Tuesday, 25 June 2013

जून २ ० १ ३ मुंबई चौफेर 

सूड 

                               समस्त मानवजातीला अचाद्णारी, करुणा व चीड ह्या दोन्हींची सांगड मांडणारी सूड हि दीर्घ कथा आहे. हि नवीन दलित साहित्यातील उर्ध्वायू म्हंटले जाणारे बाबुराव बागुल यांची दीर्घ कथा आहे. बाबुराव बागुलांच्या प्रत्येक लिखाणात भेदा भेद संपवून माणूसपण जागवण्याची जिद्द, अन्याया बद्दलची चीड, त्वेष संताप ओतप्रोत दिसतो... 
                                सूड कथेतील बाबुराव बागुलांनी उभी केलेली नाईका जानकी अशीच पेटलेली, आणि मुरळी च्या पोरीच, सतत नागवल्या जाणार्या स्त्री म्हणून असलेल, मटणाची उधारी चुकविण्यासाठी विकल गेलेलं शरीर आणि आयुष्य झुगारून टाकायला बघतेय...तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया अगदी तिच्या आई पासून सर्व स्त्रिया शरीर आहेत तो पर्यंत जगणाऱ्या किंबहुना स्वतःच्या आणि स्वतःच्या मुळीच हि  शरीरचा  लिलाव करूनच जगणाऱ्या आहेत आणि 'मुरळी च्या पोरीला कुठून आली इज्जत' ह्या वास्तवतेमुळे मुरळी हि अगदी रस्त्यात वाटेल तिथे वाटेल त्याने भोगायची वस्तू आहे, स्त्री चा जन्म मिळाला म्हणजे आपल्याला खूप मोठ्या पापाची मिळालेली शिक्षा आहे, स्त्री हि कायम वाममार्गाला नेणारी, पापिणी, वाईट वृत्तीची हि पुराण काळापासून समाजाची बनवली गेलेली, समाजाने बाळगलेली कोती मानसिकता हि नाईका देखील आईच्या उदरातून जन्म घेण्या आधीपासूनच हेच शिकून आली होती ...परंतु अमानुष, दुबळ्या, जातीव्यवस्थेने गांजलेल्या, वासनेने पछाडलेल्या ह्या राक्षसी समाजामध्ये ती संकोचित पणे जगू इच्छित नव्हती आणि आजूबाजूला तिला दिसणारी स्त्री आणि पुराणातील सतत देवांच्या दासी म्हणून आणि सत्वपरीक्षा देत शिक्षा भोगत आलेल्या, देव्या पाहून स्त्री म्हणजे वाईट हि प्रतिमा मानत साठवून ठेवलेली नाईका जानकी पुरुषी बैराग्याच वेश करून हातात त्रिशूल आणि कमंडलू घेऊन बाहेर पडते ती मोठ तप करून पुरुष बनण्यासाठी, स्त्री चा पापी जन्म झुगारण्यासाठी बाहेर पडल्यावर हि एकट्या केशवपन केलेल्या सुंदर देहाच्या बैराग्या कडे बघून अगदी तश्याच कषाय वस्त्रातील बैराग्यांपासून सामन्यांच्या हि डोळ्यात किती वाईट भावना तिला सतत पाहायला मिळतात ज्याने तिला स्वतःच्या गत आयुष्यातील जखमा ओरबाडून काढल्याचाच भास होत राहतो ज्याने ती प्रचंड अस्वस्थ होत राहते...पुरुषत्व मिळविण्यासाठी, हिमालयावर जाण्यासाठी अत्यंत निष्पाप बालाकासारख्या गुरु चा ती आधार घेते, ह्या जीवन कधी न पाहिलेल्या गुरु च्या सोबतीने राहताना ज्ञानार्जन करताना तिला सापडलेल तीच स्त्रीत्व ती स्वीकारते आणि पुरुषत्व मिळविण्याचा विचार सोडते त्रिशूल टाकून देते ..     
                                   दलित साहित्यात मोडणारी हि कथा अत्यंत वेगळी, चाकोरीबाहेरील कथा आहे, अत्यंत परिणामकारक आणि चौकट  तोडणारी कथा आहे...

पुस्तकच नाव : सूड
लेखल           : बाबुराव बागुल 
मुल्य             : ५० रु 
प्रकाशन         :लोकवांगमय गृह प्रकाशन  

Thursday, 20 June 2013

june 2013 mumbai choufer

' एक होती तार'


                                         एखाद्या महत्वाच्या निरोपासोबत पोस्टाच पाकीट भरून प्रेम, माया, जिव्हाळा, राग, आशीर्वाद, गोड गोड पापे, इतक्या भावना एका हाती आपल्या जीवलगांकडे पोहचवल्या जायच्या त्या म्हणजे पत्र किंवा तारे मार्फत... पत्र आठवतच असेल कारण ते दहावीपर्यंत तिन्ही भाषांमध्ये शिकव लागल होत आणि त्याचे हक्काचे मार्क मिळायचे...एवढाच काय तो पत्रांचा आणि आपला संबंध, आणि तार हा प्रकार तार आपल्या पैकी फारच कमी लोकांना माहित असेल, तार कशी करतात हे बघायला मिलन हा तार आपल्यासाठी अहोभाग्यम क्षण असेल..हो कारण आपल्याला कधी पाहायलाच मिळाली नाही तार म्हणजे काय ते...कारण आपल्या लहानपाणी तार आपल्या हाती फोनच येऊ लागला त्यामुळे बालगीतांमध्ये हि मामाच पत्र आणि हेलो हेलो करायला छोटासा फोन असे बोल येत होते..आणि आता मोठे झालो तर मोबाईल, मेसेज, वाटस अप अशी धडधड संपर्क साधन येउन ठेपली आणि आपला अगदी सहज संपर्क होऊ लागला अर्थातच आपल्याशी काहीही संबंध नसलेल्या, ह्या माणसांना जोडणाऱ्या, इझी टु contact जगाची प्रगती ज्या संपर्क साधनांच्या जोरावर साधली गेली, ज्या संपर्क साधनाचा जगाला जवळ करण्यात खूप मोठा वाट आहे ते म्हणजे पत्र आणि तार....जे आता इतिहास जमा झाले आहेत..
                                            तसा पत्राचा आराखडा आपल्याला माहिती आहेच, सुरवातीला सा न वि वि मध्ये भरपूर निरोप आणि प्रेम, मागण्या, सगळ सगळ आणि शेवटी मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना गोड गोड पापे..असा काहीसा पत्रांचा आराखडा असे जो अगदी रमत गमत सहा सात दिवसांनी पोहचे आणि 'पत्र आल  पत्र आल' अस अतिशय उत्साहाच वातावरण घरात तयार होई ..आणि तार मात्र अगदी त्याच्या विरुद्ध अगदी मोजक्या शब्दात महत्वाचाच निरोप देण्यासाठी, लवकरात लवकर पोहचण्याच्या दृष्टीने जास्त तिकिटे लावलेली आणि सगळ्यांना  थोडीशी चिंतेत टाकणारी...पत्र आल कि लहान थोर सगळे अगदी उत्साहाने ज्याला वाचता येई त्याच्या समोर बसून पत्र वाचून घेत आणि खूप मायेच वातावरण तयार होई...तार आली कि वाईट बातमीच आली असणार अश्या भीतीने घरातली मोठी मंडळी दडपणाखाली येत...तश्या नेहमी वाईटच नाही तर चांगल्या हि बातम्या असत तारेत..पण तार हे अतिशय महत्वपूर्ण सेवा होती...
                                              त्यावेळची पत्राची जागा मेल ने तर तारेची जागा मेसेज आणि वाटस अप ने घेतलेली दिसते कला नुसार त्यामध्ये प्रगती आणि वेग हि तेवढाच वेगात वाढला, ज्या पत्राला पोहचायला आठवडा आणि तारे ला तीन चार दिवस लागत तिथे आत्ताचा मेल आणि मेसेज सेकंदाच्या चौथ्या भागाला समोरच्या पर्यंत पोहचलेला असतो पण या एवढ्या वेगामध्ये भावनांनी भरलेली पोस्टाची तिकीट लावलेली पाकीट आणि महत्वाच म्हणजे पोस्टमन काका कायमचे हरवले...आणि पत्रे, तार इतिहासजमा झाली.... 
june 2013 mumbai choufer

