वाया चाललेलं तारुण्य ...
तारुण्यावर अनेक कवींनी, कविता केआहेतल्या , चित्रकारांनी रंगांमधून तारुण्य दाखवील आहे, तारुण्य हा आपल्या आयुष्यातील अति महत्वाचा टप्पा मानला जातो...तरुण्यास अन्यायाविरुध्द बंद करण्याच, प्रेम करण्याच, पाय घसरण्याच, कर्तुंव दाखवण्याच, मोठ होण्याच वय म्हणतात .....तारुण्य हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं महत्वाच वळण मानल जात जे स्फूर्तीने भारलेल, तल्लख,उत्साही, क्रियाशील,आणि चाणाक्ष मानल जात....आपण अगदी विदुषी गार्गी, मैत्रेयी, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, ल संभाजी महाराज, संत द्यानेश्वर,सावित्रीबाई आणि जोत्यीबा फुले , भगत सिंग, बाबासाहेब आंबेडकर...अश्या अनेक महान लोकांच्या तारुण्यातील कथा एकतो, आपल्याला अभ्यासातही त्यांच्या आयुष्यातील घटना धड्यांमध्ये होऊन गेल्यात,..हे सर्व महान लोक त्यांच्या तारुण्यत अगदी सर्व गुणांनी सप्पन असे होते...त्यांनी त्या त्या काळात सर्व चुइकिच्य गोस्तीना विरोध केला खूप शिकली हि सगळी मंडळी, आजूबाजूच्या लीकांमध्ये आपल स्थान निर्माण केल ..... "काय लावलाय तारुण्य म्हणजे हे तारुण्य म्हणजे ते...यांनी हे केल त्यांनी ते केल...त्यांनी ते केल तर ठीक आहे न पण आम्ही काय करू मग हे सगळ आम्हाल का सांगितल जातंय"
मला माहित आहे दोस्तांनो तुमच्या ह्याच प्रतिक्रिया असतील हे अस सगळ वाचल्यावर....
'वेक अप सिड' मुव्ही पाहिलंय?? हा तोच रणबीर कपूर वाला....त्याच मुव्हीवरून आठवलं .आपण पण खूपच आळशी, झोपाळू, झालो आहोत का??, आपल्याही मेंदूला गंज लागत चाललाय का आणि हे आपल्याला माहित आहे तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय???.....मला तर हल्ली असच वाटू लागल आहे....
किती वचन केली होती आईला, हा क्लास करीन तो क्लास करीन , पुस्तक वाचीन, सगळे सेमिनार अटेण्ड करीन पण दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही पहिले पाढे पंचावन्न....आपण तर अन्याय बिन्याय दूर करण लांबच साधा घरातला कचरा लोटण्याचे हि कस्ट घेत नाही.....ह्या तारुण्याच्या मोठ्या मोठ्या कवींनी रचलेल्या कवी कल्पनांमध्ये आपण तर मोडतच नाही...तस काही मित्र करतात कविता, गाणी, वैगरे, कोण कोणते क्लासेस पण तेवढच काय तें... अस काय....कशाच्या विरुध्द आवाज वैगरे कोणीच करत नाही हल्ली छे....मग आपणच का करा...त्या सुनील ने त्या दिवशी गावाला गेला होता तिथे त्याच्या दारू पिणाऱ्या बापाला म्हणे वठणीवर आणले....आणि कुठल्याशा स्त्रियांच्या आंदोलनात सामील झाला...हा तास मी पण केलाय एकदा...आण्णा हजारेंच्या आंदोलनात दिला होता मी खारीचा वाटा...म्हणजे फेसबुक पेजवर लाईक केल होत......दोस्तांनो मला तर आता सगळा माझा पळकुटेपाणाच वाटायला लागलाय... त्या कोल्ह्याच्या गोष्टीसारख द्राक्ष हातीनही लागत म्हणून आंबट ... काहीच कस करत नाही आपण.....टि.व्ही आणि वाट'स अप, एफ बी, कॉम्पुटर ह्या सगळ्यातून डोकच निघत नाही हल्ली आपल अगदी कंटाळा येतो तरी आपण तेच तेच खेळत बसतोय...तुम्हाला नाही वाटत का अस????
काय करू शकतो आपण? मी ठरवलय आता म सगळ्या घरातल्या जुन्या वस्तू घेणार आणि घरातल्याच वापरासाठी काही नवीन बनवता येते का तें करणार...मला चांगल चित्र काढता येत...मी आता माझ्या नवीन कल्पनांच्या जोरावर समाजात मेसेज देणारे चित्र बनवेन...असे अनेक लोक आहेत जे वयाने ६० च्या पुढे पण मानाने मात्र खरे तरुण जे वंचित समाजासाठी काम करतात त्यांना भेटेन तसे हि ह्या वर्षी ४ दिवस मित्रांसोबत फिरायला जायचा प्लान होता तो पैसा इथे लावेन आणि माझा सगळ्यात मोठा, थोडा पुढचा निर्धार म्हणजे ह्या वेळी मी आई बाबांना डोनेशन भरू देणार नाही ...जिथे डोनेशन घेत नाहीत तिथेच जाईन पण बाबांचे पैसे नको तिथे वय जाऊ देणार नाही..... कस वाटल प्लानिंग..आणि हो, हे मी खरचं करणार आहे ह्या वेळेला.... तुमच काय प्लान्निंग आहे???
No comments:
Post a Comment