रागिंग........
"घुसमट होतेय माझी तिथे , मी नाही जाणार परत होस्टेलला, नका न पाठू मला तिथे, त्या मुली घाणेरड्या आहेत, त्या मला त्रास देतात .....नका न पाठू मला परत तिकडे, मला नाही राहायच्य त्या होस्टेलला.."नेहा ला पाहताच निशी घडाघडा बोलू लागली , तिचे डोळे अत्यंत त्रासलेले, थकलेले दिसत होते, निशी हुंदके देऊन रडत होती... होस्टेल वरून आल्यापासून तीन दिवस कोपर्यात फक्त तंद्री लाऊन बसलेली निशी कोणाशीच काही बोलत नव्हती. घरातले प्रचंड घाबरले होते,चांगल्या वाईट अनेक शंका घराच्याच्या मनात येउन गेल्या.. आणि त्यामागे कारण होती स्वतः निशी कारण ती काही बोलायलाच तयार नव्हती....'काय असेल ते एवढ रागिंग म्हणजे??..थोडी फार थत्त ,तव्ल्या तर करतात...एवढ काय त्यात घाबरण्यासारख!!! का हि जास्तच भयानक थट्टा तर नसेल कि जी मनावर एवढा आघात करते????"
रागिग.. म्हणजे एक प्रकारची मनाला जडलेली विकृतीच... जी मानवी मनातील वर्चस्व भावनेचा प्रत्यय देते...रागिंग म्हणजे एक प्रकारचा आसुरी आनंद आसतो जो दुसर्याला कमी लेखून मिळत असतो, आपण इतरांपेक्षा काही प्रमाणात वेगळे आहोत ,समोरच्या पेक्षा श्रेष्ट आहोत हे दाखविण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर केलेले मानसिक आघात , दुसर्याला त्रास देऊन, आनंद मिळवण्याची एक घाणेरडी प्रवृत्ती ,वाईट प्रवृत्ती.... three idiats, munnabhai M B B S ह्या कोलेजमधील आयुष्यावर बनवलेल्या चित्रपटांमध्ये रागिंग हा विषय देखील हाताळण्यात आलाय....त्या चित्रपटावरून लक्षात येत कि रागिंग किंवा एखाद्याला त्रास देण्याची वृत्ती किती विकोपाला जाऊ शकते.....आणि आताची एका अनेक कलामध्ये बक्षीस मिळवलेल्या तरुणाची आत्महत्या रागिंग ह्या विकृतीचे परिणाम किती वाईट होऊ शकतात हे लक्षात येते ..... या आधी एखाद्या परीक्षेत नापास झाल्याने केलेल्या आत्महत्या अनेक ऐकिवात येत पण रागिंग मूळे केले आत्महत्या हि कोणाच्याही मनास चटका लावणारी ठरतेय.....
रागिंग हे फक्त कोलेज मधेच चालत का ? तर नाही ऑफिसेस, अगदी घरामध्ये हि चालते रागिग ...आश्चर्य वाटल ना पण हो एखाद्याला त्याच्या मनाविरुद्ध चिडवण, नकारत्मक गोष्टी बोलून मानसिक खच्चीकरण करण, ठरवून एखाद्या व्यक्तीच्या प्रगती मध्ये आडथळा आणण, शारीरिक, मानसिक छळ कारण हे सर्व रागिंग मधेच समाविष्ट होतात....एखादा अनाथ मुलगा नातेवाईकांकडून पळून जातो त्यामागे अनेकदा हीच कारणे असतात, ऑफिसेस मध्ये देखील अस रागिंग अएका सहा कराव लागत..बॉसची हिटलरशाही हि सगळीकडे पाहायला मिळते....त्या सोबतच बढतीसाठी दिला जाणारा त्रास, होणार्या स्पर्धा हे सगळ रागिग च असत... का निर्माण झाल्या असतील रागिंग सारखे प्रकार.....सतत स्पर्धा, आणि दुसर्याचे पाय खेच्याची दुसर्याला कमी लेखण्याची, दुसर्याला त्रास देऊ आनंद मिळवण्याची असुरी वृत्ती आपल्यामध्ये वाढायला आपली विचार न करण्याची अंगवळणी पडलेली सवय तर कारणीभूत नाही ना याचा विचार हि आपण करायला हवा...आणि कृतीत बदल करून हि विकृती थांबवायला हवी नाही तर अनेक तरुणांना अश्या मानसिक विकृतीला आणि त्रासाला समोर जाव लागेल आणि देशाच भविष्य हि विकृतच जन्म घेईल...
No comments:
Post a Comment