जीवन फुलवणारा पाऊस  आणि जीवन उध्वस्त पाऊस 



                                    " अगदी मी म्हणत होते न तसच झाल....मी म्हंटल होत न ह्यावेळी खूपच जास्त पाऊस पडणार आहे म्हणून".... खूप मोठा गड जिंकल्याच्या तोर्यात शेजारच्या जाधव काकू त्याचं भाकीत खर ठरल्याच सांगत आल्या, त्यांच्याशी चांगलच वाकड असलेली रिया त्यांच्या तोर्याला ठेचत म्हणाली'' अहो तुम्ही पाऊस पंधरा तारखेपर्यंतच पडणार, त्यानंतर एक थेंब हि पडणार नाही अस हि म्हणाला होतात, आणि पाऊस तर पंधरा तारखेनंतरच जास्त पडतोय..'' रियाने केलेला अपमान सहन न झाल्याने काकू मात्र नाक मुरडत घरात निघून गेल्या...पाऊस मात्र खरचं ऐकायला तयार नाही हे सतत जाणवत होत आणि उन्हाळ्यात बरेच दिवस वाट पहिल्याने  दिवस रात्र कोसळणारा, रस्त्यावर संसार असलेल्या कुटुंबांच आयुष्य उध्वस्त करणारा( तसा पाऊस हे सासर उध्वस्त व्हायला जबाबदार आहे का? हा मोठा वादाचा विषय आहे) हा पाऊस देखील आपल्या स्वर्थी मनाला आनंद देऊन जातो, कारण कॉलेजपासून रेल्वे च्या ट्रक्स मध्ये, रस्त्यांवर पाणी साठत आणि त्यामुळे       आपल्याला सुट्टी मिळणार असते...आपल्याला बाईकवर भिजत फिरायला, मक्याचा बुट्टा खायचा आनंद लुटायला, भजी खायला हक्काची सुट्टी मिळणार असते,...आणि अगदी त्याच्या उलट दिवस मजुरीवर काम करणार्यांना हि सुट्टी उपवास घडवणारी असते, पावसामुळे फुटपाथ हि सोडवा लागतो मग महिन्या महिन्याच्या चिलया पिल्यांना घेऊन पाऊस थांबेपर्यंत रस्त्याच्या कडेला उभे असलेले छोटे टेम्पोमध्ये , हातगाड्यांच्या खाली, पाईपलाईनच्या कामासाठी ठेवलेले मोठे गोल पाईप असे तात्पुरते आसरे शोधावे लागतात...असे आसरे हि त्याचा मालक हकालावत नाही तोपर्यंतच ... ह्या घनघोर पावसात 'भुकेसाठी जीव पण' अशी उदाहरण ह्या दोन दिवसात पाहायला मिळाली...सकाळी टी व्ही मध्ये बघून बाहेर पदाय्च्च कि नाही ते ठरवतो...त्याच बरोबर दोन हि दिवस दादर स्टेशन बाहेर डोफा डोफा भर तुंबलेल्या पाण्यात नेहमीची, वयाची ऐंशी गाठलेली म्हातारी आजी तशीच तुटलेल्या छत्रीच फाटलेल कापड सावरत, फुल लवकर विकली जावी म्हणून लोकांना हाक मारत फुल विकत पाण्यातच बसली होती, रोज दादर ब्रिजवर उभे राहून छोट्या गृहपयोगी वस्तू विकणारे डोळे नसलेले काका हि दोन्ही दिवस दिसले..अशी रोजची रस्त्यात प्रचंड उदाहरण दिसली आणि त्यांच्या कडे बघून का कोण जाणे खूप काही विचार हि डोक्यात कालवाकालव करून गेले...हि परिस्थिती बघून का? याच कारण काय? याला जबादार कोण? हे कधी बदलणार? कस बदलणार? असे प्रश्न हि मेंदू बधिर करायला लागले पण...हे विचार तेवढ्यापुरतेच....पुन्हा हे स्वार्थी मन बुडाल वर्षासहलीच प्लान्निंग करण्यातच ...
june 2013 mumbai choufer

