Thursday, 20 June 2013

may 2013 mumbai choufer

जून बालपण नवं बालपण ...

                                      हल्ली सुट्टीत घरच्यांच्या मोठ्या मैफिली बसतात....त्यात सर्व जुन्या आठवणी  त्यांनी जगलेले ते दिवस.....आई बाबा , आजी आजोबा घरातली सगळी मंडळी एकमेकांचे किस्से सांगतात ...या सर्व जुन्या पिढ्यांचं बालपण जरी थोड गरिबीत पिचलेले गेल....तरी हि त्यांना मिळालेला निसर्गच सहवास, त्यांनी खेळलेले खेळ सर्व काही अजबच.....जे आम्हालाही अनुभवायला मिळाल नाही... आईच्या सर्व गोष्टी एकूण तर फारच मजा वाटली... आई सुद्ध असा उद्गगार सहज निघाला....हि घरातली मंडळी नेहमी सांगतात त्यांच्या लहान पणी टिव्ही वैगरे काही नव्हत त्यांचा संपूर्ण दिवस हा कामातच जाई..आई सांगत होती तिच्या लहानपणी ती सूर पारंब्या म्हणजे वादाच्या झाडाला असलेल्या पारंब्या ना झोके घेत, जांभळ, आंबे चोरायला जात, जंगलांमध्ये पक्षंची घरटी शोधायला जात ... नदीवर पोहायला जात, मासे हि पकडत,  तेंव्हा पाणी हि खूपच स्वछ असे, कपडे धुवायला नदीवर जावे लागे, गुरांना चरायला घेऊन जावे लागे, म्हशींचे दुध काढवे हि लागे आणि ताजे दुध प्यायलाही मिळे ...घरात पैसा कमी आणि आणि खाणारी तोंड जास्त होती त्यामुळे सगळ्यांना च दुध विकणे,कलिंगड विकणे, भात विकणे, अशी काम करावीच लागत.. बाबा तर चक्क बारा वर्षाचेअसताना शिक्षण सोडून घरातून बाहेर पडले होते.... आज त्यांच्या कडे बघून आजिबातच वाटत नाही ...कि त्यांनी शेती केली असेल, कुडाच्या घरात राहिले असतील, पाण्यासाठी,लोकांची बोलणी एकली असतील, बाबा ,काका लोक हे सगळ जेंव्हा सांगतात तेंव्हा त्यांच्या डोळ्यात सहज पाणी येत... 
                                        त्यांच्या ह्या सगळ्या कष्टातून शून्यातून वर आलेल्या जीवना कडे पाहिलं कि स्वतःच्या आल्हाद आयुष्याची कीव वाटायला लागते....आणि त्यांच्या कष्टाच्या पण निसर्गाच्या सानिध्यातगेलेल्या बालपणाचा हेवा वाटू लागतो....स्वतःच बालपण आठून पाहिलं तर थोडे फार खेळ आम्हीही खेळलो म्हणजे लगोरी, डब्बा एस पैस, डोंगर का पाणी वैगरे...पण मलासुद्धा मासे बघायचे असतील तर मार्केट मध्ये  मेलेले नाहीतर प्रदर्शनांमध्ये चौकोनी डब्यात ठेवलेल्या मश्यांवारच समाधान मानावं लागे.....माझ बालपण तरी बर होत..निदान खुली हवा तरी खायला मिळाली, पतंग तरी उडवता आला...डोंगरामागून येणारा सूर्य तरी पाहायला मिळाला...आत्ताच्या नव्या बालपणाच काय, एक तर त्यांना खिडकीतूनच बाहेर पाहावे लागते, इमारत सोडून खाली जाताच येत नाही कारण घराखाली कोंबड्यांनी भरलेल आंगण नाही तर फक्त भोंगे वाजविणाऱ्या गाड्यांनी भरलेला रस्ता असतो...हि नवी पिढी जरी चित्रात शाळेत शिकवल्याप्रमाणे डोंगरामागून येणारा सूर्य काढतात तरी त्यंना दिसणारा सूर्य हा उंच इमारती मागून येणारा असतो आणि खुली हवतर येतच नाही त्यासाठी तेरीस्वर जावे लागते ...यांना भेटणारे पक्षी, प्राणी फक्त पुस्तकातच कारण शहरांमध्ये सध्या चिऊ ती हि उरल्या नाहीत...मोबाइल च्या रेंजमुळे...साहजिकच आहे हसण्यासाठी ते कार्टून मधेच गुंतून पडणार .हल्ली कार्टून सुद्धा मोगली सारखे निसर्गाशी मैत्री सांगणारे नसतात...या नव्या पिढीचा सगळा वेळ जतो तो स्कूल आणि वेगवेगळे क्लासेस, कारण यांना पोहायला स्वच नद्याच उरल्या नाहीत उरले आहेत ते फक्त काळे नाले...ज्यात पाण्या एवजी केमिकलच उरल आहे वाहायला, साहजिकच आहे त्यांना पोहण्यासाठी डबके च बांधावे लागणार...आणि स्वतःच्या दोस्तांशीच स्पर्धा करावी लागणार अगदी लहानपाणापासूनच....पुढे जायचं असेल तर कोणाच्या तरी डोक्यावर पाय तुला द्यावाच लागेल हेच तर आहे हल्ली स्पर्धांच शिक्षण ज्याचे क्लासेस आपण आगदी बोलता हि येत नसत मुलांना तेंव्हा पासून लावतो.... प्रगतीच्या नावाखाली जे आयुष्य त्यांच्याकडून हिरावून घेतल जातंय त्याला कोण आहे जबाबदार???  

No comments:

Post a Comment