Thursday, 20 June 2013

may 2013 mumbai choufer

झुगारायला हव घोडेछाप  जगण....


                                                       आई च्या पोटात असल्यापासून आपल्या डोक्यावर आघात होत असतो तो आई बाबांच्या भांडणाचा ... आई म्हणते  " माझा मुलगा इंजिनिअर होणार" " नाही तो डॉक्टरच होणार" बाबा आडवे येतात...अश्या या दोघांच्या वादात जन्माला येउन मोठे झालो तरी आपला भारीच गोंधळ राहतो कि काय करायचं??? आई बाबांचं आज्ञाधारक लेकरू असल्याने दहावी नंतर सायन्सच घ्याव लागणार आणि त्यासाठी  ८५ ९० च्या घरात टक्के मिळवावे लागणार, साहजिकच आहे, रट्टा मारून अभ्यास करावा लागणार....(अगदी रट्टा मारायला आवडत नसला तरी) हे अस अगदी ठरुनच टाकलेल असत त्या प्रत्येक मुलाने ज्याच्या मागे 'हुशार' नावाचं लेबल लावलेलं असत.....आई बाबा तर छोटा शिशु -मोठा शिशु पासून ''आमचा मुलगा पहिला नंबर काढतो हो'' अस गावभर सांगतच फिरतात आणि मग आपल्या कार्ट्याने आयुष्य भर पहिला नंबर काढावा म्हणून त्याला बैल जुंपतात त्याप्रमाणे अभ्यासाच्या रगाड्याला जुंपतात...तसा आई बाबांच्या मनात आपल्या मुलाने पुढे जाव मोठ व्हाव हाच हेतू असतो... पण घराच्या परंपरे नुसार डॉक्टर ,इंजिनिअर झाला, वर्षाला लाखाच्या घरात फी असलेल शिक्षण घेतल, ए सी असलेल्या कॉंलेज मध्ये गेला, आयुष्याची सहा सात वर्ष डिग्री पूर्ण करण्यात आणि केट्या सोडवण्यात, घालवली, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत,  याने लेकरू मोठ होत नाही....
                                                        मोठ होण म्हणजे नक्की काय याची व्याख्या आपल्या डोक्यात आधी स्पष्ट करून घ्यायला हवी...मोठ होन म्हणजे घरात ठेवता येणार नाही एवढा पैसा कमावण का? कि खूप काही तरी समाजउपयोगी काम करून समाजात मोठ स्थान निर्माण करण....यासंध्र्भात प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असणार...तरीही दहा वेळा विचार करून मोठ व्हायचं म्हणजे काय व्हायचय हे ठरल... आता कामाला लागा लिहिण्याच्या चांगल्या स्किल मुले जर आज पर्यंत वर्गात पहिले आला असाल तर तर तुमच लिहिण्याच स्किल महत्वाच आहे ना....८० च्या पुढे पडले तर इंजिनिअर, डॉक्टर अस काही तरी ७० च्या आत बाहेर मार्क असतील तर कॉमर्स, आणि त्याखाली असतील तर अप्र्यायास्तव आर्ट हि किती जुनी समज अगदी 'सु'शिक्षितांच्या हि मानसिकतेतून जात नाही...म्हणजे मानसिकतेच्या बाबतीत आपण अजूनही प्रगती केली नाही....आपली आवड  जर झाड लावण त्यांच्या जातींचा अभ्यास करण असेल तर का करू नये त्यामध्ये डिग्री???, अगदी आपल्याला जर चारोळी, किंवा काही तरी अफलातून लिहिता येतंय, नवीन कल्पना सुचत असतात तर आपण अगदी जाहिरात क्षेत्रात हि जाऊ शकतो, सध्याच्या काळात जर आपल्याला अगदी केस ह्या आपल्या अवयवाचा  जरी अभ्यास करायचा असेल तर त्याचा हि डिप्लोमा उपलब्ध आहे आणि तेही इथेच आपल्या मुंबईत.. आपल्यामधील छोट्याशा कौशल्याला जर आपण आपलं मोठ होण्याच साधन बनवलं तर आपल्याला आपल्या कामाचा कंटाळा देखील येत नाही आणि ' आयुष्यात जगायलाच भेटल नाही रे यार असा सरतेशेवटी येणारा विचार हि येत नाही.....जगात अस कोणत हि क्षेत्र नाही कि जे कमी दर्जाच किंवा त्याचा अभ्यास केल्याने काही फायदा नाही ...आपण ९० टक्के मिळून जेंव्हा आवड म्हणून आर्ट घेतो तेंव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीला आर्ट मधून पुढे खुल्या होणार्या असंख्य क्षेत्रांची माहिती देत यायला हवी...अनेकदा आपल्याला नाव नवीन क्षेत्रांची माहितीच नसते आणि त्याचा परिणाम पुढे 'सामान्य रटाळवाण जीवन' असा होतो ...
                                          आता सहज मनात आल असेल तुमच्या ' ते सगळ ठीक आहे पण पैसा मिळेल ना??? नाही तर आवडीच्या नादात पोट रिकामच राहायचं ...' जिथे कोणीही जात नाही त्या क्षेत्रात जर आपलं कौशल्य आजमावण्यासाठी आपण शिरलो, आणि नवीन काही तरी दिलं तर आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही....दुसर्याला हारवण्यासाठी स्पर्धा करण्यापेक्षा ...काही तरी नवीन पुढच्या पिढीला, समाजाला देण्याचा ध्यास ठेऊन स्वतःशीच स्पर्धा केलेली जास्त योग्य नाही का??? घरच्यांच्या हट्टा खातर केली इच्छांची आपण होळी आणि मनाविरुद्ध निवडल आवड नसलेलं क्षेत्र तर आपल्या सारख्या रट्टा मारून पास झालेल्या घोडेछाप लोकांना कोण देणार प्रवेश ते हि  खुर्चीला भर करण्यासाठी....त्यापेक्षा नाही झालो परंपरागत डॉक्टर,वकील, आणि खुशाल जगलो, आवडीच, स्वतःबरोबर समजला देखील पुढे देखील नेऊ शकलो, एखादा चांगला विचार निर्माण करू शकलो, संपूर्ण आयुष्यात थोडेसे जगलो माणूस म्हणून प्रेमाची, पोटाची गरज असलेल्या समाजासाठी, आपण जन्माचा येण्याचा आपल्या घरच्यांव्यतिरिक्त समजल देखील काही तरी उपयोग झाला     तर त्यातून मिळालेलं मोठेपणाला आणि त्या जगलेल्या क्षणांना  नक्किच पैश्यापेक्षा जास्त मोल आहे.....   

No comments:

Post a Comment