भविष्य 

                               दहावीच्या परीक्षेनंतर आपल्या भविष्याच काय होणार अश्या चिंतेत असलेल्या आणि भविष्याची स्वप्न बघत तरुणांना आपल पुढे छानच होणार अस कन्फर्मेशन सर्तीफिकेटच हव असत....प्रश्न पडला असेल ' ते तर प्रत्येकालाच हव असत' मग मी अस का बोलतेय?....तर त्या मागे छोटीशी गोष्ट आहे... दहावीच्या सुरुवातीला माझ्या लहान बहिणीला फ्रेश होण्यासाठी रोजचा पेपर वाचत जा असा सल्ला मी दिला...दहावीच्या सुरुवातीला दहावीच विशेष टेन्शन घेतलेलं नसल्याने बहिणाबाई नी माझा सल्ला हि काही विशेष मनावर घेतला नाही आणि काही दिवसांनी अभ्यासाला सुरुवात झाल्यापासून अचानक रोजच पेपर वाचन सुरु झाल माझ्यातली मोठी बहिण ते पाहून थोडी सुखावली...त्यानंतर आता काही दिवस बहिणाबाई रोज कॉलेज बघायला, क्लास ची चौकशी करायला बाहेर जातात रोज न चुकता पेपर वाचून जातात ..मला ते बघून समाधान वाटत होत चल हिला पेपर वाचायची चांगलीच सवय लागली...काळ अचानक फ़ोर्म भरण्यासाठी निघालेली आमची बहिणाबाई पायर्या उतरून खाली गेलेली असताना पुन्हा धावत घरात आली आणि चपळ न काढताच पेपर चालायला लागली काही तरी बघितलं स्वताशीच पेपर हातात घेऊनच नमस्कार केल्यासारखं केल आणि निघाली स्वरी धावतच ..तो प्रकार बघून मला कळेनाच ..म्हणून तिला अडवलं आणि विचारल ''काय प्रकार होता हा?'' बहिणाबाई म्हणल्या ''अग माझ भविष्य बघितल होत सकाळी, स्नेहाच राहील होत...तिची रास कुंभ आहे मी वर्षभर पेपर मधल भविष्य वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात नाही केली आणि सगळ भविष्य खर्च ठरत होत.. बघ इंग्रजीच्या पेपरला माझा दिवस खराब सांगितला होता म्हणून मला पेपर पण खराब गेला '' अस भरभर बोलून बहिणाबाई पसार झाल्या भविष्य घडवायला....मला मात्र हसू कि रडू असे झाले...शेजारच्या काकी घरातल्या सध्या सध्या समस्यांवर तोडगा काढायला कुठल्याश्या बुवा बाबाकडे जातात म्हणून त्यांना हसणारी हीच माझी बहिण गेल्या वर्षभर पेपारान्माधल्या भविष्याच्या आधारावर जगत होती....अजून एका महाशयाने भविष्यकाराने सांगितलं कि 'तुझा राहिलेला विषय ह्यावेळी सुटणारच' म्हणून अभ्यासच नाही केला ....आणि मग पुढे काय होणार आहे ते झालच....काय म्हणजे ..अहो अभ्यास नव्हता केला तर नापासच होणार ना...
                                            थोडक्यात काय अस भविष्य वैगेरे जर समजत असते आणि खरे हि होत असते तर सगळ्या डॉक्टर, उद्योजक, वैज्ञानिक अगदी सगळ्यांनीच भविष्य विद्याच शिकून घेतली असती..
जर कायम आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट विचार करून केली, प्रत्येक निर्णय विचार करून घेतला आणि स्वतःवर विश्वास ठेऊन स्वताच्या निर्णयांवर ठाम राहिलो तर का गरज लागेल आपल भविष्य कोणीतरी तिसर्यानेच ठरवण्याची...आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर आपण आपल भविष्य ठामपणे ठरवू शकतो अगदी आपल्याला हव तसं..                                                      
june 2013 mumbai choufer

अनधिकृत 

                                अनधिकृत शब्द वाचला कि प्रथम आठवते ठीक ठिकाणी वाढलेली झोपडपट्टी वाढलेली झोपडपट्टी जणू अनधिकृत हा शब्द झोपड्यांना समानार्थी शब्द असावा... पण गेल्या काही दिवसांमध्ये अगदी कंपा कोला कंपाउंड सारख्या इमारती सुद्धा अनधिकृत असल्याच्या उघडकीस आल्या...म्हणजेच झोपड्याच अनधिकृत असतात हा आपला समज चुकीचा आहे...'अनधिकृत' ह्या शब्दाची फोड केल्यास लक्षात येते कि अधिकृत नसलेले, म्हणजेच सरकारमान्य नसलेले असा ह्या शब्दाचा अर्थ होतो..प्रत्येक घर बांधताना, कोणताही व्यवसाय सुरु करताना त्याची क्षेत्रानुसार महानगर पालिकेत नोंदणी करावी लागते थोडक्यात आपण विशिष्ट व्यवसाय सुरु करतोय किंवा विशिष्ट जागेत घर बांधातोय याची सरकारला खबर करायची...आणि मुख्य म्हणजे त्याचे सरकारला पैसे भरायचे तेंव्हा ती वस्तू अधिकृत म्हणून ठरवली जाते.
                                 यावरून आता पर्यंत माध्यमांनी समोर आणलेल्या अनेक अनधिकृत गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यात अनेक नामवंत लोकांची नाव निघतात... मुख्यतः आत्तापर्यंत च्या घोटाळ्यांमध्ये सगळे नेतेच सामील होते आणि तेही अतिशय प्रमुख पदे भूषवणारे... ह्या गोष्टी उघड आलेल्या पण उघड न झालेल्या अनधिकृत उद्योग, व्यवसाय, घरे, जमिनी, यांचा तोटाच नाही, इथे खोटी प्रतिष्ठा असलेल्या लोकांची संपत्ती त्यांच्या नावांमुळे अपॉप्च दुर्लक्षित होते पण छपराच्या गरजेसाठी बांधलेली झोपडी मात्र अनधिकृतच....असे कित्येक दारू,गांजा चे अड्डे बार,क्लब, गुठ्ख्यांचे कारखाने, केमिकल, कापड, अश्या अनेक गोष्टींचे अनेक कारखाने जेंव्हा लोकांच्या पिण्याच्या पाण्यात सोडले जातात , समाज उध्वस्त करणारे असताना त्यांचे परवाने सहज रग्गड पैसा दाबून घेतले जातात आणि काही तर बिना परवाने अतिशय जोमात चालतात पण ते कधी मोडल्याच्या बातम्या येत नाहीत मध्येच एखादी ह्या ह्या नेत्याचा हा हा बार अशी बातमी येते आणि दोन च दिवसात दिसेनाशी होते... आता काळ पर्व माहीम आणि बोरीवली मध्ये इमारती ख्च्ल्याच्या आणि कोसळल्याच्या बातम्या येऊनच गेल्या असे किती तरी मोठे मोठे कंत्राटदार आहेत जे अश्या दुर्घटनांना  कारणीभूत असतात आणि ह्या लोकांचे असे अनेक अनधिकृत जीवघेणे कारभार असतात ह्या अश्या कंत्राट दारांकडे    मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. ज्या गोष्टींसाठी मान्यताच दिली नाही गेली पाहिजे त्या गोष्टी अगदी अधिकृतपाने चालू असतात. ज्वारी बाजरी सडून त्यापासून वाईन बनविली जाणार हा निर्णय किती आनंदात मोठ्ठ  मंत्रिपद भूशविणार्यां जन्सेव्कांनी सगळ्या लोकांसमोर आणि माध्यमांसमोर जाहीर केला होता आता खर सांगा हा निर्णय अधिकृत होण चुकीच आहे कि बरोबर?..अशी किती तरी उत्तम उदाहरण अधिकृतते बाबत देता येतील...
                               अनधिकृत म्हंटल कि कायम झोड्यांवर येणाऱ्या धाडी बघितल्याकी आपसूक वाटायला लागत, उच्चभ्रू सुटा कोटातल्या मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये नावाजलेल्या कापन्यांमध्ये होणार्या अनधिकृत कामांवर, अगदी सरकारमध्ये होणार्या अनधिकृत कामांपासून सरकारमान्य अनेक वाईट कामांपर्यंत कश्या धाडी वळत नाहीत? कि ह्या झोपड्यांबरोबर हि झोपड्यांमध्ये राहणारी लोकच यांच्या दृष्टीने अनधिकृत झाली आहेत...               
june 2013 mumbai choufer

