्ल्याच्या आणि कोसळल्याच्या बातम्या येऊनच गेल्या असे किती तरी मोठे मोठे कंत्राटदार आहेत जे अश्या दुर्घटनांना  कारणीभूत असतात आणि ह्या लोकांचे असे अनेक अनधिकृत जीवघेणे कारभार असतात ह्या अश्या कंत्राट दारांकडे    मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. ज्या गोष्टींसाठी मान्यताच दिली नाही गेली पाहिजे त्या गोष्टी अगदी अधिकृतपाने चालू असतात. ज्वारी बाजरी सडून त्यापासून वाईन बनविली जाणार हा निर्णय किती आनंदात मोठ्ठ  मंत्रिपद भूशविणार्यां जन्सेव्कांनी सगळ्या लोकांसमोर आणि माध्यमांसमोर जाहीर केला होता आता खर सांगा हा निर्णय अधिकृत होण चुकीच आहे कि बरोबर?..अशी किती तरी उत्तम उदाहरण अधिकृतते बाबत देता येतील...
                               अनधिकृत म्हंटल कि कायम झोड्यांवर येणाऱ्या धाडी बघितल्याकी आपसूक वाटायला लागत, उच्चभ्रू सुटा कोटातल्या मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये नावाजलेल्या कापन्यांमध्ये होणार्या अनधिकृत कामांवर, अगदी सरकारमध्ये होणार्या अनधिकृत कामांपासून सरकारमान्य अनेक वाईट कामांपर्यंत कश्या धाडी वळत नाहीत? कि ह्या झोपड्यांबरोबर हि झोपड्यांमध्ये राहणारी लोकच यांच्या दृष्टीने अनधिकृत झाली आहेत...               

No comments:

Post a Comment