मे २०१३ मुंबई चौफेर
काय असेल त्या चिमुकल्या जीवात.......
काय असेल त्या चिमुकल्या जीवात.......
“काय असेल त्या ४ वर्षाच्या चिमुकल्या शरीरात आणि निरागस जीवात कि ,बापाच्या वयाच्या माणसाची वासना जागृत व्हावी?” अगदी परवा-तेरवाची गोष्ट एका पाठोपाठ एक स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या बातम्या ‘ह्या’ अजून दुय्यमच आहेत आशी ग्वाही देत धडकल्या, आणी मेंदूवर आदळल्या मग नेहमीच्याच झालेल्या अमानुष अत्याचारांच्या बातम्यांसोबातच्या नेहमीच्या का? कशासाठी? चे शुष्क, कोरडे प्रश्नांचा झंझावात जोरदार सुरु झाला.
एकतर्फी प्रेमातून झालेल्या ऑसिड ह्ल्ल्यांच्या बातम्या नेहमीच्याच झाल्यात आहेत हल्ली... त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय तर “ती कारटीचं ‘वाया गेलेली’ असेल, “ही आज कालची प्रेमाबिमाची थेर, मग नडतात आशी”, आज कालच्या पोरी सगळ्या ‘कॅरेक्टरलेस’, 'पोरींना नुसती नाटवेगिरी करत हिंडायला पाहिजे", "बाईच्या जातीनं कसं जरा मर्यादेत राहव”, ह्या आश्या वाक्याचे तर कधी कधी आर्थच लागेनासे होतात. का ‘ती’लाचं ‘कॅरेक्टरलेस’ ही पदवी? का ‘ती’नेच सगळ्या मर्यादा पाळाव्या? का तिने कोणावर प्रेम करू नये? का ‘ती’ने मोकळा श्वास घेऊ नये, का ‘ती’ला ‘नाही’ म्हणण्याचा अधिकारच नाकारला जातोय.....
समाज काळजी पोटी बोलतोय ना मग होऊ दया ना 'ती’ला’ सबळ जगू दया स्वछंद आगदी तिला हव तसं, तुम्ही कोण ठरविणारे कि “तिला निर्णय घेता येत नाहीत म्हणून” ह्या पुरुषसत्तेनेच तिची निर्णय क्षमता खुंटवली आणि केली चाकोरीबद्ध ह्या खुंटीत मानसिकतेत कारण पुरुष सत्तेलाच नकोय ‘ती’ स्वछंद, निर्णयक्षम, ह्या पुरुष सत्तेल भीती आहे, ‘ती’च्या वरची मालकी ती झुगारेल, उत्तुंग भरारी घेईल, जाती धर्माची चौकट तोडेल, पुरुषसत्तेविरुद्ध बंड करेल, जाती धर्माची निरर्थक, जाचक बंधन ती तोडेल आणी तीचं हे माणूस बनण या ढोंगी समाजाला आणि पुरुषसत्तेलाच नकोय.
आश्या असंख्य “कळ्या” ज्यांना आजून स्वताचं आस्तित्वच माहित नाही, आशा घाणेरड्या लैंगिक अत्याचारांनी कुस्करल्या जात आहेत, कुटुंबंतर्गत बालात्कारांनी, आत्याचारांनी चिरडल्या जात आहेत. आणि फक्त यांची पुरुषसत्तेत गुंडाळलेली अब्रू, इज्जत सांभाळण्यासाठी त्यांचा आक्रोश दाबला जातोय, समाजाकडून त्या फेटाळल्या जात आहेत, हिणवल्या जात आहेत मग न्याय तर लांबचीच गोष्ट राहिली. थोडा फार आक्रोश व्हायला लागला... हा गुन्हा, ह्या बातम्या वर यायला लागल्या (तोही फक्त वर्तमान पात्रांच्या ३-४ पानावर आणि न्यूजचायनालवर शुल्लक वेळे साठी .) तरीही लोकांना सततच्या, रटाळवाण्या आणि पालकांना मुलाना बिडघावणाऱ्या वाटू लागल्या ह्या बातम्या, समाज हे ओंगाळवाण सत्य पोटात घालू पाहतायत, दुर्लक्ष करू पाहतायत .....का?
स्त्रियांच्या छेडछाडीमुळे आत्मह्त्तेचा आकडा १ हजार १६० इतका वेगाने वाढतो आहे. 'ती' दिवसेंदिवस नागवली जात आहे. स्त्रीवर झालेल्या लैंगिक आत्याचार मागे पुरुषी वासना तर असतेच, पुरुषसत्ता गाजवणे हा मुख्य हेतू आसतो. स्त्री ही प्रत्येक कुटुंबातील दुखती नस म्हणून, प्रगती करू पाहणारी गौण जातीतली स्त्री चिरडणे हा जातीव्यवस्थेतील, समाजातील, उतरंडीचा सत्ता दर्शविण्याचा आधीनियमच बनला आहे.....किव येते मग आश्या विकसनशील भारतातल्या 'सु'शीक्षित समाजाची .... जगण शोधत धावपळीत जखडलेल्या (जखडवलेल्या ) माणसातला माणूस गोठ्लेल्या (गोठवलेल्या ) चालत्या बोलत्या प्रेतांची कीव येते.... मग पुन्हा भेडसावतो गहिवरून टाकतो शुष्क, कोरडा प्रश्न काय आसेल त्या ४-६ वार्षाच्या चिमुकल्या जीवात कि बापाच्या वयाच्या माणसाची वासना जागृत व्हावी?
....मुक्ती

No comments:
Post a Comment