डोनेशन 


                             अगदी बरोबर, अगदी तेच मी त्याच डोनेशन बद्दल बोलतेय....सध्याच्या अडमिशन च्या काळात कोणत डोनेशन आठवणार....काळा पैसा लपवण्यासाठी समाजसेवी संस्थांना दिल जाणार कि हुशार मुलाच्या अडमिशनसाठी, गरीब बापाच्या डोळ्यात आसव आणणार डोनेशन. हो अगदी आसव आणणारच,..दहावी चा जोरदार अभ्यास करणारी आपली मुलगी\ मुलगा बघितल्यावर आपला मुलगी\मुलगा आपल स्वप्न नक्कीच पूर्ण करणार, आणि पुढे जाऊन खूप मोठा होणार, नाव कमावणार अस प्रत्येक आई बापाला वाटत असतच आणि त्याला उच्च शिक्षण देण्यासाठी, त्याला कोणतीच गोष्ट कमी पडू नये म्हणून ते अगदी रात्र दिवस एक करायला तयार असतात.
                                 ज्या आई बापाने पोटाला चिमटा काढून , वयक्तिक गरजांकडे दुर्लक्ष करून मुलाच्या पुढच्या उच्च शिक्षणासाठी पैसा जमवलेला असतो, लोकांकडून मागून आणलेला पैसा असतो ते फक्त जेमतेम वर्षभराची फी देता येईल  इतकाच...त्यात आता मुलाची सोयीसुविधा असलेल्या, कायम पुढे असलेल्या  कॉलेजला जावून चांगल्या मार्कांनी पास होण्याची क्षमता असताना त्या मुलावर कायम अन्याय होतो ते फक्त त्याच्याकडे शिक्षण सम्राटांना चारायला, लाच द्यायला पैसा नसतो. तशीच दुसर्या बाजूला पूर्ण उलटी परिस्थिती दिसून येते ज्या घरांमध्ये पैसा जास्तच येत असतो त्या घरांमध्ये मात्र पहिल्या इयत्ते पासूनच डोनेशन चारून मुलांना अगदी जबरदस्ती पुढे ढकललं जात आणि त्यांची कुवत नसताना ते कोणत्याही लाईन मध्ये उभ न राहता, कोणताही फॉर्म न भरता फक्त पैस्याच्या जीवावर थेट वर्गात असतात मग पुढे हेच अगदी कॉलेज ला कधीही न येता पास हि होतात आणि बापाच्याच जागेवर बसतात आणि आपल्यापेक्षा जास्त हुशार असलेल्या आपल्याच वर्गातील मुलांवर हुकुमत गाजवत असतात..तर हा होता ह्या डोनेशन चा होणारा दुष्परिणाम आणि आपल्यासारख्या सामन्यांवर होणारा अन्याय ...
                                     अतिशय नावाजलेल्या सगळ्याच, अगदी  महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर गणल्या गेलेल्या कॉलेजेस मध्ये देखील प्राचार्यांच्या ऑफिस बाहेर मोठी लाईन असते ती थेट अडमिशन घेण्यासाठी, आणि कधी क्वचित कॉलेजमध्ये दिसणारे, फार कमी विध्यार्थ्यांना माहित असणारे प्राचार्य सुट्टीत मात्र रोज कॉलेजला हजर असतात...किंबहुना कॉलेजच नाव जितक मोठ तितक डोनेशनचा आकडा मोठा, आणि आकडा ठरवणारे शिक्षण सम्राट हि मोठे, अशी हि  शिक्षणाची परिस्थिती लक्षात येते .... हुशार मुलांच्या शिक्षणात आडव येणार आणि सामान्य आर्थिक स्थिती असलेल्या आई बापाच्या स्वप्नांवर पाणी फिरवणार डोनेशन हे भयंकर संकट आहे...ह्या भयंकर संकटाला संपुष्टात आणण्यासाठी आपण तरुणांनीच त्याला खडा विरोध करायला हवा..
june 2013 mumbai choufer

आपण आत्मकेंदी होतोय का???

