जनसेवा कि दिखावा
२०१४ च्या निवडणुका वेशीवर येउन ठेपल्यात....आणि जनतेच्या नामधारी जनसेवकांची भंबेरी उडाली आहे.... रस्त्यांमधले दिवे, डांबरीकरण, गटारांची बांधकामे, वाचनालये,चालू नसलेली बस सेवा, या सर्वांसाठी जास्तीत जास्त शून्याचा निधी उपलब्ध करून घेतला जातो, 'आम्ही वरच्या खुर्ची धारकांच्या मागे लागून करून घेतो असे ह्या जनसेवाकांचे म्हणणे असते...'जणू जनतेसाठी काय पण' असा विचारच घेऊन आम्ही आलोय असे भासवतात...
गणेश मूर्ती शिळवायला त्रास होऊ नये म्हणून ६० अखांचा निधी उपलब्ध केला जातो, नदीच्या पुलाला लागून, सर्वात महागड्या सिमेंटचे ४ ठोकळे उभारले जातात ....आणी ४ महिन्यातच नवीन पूल बांधण्यासाठी (ज्या पुलाचा आराखडा २ वर्ष आधीच तयार केलेला आहे ) नवीनच बांधलेले ६० लाखांचे सिमेंटचे ठोकले तोडले जातात.....
डांबरीकरण केलेले ३-४ किलोमीटर चे रस्ते सुस्थितीत असताना देखील तोडले जातात कॉक्रीटीकरणासाठी .......कॉक्रीटीकरणासाठी लागणारे २-३ वर्ष लोकांच्या होणार्या गैरसोयीला काही महत्व नसते...त्याच वेळी गावातील जनतेला अत्यंत गरज असलेले आणी त्यांचे कॉक्रीटीकरण करणे सोयीचे असलेल्या अंतर्गत रस्त्यांची मात्र दुर्दशाच दुर्दशा ...
जिथे पार्श्वभाग झाकायला मळक फडक मिळत नाही त्या जनतेचा प्रतिनिधी मात्र चार वर्षात अंग झाकायला कपड्यान ऐवजी सोन वापरतो....एकीकडे पाण्याच्या थेंम्बासाठी जनता तडफडते आहे.....आणी दुसरीकडे जनसेवक पाण्याचे टंकर च्या टंकर उत्सवांसाठी स्पॉन्सर करतात......गावातल्या पोरीवर बलात्कार होतो तेंव्हा जो जनप्रतिनिधी आरोपीच्या बाजूने उभा राहतो तोच महिला सबलीकरणाची ऐक दिवसीय शिबीर भरवतो....हळदी कुंकवाच्या नावाखाली सर्व स्त्रियांना एकत्र करून स्त्रियांनी काय करायला हवे, काय करायला नको यावर बोलण्यासाठी समाज अभ्यासक बोलावतो .....धर्मांचा आधार घेऊन,आणी जातीय अस्मिताना हात घालून लढवय्या संस्कृतीच्या नावाखाली जनसेवक खैरात करतात ती हत्यारांची, तलवारींची...म्हणजेच जिथे पाण्याची गरज तिथे हे तेल ओततात....
जनसामान्यांची मानसिकता ओळखून हे पक्ष प्रमुख उभ करतात ते सामान्य जनते मधलच एखाद बुजगावण, नाहीतर परंपरागत चालत आलेले गावातले VIP प्रतिनिधी म्हणून....निवडून आलेले हे जनतेचे प्रतिनिधी मूलतः वरच्या लोकांच्या ताताखाल्च मांजर.... यांच्या हालचालींच्या दोर्याच असतात वारच्यांच हातात ....पूर्वी पोटा मिळेल ते काम करणारा, कुठेही अस्तित्व नसलेला अतिसामान्य माणुस जनप्रतिनिधी बनवला जातो .....पुढे खड्यात असलेल्या रस्त्यांवरून चार चार कोटींच्या आलिशान गाडीत फिरतो....प्रचाराच्या रालीत दिसलेला हा जनप्रतिनिधी पुन्हा दिसतो तो पुढच्या निवडणुकांची जाग आल्यावरच.....
घोडा मैदान जवळ आल्यावर जनसेवकांन आलेली ही जाग पाहून कधी कधी प्रश्न पडतात अंग झाकायला सोन्याचा वापर करून जनसेवक जनतेसाठी कापड तर वाचवत नाहीत ना ?.....भले जनतेला प्यायला पाणी मिळत नाही पण स्थानिक कंपन्यांना पाणी देण्यामागे जनसेवकांचा 'शहराची प्रगती होईल, मग कंपन्यांमुळे काळ्या पडलेल्या नद्या , कंपन्याच शुद्ध कारतील भले ती प्रगती उपभोगायला सामान्य जनताच उरली नसेल '......असा काही दूरदृष्टीकोन तर नसेल? "आमच्या गावातल्या सुधारणांसाठी आम्ही ६० लाख ह्याला, २३ कोटी त्याला, १५ कोटी पुलाला एवढा खर्च केला भले त्यातली एकाच गोष्ट अस्तित्वात आहे कारण दुसर्या दोन तोडल्या नवीन काही तरी बांधण्यासाठी" अस जन्सेवाकांना गर्वाने सांगता येईल म्हणून, किंवा "आमच्या गावातील स्त्रिया एका दिवसात सबळ झाल्या असे गोडवे गाता यावेत...सर्व तरुण हत्यार हाती घेऊन धर्मांध शिवाजी बनावेत असा काही उच्च हेतूनी तर नसतील न प्रतिनिधींनी एवढा मोठा जनसेवेचा घाट घातला....
नियम तोडून हाणामारी करणारे..कायद्याचा चुकीचा वापर करणारे....नियम धाब्यावर बसवणारे....छुपी पाकीटमारी करणारे हे जनसेवक..
ह्या एवढ्या मोठ्या सुकार्यांमध्य, 'हे जनसेवक चुकीचे कि बरोबर' अशा तर्कांमध्ये अडकलेल्या पामरांचा मात्र गोंधळ उडतो कि हि जनसेवा कि दिखावा...
No comments:
Post a Comment