फिक्सिंग एक वाळवीच...
" आरे न्यूज एकली का....श्रीशांत ला आय पी एल मधून काढला .." असे सारखे मेसेज वर मेसेज....आय पी एल सध्या फोर्मात असताना ह्या खेळाडूंनी घोळ च घातला म्हणायचा....सगळ घर हल्ली सुट्टी असल्याने घरात बसून आय पी एल चा अंड लुटत असत...कमी आहेच तर आय पी एल सुरु व्हायच्या आधीच आय पी एल चा बजेट, खर्च, खेळाडूंच्या लावल्या गेलेल्या बोल्या, बदललेले युनिफॉर्म आणि त्याच्या वरचे ब्रान्ड्स, आणि मुख्य म्हणजे झाम्पिंग झापंग चे जोरदार वारे सुरु झालेच होते .....आणि तरुण वर्ग आय पी एल चा वेडा झालाच....आय पी एल चे स्टेडीअम तिथली गर्दी, लोकांच ओरडण, त्यांनी खरेदी केलेली लाईटवाली शिंग, झुझु चे मुकुट, भोंगे, टी शर्टस मलिंगाच्या केसंसारखा केसांचा विग हे सगळ पाहून आपणही तिथे जायल हव अस आपसूकच वाटायला लागत आणि आपण स्टेडीअंम च्या तिकिटांच्या चोकशी हि करतो...हि आहे आय पी एल ची धामधूमी.....
स्पॉट फिक्सिंग च्या प्रकारानंतर आय पी एल चे तोटे पुन्हा बाहेर यायला लागले....आपले खेळाडू अस काही करू शकतात ....या गहन दुखाला धरून तरुणांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जातेय.....आय पी एल सुरु व्हायच्या आधी आय पी एल मुले होणार्या पैश्याच्या उधळपट्टी चा, एकच जागी साठणार्या पैशाचा सगळीकडून चांगलाच कीस पडला गेला पण कोणी ते मनावर घेतल नाही....आणि आय पी एल व्हायची थांबली तर नाहीच किंबहुना जास्तच जोरात झाली आणि आज.... फटाकेही फुटले....अनेक जुन्या खेळाडूंनी, समीक्षकांनी या प्रकारासंधर्भात आपली नाराजी व्यक्त केली, कोणाच मत होत ' यांसारख्या खेळाडूंवर कडक कारवाई व्हायला हवी ह्या भारताच्या प्रतिमेला काळिमा फासत आहेत, यांना फक्त आय पी एल नाही तर सगळ्या च माचेस मधून काढून टाकायला पाहिजे' ...तर कोणी म्हणत होत 'आय पी एल हा एक असा बिसनेस आहे ज्यामध्ये बघणाऱ्यांची लुट आणि पैसा गुंतवनारयांची चांदी नाही सोन आहे.....तरीहि खेळाडूंनी आवघ्या करिअरच्या सुरुवातीलाच अस पाउल का उचलाव!!! क्रिकेटमधील खेळाडूंना मिळणाऱ्या गडगंज पैशाच्या किमती पाहून अनेक तरुण आणि तरुणांचे पालक ह्या क्षेत्राकडे वळताना दिसतात ......
आजच्या तीन श्रीशांत, अंकित चव्हाण, आणि अजित चंडीला ह्या भारतीय वीरांच्या एका ओव्हरला ६० लाख(सत्तेबाजाकडून ओव्हर फिक्स करण्यासाठी घेतलेल्या ) रकमा अश्या पराक्रमामुळे अनेक गोष्टी उघडकीला आल्यात एकच नाही तर एकूण तीन माच फिक्स करण्यात आल्या होत्या आणि त्यात अगदी इशार्यांनी गोष्टी फिक्स केल्या होत्या.... 'डी' कंपनीचाहि हात होता अस पोलिसांनी देखील उघडकीला आणलय.... ह्या प्रकाराच्या चर्चा रंगल्या असताना तरुणांमध्ये माच फिक्सिंग च देखील वेड निर्माण होत असल्याच हि लक्षात येतंय ...जलद रित्या पैसा कमवायचा उत्तम उपाय अस तरुणाच देखील म्हणन आहे अस आढळतंय ..म्हणजेच फिक्सिंग ची हि वाळवी फक्त क्रिकेटच नाही तर तरुणाची मानसिकता ही पोखरते आहे....या वर लवकरात लवकर तरुणांनीच उपाय करायला हवा....
No comments:
Post a Comment