                        
                                 पावसान इंट्री काय मारली अन सगळ जीवन विस्कळीत झाल... उकडतंय म्हणून   पावसाची आतुरतेने वाट पाहणारे सगळे  चाकरमानी दोन तीन दिवसातच पावसाला शिव्या घालायला लागले....हा अनुभव आहे दोन दिवस पावसात फिरण्याचा...मी हि त्यातलीच एक....आपल कॉलेज आणि पाउस एकत्रच सुरु होतात त्यामुळे पावसाचा आनंद आणि त्रास याचा चांगलाच अनुभव आपण तीन चार महिने घेत असतो...आणि त्यामुळे आपली अनेकदा भारीच चीडचीड होते..
                                  या होणार्या त्रासावरुनच आठवलं तसा आपल्याला अनेक गोष्टींचा त्रास हा होत असतो त्यामध्ये नको त्या  छोट्या छोट्या गोस्तींचाही आपल्याला भयंकर त्रास होत असतो... कल्याण स्टेशन पर्यंत पंधरा मिनिटांचा रस्ता पार करायला जेंव्हा काल ट्रेनने पाऊण तास लावला तेंव्हा अगदी गाडीत बसून असलेल्या लोकांना सुधा नकोस झाल होत आणि तीच गत ट्रेनची वाट बघत प्लाटफॉर्मवर थांबलेल्यांची झाली होती...त्याच एवढ्या भर पावसात, माश्यांच्या ताफ्यामध्ये एक पस्तीस चाळीसीची स्त्री स्टेशन वरील प्रतीक्षालायाच्या खिडकीमध्ये मुटकुळ करून गाढ झोपली होती, अंगावर संपूर्ण ठीगळानी भरलेली,  रंग हि ओळखून येणार नाही इतकी मळलेली साडी अगदी कुठलीही पर्वा न करता झोपलेल्या त्या स्त्रीकडे बघून घरातल्या सुशिक्षित स्त्रियांनी त्यांच्या सुरक्षेसाठी काय करावे काय करू नये यावर झालेले ,प्रत्येक बालात्काराच्याप्रकारानंतर होणारे सेमिनार आठवले, चानेलपासून टपरीपर्यंत सगळ्याचा स्त्रियानविषयीचा  कळवळा आठवला......कॉलेजच्या समोरच्या फुटपाथवर गेली सहा सात वर्ष घरात रहाव तशी फुटपाथवर राहणारी कुटुंब आठवली, पाठ्ठेबाबुराव रोड, ग्रांट रोड वर कोंबून कोंबून बसवलेली वस्त्या, पावसाळ्यात पाणी घरात शिरलाय कि यांनी पाण्यातच घर बांधल्यात असा प्रश्न पडावा अश्या वस्त्या आठवल्या, कोणत्याही प्रकारची ओळख, रेशनकार्ड, चेहराच नसलेली, गेली कित्येक वर्ष वेड्यासारखी एकाच कपड्यांवर आणि अतिशय घाणेरड्या अवस्थेत रस्त्यावर फक्त फिरताना आणि वेड्यासारखं बडबडताना ज्यांना पाहिलंय ज्याच तासनतास बोलण एकलय जे अतिशय विदारक आणि भयानक होत ती सारी लोक आठवत होती...आणि प्रचंड भेडसावत , सतावत होता तो त्यांच्या जिवंत असण्याचा प्रश्न....एखादी छोटी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर चार चौघात ओळख, कुटुंब, पैसा, धेय्य असणारे आपण  मानसिक तणावात येउन आत्महत्येचा शेवटचा पर्याय निवडतो...म्हणजे कोणतीही ओळख नसताना, कोणीही तिच्या सुरक्षेसाठी झटत नसताना, जगतेय कशाला याच धेय्य  नसताना जगणारी ती प्लाटफॉर्म वरची स्त्री नक्कीच जीवन जगण्याच्या स्पर्धेची विजेती आहे.
                                         थोडक्यात काय तर, नको तेंव्हा जागा होणारा आपल्यातला समाजसेवकास  a  जे कधी माणसांमध्ये गृहीतच धरले गेले नाहीत, कायम दुर्लक्षित राहिल्यात असे हे होमलेस, परिस्थितीमुळे शेमलेस आणि फेसलेस लोक आजूबाजूला अगदी कोणताही बंड न करता जेंव्हा जगत असतात तेंव्हा आपल्याला डोळे, असतानाही ते का दिसत नाही किंवा योग्य अयोग्य ओळखण्याची समाज असताना आजूबाजूच्या अयोग्य परिस्थितीची जाणीव आपल्याला का होत नाही? आपण इतके ढिम्म का? त्यांच्या माणूस असण्याची, हक्काच्या छपराची जाणीव त्यांना कधी करून देणार ?? आपण आपल्याच आयुष्यात प्रचंड आत्मकेन्द्री होतोय का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा...
jun 2013 mumbai choufer

हरवतोय आनंद पहिल्या पावसाचा ..


                               दोन दिवस झाले हा पाउस रोज चांगलाच बरसतो आणि सुखावूनही जातो.. लहानच काय मोठे सुद्धा त्याच्या बरसण्याचा पुरे पूर आनंद लुटतात .. हल्लीच्या कॉन्व्हेंट च्या जमान्यात हि' 'येरे येरे पावसा हे पिढ्यानु पिढ्या बोलल जाणार बडबड गीत चिमुरड्यांच्या ओठांवर शाबूत आहे त्यांच्या तोंडून ती बडबड गीत ऐकताना मला माझ्या जुन्या चिंब दिवसांची आठवण झाली कसल भयंकर वेद होत मला भिजायचं अगदी रोज शाळेतून घरी येताना, घरी आल्यावर, बाहेर जाण्याचा कोणताही चान्स मी गमवायचे नाही फक्त भिजायला मिळव म्हणून खूप भिजायचेही आणि आईचा मार हि निमुटपणे सहन करायचे... मातीचा पहिला गंध घेण्यासाठी कसली धावपळ असायची..  वह्याच्या वह्या होड्या बनून पाण्यावर तारांगायाच्या ... दोन दिवस झाले चांगला धोधो कोसळतोय पाऊस पण ह्यावेळी मात्र मला भिजावसच वाटत नाही... 
                                   हल्ली नेहमीसारखा मातीचा गंध हि येत नाही...ह्यावेळी पहिल्या पावसात भिजून आलेली चिल्लरपार्टी च्या अंगाला खाज येत होती, पुरळ हि उठली होती ..मातीच्या गंधाएवजी ह्या वेळी खूपच खराब  वास येतोय, का बर व्हाव असं? पहिल्या पावसात भिजण्याच्या आनंदच अगदी कुठे तरी हरवला आहे ...पहिल्या पावसात भिजल्याने शरीरातली उष्णता कमी होते म्हणून पहिले आई नेहमी पहिल्या पावसात भिजायला सांगायची...आता पहिला पाऊस गारवा नाही तर प्रदूषित हवेतील घातक रसायन घेऊनच जमिनीवर कोसळतोय( ज्याला वैज्ञानिक भाषेत आम्लवर्षा म्हणतात)....वर्षभर वाढत्या वाहनांमुळे, वाढते कारखाने आणि रसायनयुक्त धुरामुळे, निसर्गाच्या होणार्या र्हासाकडे केलेलं दुर्लक्ष या सर्व कारणांचा परिणाम नंतर आपल्याच आनंदावर होतोय हे आपल्या लक्षात कस येत नाही...या जीवनातल्या एवढ्या मोठ्या आनंदाला आपण आपल्या काही क्षुल्लक चुकांमुळे गमावणार तर नाही ना??...चार माणसांसाठी असलेली चारचाकी जेंव्हा एका माणसासाठी रस्त्यावर धावते तेंव्हा अश्या असंख्य चारचाकिंमुळे होणार वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, आणि त्याचे आपल्यावर होणारे परिणाम आपण कस रोखणार?    याचा आपण थोड्या अंतरासाठी चारचाकी  मध्ये फिरताना कधीच विचार करत नाही...कारखान्यांमुळे आपल्या डोळ्यासमोर होणार प्रदूषण आपण अगदी दुर्लक्षितच करतो अगदी त्यामुळे होणारे परिणाम आपल्यावर वेगवेगळ्या मार्गाने होत असताना...आपल्या सततच्या दुर्लक्षामुळे हे आपल्या जीवावर तर बेतणार नाही न याचा विचार आपण कधी करणार???   
jun 2013 mumbai choufer..

