' एक होती तार'
एखाद्या महत्वाच्या निरोपासोबत पोस्टाच पाकीट भरून प्रेम, माया, जिव्हाळा, राग, आशीर्वाद, गोड गोड पापे, इतक्या भावना एका हाती आपल्या जीवलगांकडे पोहचवल्या जायच्या त्या म्हणजे पत्र किंवा तारे मार्फत... पत्र आठवतच असेल कारण ते दहावीपर्यंत तिन्ही भाषांमध्ये शिकव लागल होत आणि त्याचे हक्काचे मार्क मिळायचे...एवढाच काय तो पत्रांचा आणि आपला संबंध, आणि तार हा प्रकार तार आपल्या पैकी फारच कमी लोकांना माहित असेल, तार कशी करतात हे बघायला मिलन हा तार आपल्यासाठी अहोभाग्यम क्षण असेल..हो कारण आपल्याला कधी पाहायलाच मिळाली नाही तार म्हणजे काय ते...कारण आपल्या लहानपाणी तार आपल्या हाती फोनच येऊ लागला त्यामुळे बालगीतांमध्ये हि मामाच पत्र आणि हेलो हेलो करायला छोटासा फोन असे बोल येत होते..आणि आता मोठे झालो तर मोबाईल, मेसेज, वाटस अप अशी धडधड संपर्क साधन येउन ठेपली आणि आपला अगदी सहज संपर्क होऊ लागला अर्थातच आपल्याशी काहीही संबंध नसलेल्या, ह्या माणसांना जोडणाऱ्या, इझी टु contact जगाची प्रगती ज्या संपर्क साधनांच्या जोरावर साधली गेली, ज्या संपर्क साधनाचा जगाला जवळ करण्यात खूप मोठा वाट आहे ते म्हणजे पत्र आणि तार....जे आता इतिहास जमा झाले आहेत..
तसा पत्राचा आराखडा आपल्याला माहिती आहेच, सुरवातीला सा न वि वि मध्ये भरपूर निरोप आणि प्रेम, मागण्या, सगळ सगळ आणि शेवटी मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना गोड गोड पापे..असा काहीसा पत्रांचा आराखडा असे जो अगदी रमत गमत सहा सात दिवसांनी पोहचे आणि 'पत्र आल पत्र आल' अस अतिशय उत्साहाच वातावरण घरात तयार होई ..आणि तार मात्र अगदी त्याच्या विरुद्ध अगदी मोजक्या शब्दात महत्वाचाच निरोप देण्यासाठी, लवकरात लवकर पोहचण्याच्या दृष्टीने जास्त तिकिटे लावलेली आणि सगळ्यांना थोडीशी चिंतेत टाकणारी...पत्र आल कि लहान थोर सगळे अगदी उत्साहाने ज्याला वाचता येई त्याच्या समोर बसून पत्र वाचून घेत आणि खूप मायेच वातावरण तयार होई...तार आली कि वाईट बातमीच आली असणार अश्या भीतीने घरातली मोठी मंडळी दडपणाखाली येत...तश्या नेहमी वाईटच नाही तर चांगल्या हि बातम्या असत तारेत..पण तार हे अतिशय महत्वपूर्ण सेवा होती...
त्यावेळची पत्राची जागा मेल ने तर तारेची जागा मेसेज आणि वाटस अप ने घेतलेली दिसते कला नुसार त्यामध्ये प्रगती आणि वेग हि तेवढाच वेगात वाढला, ज्या पत्राला पोहचायला आठवडा आणि तारे ला तीन चार दिवस लागत तिथे आत्ताचा मेल आणि मेसेज सेकंदाच्या चौथ्या भागाला समोरच्या पर्यंत पोहचलेला असतो पण या एवढ्या वेगामध्ये भावनांनी भरलेली पोस्टाची तिकीट लावलेली पाकीट आणि महत्वाच म्हणजे पोस्टमन काका कायमचे हरवले...आणि पत्रे, तार इतिहासजमा झाली....
No comments:
Post a Comment