आणि एकदाचा निकाल लागला...

                                       काल पर्यंत उद्या निकाल लागणार, उद्या निकाल लागणार अशी धाकधूक घरातल्या प्रत्येक घटकात ठसठसून दिसत होती...घरात ज्याचा निकाल लागणार त्याची ताल भूक मेली च होती पण आई बाबांची पण भूक टेन्शन मुळे मेली होती...एक एक क्षण सरत सरत अरे पप्पू पास हो गया....मग काय जल्लोषच फटके काय पेढे काय सगळच, आता या जल्लोषात टक्के कितीपण असू दे....चांगले  नव्वद च्या आस पास टक्के मिळालेले पण अजून मिळायला हवेत म्हणून रडतात तर नापास झालेले पण रडतातच त्यामुळे जल्लोष काय थांबत नाही...अगदी पस्तीस टक्के मिळालेला चिन्या काय नी नव्वद टक्के मिळालेली चिंकी काय सगळ्यांकडून पेढ्यांची अपेक्षा मात्र सगळे शेजारी पाजारी ठेउनच असतात...हे कोणाला चुकत नाही....
                                        एकदाचा निकाल लागला तरी टेन्शन काय जात नाही आता पुढे काय करायचं?? हे टेन्शन आहेच डोक्यावर... सगळ्यांनी भरवलेले पेढे जिरत हि नाहीत बिचार्यांचे आणि ज्यांचा पुढच्या शिक्षणाचा निर्णय मिळणाऱ्या टक्क्यांवर अडकलेला असतो ते घरच्यांच्या खेचा खेचीचा विषय ठरतात तसे हल्ली असे राहिले नाहीये...अगदी काय बनायचं आहे आयुष्यात, त्याला किती टक्के लागतात अगदी याच प्लानिंग करून अभ्यास केला जातो आणि तसे टक्के पाडले जातात ...आणि काहींना पडतात हि तसे टक्के, काहीना नाही पडत अगदी अपेक्षे एवढे टक्के कि मग पुढच प्लान्निग हि ठरलेलं असत काहींचा निर्णय असतो 'कशाला टेन्शन घ्या फादरच्या ओळखी आणि पैसा कधी कामाला येणार,'तर काहींच म्हणन असत ठीक आहे ना घेऊया डिप्लोमा एवजी प्लेन सायन्स, तर काहींनी थेट वर जायचंच प्लानिंग केलेलं दिसत ....अस चित्र अनेकदा दिसत पस्तीस टक्के मिळालेला गड जिंकल्यासारखा फिरत असतो आणि पंचावन्न साथ टक्के वाले गळफास, विष, असे नवनवीन प्रयोग करायला निघतात....चल ह्या सगळ्या गोंधळात सगळे गोंधळलेले असतात  पण खरी धन्ढाल उडते ती स्टेशनरी, झेरोक्स वाले यांची आणि चढाओढ  लागते ती शिक्षणाच्या बाजारातील हि अकादमी आणि तो क्लास अशी...घरचे ताई दादा काका मामा सगळ्याचं भारीच गोंधळ उडतो ह्या एवढ्या जाहिरातींमधून कोणत्या  कॉलेजची, क्लासची जाहिरात सुंदर वाटते....इथे ज्याचा निकाल लागलाय त्याच्या तर मताला कोणी विचारताच नसत असो तर हे सगळ बघून घरोघरी मातीच्या चुली हि म्हण आपसूकच डोक्यात  चमकून जाते...
                                चला या वेळी सगळी झांजटच वाचली अस वाटल होत ओंनलाईन प्रोजार जेंव्हा कळली पण पुढ वाढून ठेवलेलं आहे ते आहेच हंगच झाला काम्पुटर,कोडच चुकला, स्पेलिंगच चुकली म्हणजे डोक्याच टेन्शन काय जात नाय ....जाऊदे मेन टेन्शन गेल... एकदाचा निकाल लागला      
jun 2013 mumbai choufer 

धाकधूक निकालाची ...

                               दहावीचा निकाल म्हणजे ज्याचा निकाल आहे तो आणि त्याच्या घरचे, शेजारपाजारचे, नात्य्गोत्यातले, आजूबाजूचे सगळेच धाकधुकीत असतात..आणि एखाद्या दुष्काळातल्या शेतकर्याने पाण्याची वाट पहावी तसे निकालाकडे डोळे लाऊन बसलेले असतात...वर्षभर मर मर अभ्यास केल्यानंतर, क्लासेसचे बेंचेस आणि शिक्षकांची तोंड झिजवल्यानंतर मोठ्ठ दिव्य येत ते बोर्डाच्या परिक्षेच... ते पार केल्या नंतर आता कुठे सुटका झाली म्हणून सुटकेचा निश्वास सोडला रे सोडला तर घरातले सुरुवात करतात ते 'किती पडतील टक्के?' असे भयानक प्रश्न विचारायला आणि सुट्टीला म्हणून जिथे जाव तिथे गप्पा रंगतात आई आणि मावश्यांच्या त्या 'कसा केला अभ्यास माझ्या लेकांनी आणि किती त्याग केला सुपुत्राच्या अभ्यासासाठी आम्ही' ह्या विषयावर... एवढी दोन महिन्याची सुट्टी या निकालाच्या भीतीमुळे मनावर दगड ठेऊन ढकलली जाते अक्षरशः...
                                 हि काल परवाच दहावीच्या  निकालाची तारीख काय जाहीर झाली सगळ्या घरांमध्ये अगदी गोंधळच उडालेला दिसत होता... संपूर्ण नात्यागोत्यात कोण कोण आहेत यावेळचे बकरे याची प्रत्येक घरात अगदी आठवून  आठवून  लिस्ट च काढली जात होती...बिचारे दहावीकर रडवेले चेहरे करून कोपर्यातच बसलेले दिसत होते....त्यांचे हे चेहरे बघून त्यांनी कुढत बोज्याखाली घालवलेल संपूर्ण वर्ष आणि नववीचा अर्धा वर्ष आठवला...हल्ली वाढलेल्या जीवघेण्या स्पर्धांमुळे शाळांव्यतिरिक्त ह्या विषयाचे त्याविषयाचे अश्या वेग वेगळ्या क्लासेसला भलतेच उधान आले आहे गल्ली गल्लीत क्लास्सेस सुरु झालेले दिसत आहेत प्रत्येकजण आपण तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी किती योग्य आहोत याची जोरदार जाहिरात करताना दिसत आहेत....ए. सी असणारे, भरपूर पैसे घेणारे, रेडीमेड नोट्स  देणारे, इ स्टदिस वर शिकवणारे क्लासेस म्हणजे आमचा पोरगा मेरीत्माढेच येणार अगदी त्याने काही कस्त घेतले नाही तरी असा आज काल पालकांचा समज झाला आहे... या सगळ्यात आपला मुलगा कोणता पद्धतीने अभ्यास करतो, त्याला कसा आणि कोणत्या प्रकारचा अभ्यास किंवा विषय सोपे पडतात याकडे मात्र पालक दुर्लक्ष करतात आणि मुल सुद्धा आपण काय करू शकतो यापेक्षा माझा मित्र त्या क्लास ळा जावून माझ्यापुढे जाणार नाही न असा विचार करायला प्रवृत्त होतात  आणि हा एक निकाल अगदी आयुष्याचाच निकाल असल्यासारखे अभ्यास करतात रट्टा मारून.....हे क्लासेस आणि नवीन शिक्षण पाध्त्ती मुलांना नववी पासूनच दहावीचा अभ्यास करायला भाग पडतेच आणि अगदी ओझ्याचे बैलच करून टाकते...दोन वर्ष सगळ बंद फक्त आभ्यास ह्या नव्या फॅड मुले मुल मात्र वैतागतात ते अभ्यासालाच...यात धंदा तेजीत चालतो तो शालोपयोगी वस्तू विकणार्यांचा आणि क्लास्सेस वाल्यांचा मुलांना अभ्यास आणि परीक्षा सोपी करून देण्याच्या नावाखाली जास्तच गुंतवल जात ते त्या बोज्याखाली..
                        वर्षभराच्या उपसलेल्या कास्तानंतर धाकधूक आहे ती कायमच निकालाची....
jun 2013 mumbai choufer

जल्लोष तरुणाईचा 

                                'जल्लोष तरुणाईचा' अस नाव वाचल्यावरच तुमच्या डोक्यात चटकन अल असेल ते कॉलेज  च्या आवारात झालेला एखादा युथफेस्टिवल, जो एखाद्या ब्रांड ने आपल्या वस्तूंचा खप वाढवण्याच्या दृष्टीने आपल नाव मोठ करण्याच्या दृष्टीने, तरुण वर्ग आकर्षित करण्याच्या दृष्टीने आयोजित केलेला असतो ..... ज्या युथ फेस्टिवलची दोन तीन महिने खच्चून जाहिरात केलेली असते, पचंड पैसा भाविश्तील आर्थिक फायद्याच्या दृष्टीने गुंतवलेला असतो ... आणि मार्केटिंग टीम ने प्रत्येक कट्टा आणि टपरीवर त्याचा बोलबाला घडवून आणलेला  असतो ...त्या युथफेस्टिवल मध्ये डि जे असतो , नुकताच जोशात वर आलेला एखादा गिटारिस्ट, किंवा नवोदित कलाकार असतो ...जे तरुणांना आकर्षित करण्यासाठी तिथे आणलेले असतात कारण हल्ली आपण तरुण याच सर्व तेवढ्या वेळे पुरती सुख देणाऱ्या, आणि आपल्या आयुष्यात ज्याचा काहीही फायदा नसलेल्या, किंबहुना जिथे आपला तोटाच आहे अश्या गोष्टींकडे जास्त खेचले जातोय...हा तर असे युथफेस्टिवल नेहमीच आपल्या आजूबाजूला होतच असतात..त्याच त्याच थीम, तेच डि जे, तेच वेडवाकड गरमीत नाचण आणि पकाव गेम...मला तर या त्याच त्याच जगण्याचा कंटाळा आला होता या सुट्टीत म काहीतरी नवीन अनुभवायला मिळतंय का याच्या अगदी शोधातच होते.... आणि मी घेतला हि, नवीन खूप भारी  अनुभव....जो अनुभव माझ्या आयुष्यात खूप मोल्यवान आणि मोठा बदल घडवणारा ठरला...
                                       कधी मैत्री वाढवण्यासाठीचा ....तरुण म्हणजे काय हे सांगणारा....प्रेम गोर्या रंगावर, सुडोल बांध्यावर न करता त्या व्यक्तीवर करा....त्या साथीदाराच्या विचारांवर प्रेम करा...त्याच्या कस्ट करण्याच्या ताकदीवर प्रेम करा, त्याच्या समाजातील विकृती विरुध्द लढण्याच्या हिमतीवर प्रेम करा अस सांगणारा, आपल्या समजतील वर्ग( uppar class - lowar class ) शिक्षण,पैसा,जात, धर्म, लिंग या सर्वांतील  भेदभावामुळे समाजातील तरुणांची बिघडत चाललेली स्थिती वेगवेगळ्या खेळांमधून लक्षात आणून देणारा...खूप नवीन काहीतरी देणारा युथ फेस्टिवल पाहिलंय कधी???? हो या सुट्टीत मी अश्याच ऎका युथफेस्टिवल ला  गेले होते...'मुक्तीवादी युथ फेस्टिवल'....
                                        मुक्तीवादी विचारसारणीच्या श्रमिक मुक्तीवादी युवा संघटनेने आयोजित केला होता हा युथ फेस्टिवल तो हि काही तासांचा गर्दीतला धिंगाणा नव्हता इथे....सातार्यातील कास पठार ह्या फेमस हिल स्टेशन वर खूप थंड आणि मुंबईत फक्त बिल्डींग्स पाहणाऱ्या युथसाठी तर स्वर्गच वाटेल अश्या ठिकाणी, दोन दिवसाचा हा युथ फेस्टिवल होता.. आता एवढ सगळ ऐकल्यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल कि काय यार काय मजा जर 'गावो-नाचो' नसेल...तर इथेही होती गाणी पण कधी एकलीच नाहीत आपण अशी...त्या गाण्यांमध्ये तरुणाने हक्कांसाठी, अन्यायाविरुद्ध लढल पाहिजे, कोणताही भेद न बाळगता संपूर्ण विश्वावर प्रेम करायला हव, आपल्यासाठी कस्ट करणाऱ्या आई बाबांच्या आणि ज्या कस्ट करणाऱ्या लोकांमुळे आपण जगतोय त्या शेतकरी ,कामगार, स्त्रिया यांच्या पोटासाठी, त्यांना न मिळणाऱ्या मोबदल्या विरुध्द आवाज उठवला पाहिजे, समाजात असलेल्या चुकीच्या रूढी विरुध्द प्रबोधन केल पाहिजे...असे तरुणांसाठीचे संदेश होते...मी जी तिथे अनुभवली, जगली ती गाणी, ती संपूर्ण संस्कृती कस्टकर्यांची संस्कृती म्हणून मला नवीनच माहित पडली...तिथे सगळ्यांचा समावेश करून दोस्ती, प्रेम आणि क्रांती, देशप्रेम,स्त्री अत्याचार, संस्कृती, अश्या विषयांवर छोटे छोटे स्कीट सदर केले, काही माहितीपट हि पहिले, रात्री दोन वाजेपर्यंत खुल कविसंमेलन, आणि प्रत्येकाने ज्याला येते ती कला सादर केली...प्रबोधनात्मक गाण्यांचा खूपच प्रेरणा देणारा शाहिरी जलसा झाला...या दोन दिवसाच्या युथ फेस्टिवल नंतर त्या फेस्टिवल मागचा उद्देश सफल झालेला दिसत होता, आम्ही वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले, वेगवेगळ्या  वातावरणातले सर्व तरुण तरुणी पूर्ण एकत्र झालो होतो मित्र झालो होतो, अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरण तयार झाल होत..या फेस्टिवल मधील एका ताटात जेवण्यापासून खेळांपर्यंत, एकत्र गाण्यापर्यंत प्रत्येक गोस्तीमागे एक मोठा समाजउपयोगी संदेश होता...होता का नाही तुमच्या पेक्षा वेगळा अनुभव..
                                   या नवीन संकल्पनेच्या युथ फेस्टीवालचा, निसर्गाच्या सानिध्यातला अविस्मरणीय  अनुभव तर तुम्ही गमावला आहेच...पुन्हा कधी असेल असा काही नवीन उपक्रम तर नक्की कळवेन तुम्हाला.. don't miss it ...        
may 2013 mumbai choufer

आपण यांना विसरलोय का???

                                        सकाळी भागातसिंग वाचत होते...मोठ्या मुश्किल ने मिळाला होता ....वाचताना सतत खंत वाटत...इतके वर्ष कोणीच का नाही सांगीतला हा भगतसिंग... अभ्यासात हि फारच तुटपुंज्या भगता ची ओळख झाली होती .....भागातसिंग ची दूरदृष्टी, त्याने तरुणांना सांगितलेली तरुणाई  ची शक्ती, त्याचे संदेश  जर  जर आजच्या तरुणांना मिळाले असते तर नक्कीच आजचा तरुणाइ काही तरी वेगळी असती'....असा विचारांचा कोलाहल मेंदूत चालू असताना अचानक छोटी बहिण बाहेरून आली आणि तिने तुटत तुटत वाचल (कारण पुस्तक मराठी होत आणि बहिण इंग्रजी शाळेत शिकते ) " भ-ग---त सिं----ग " अय्या दीदी तुझ्याकडे आहे भगत सिंगच बुक!" खूपच काही तरी नवीन पहिल्या सारखा तिने चेहरा केला....माझ्याकडे भगतसिंग बद्दल माहिती आहे याच तिला आच्छर्य वाटल कारण तिच्या स्कूल मध्ये कोणीच स्पर्धेत भगतसिंग बद्दल बोलणार नव्हते...आणि कोणाकडेच त्याबद्दल विशेष माहिती हि  नव्हती... 
                                         छोट्या बहिणींची पुस्तक पाहिल्यावर लक्षात आल कि आमच्या पेक्षाही या नवीन पिढीला काहीच माहित होणार नाही अगदी भगतसिंगच काय...महात्मा फुले, बाबासांहेब आंबेडकर, अश्या अनेक  महान नेत्यांची, ज्याचं खूप महान कार्य होवून गेलय, त्यांची फारच तुटपुंजी माहिती आपल्याला अभ्यात होती, आणि फक्त जन्म मृत्यू एवढीच माहिती आपल्याला माहित करून दिली गेली..त्याचं कार्य त्यांचे विचार हे कोणी आज पर्यंत सांगितलेच नाहीत... आज जर शिक्षक किंवा घरातील कोणत्या हि थोरा मोठ्याने जर त्यांचे माणुसकी सांगणारे, जात धर्म आणि त्यामुळे निर्माण होणारी विषमता दाखविणारे अन्याया विरुध्द पेटून उठायला सांगणारे, समता सांगणारे....विचार आपल्यापर्यंत पोहचवले असते तर आमच्यातील घणाघाती स्पर्धा, प्रेमापासून,सगळ्याच गोष्टींच्या बदललेल्या व्याख्या, समाजाप्रती असलेली भावना नक्कीच आज आहे तशी  नसती....आणि आत्ता घडणाऱ्या बरयाच  विकृती ने भरलेल्या गोष्टी घडल्या नसत्या....समाजत प्रत्येक मुलीला स्त्रीला उच्च स्थान असत...आज कोणीही कोणाच्याही दृष्टीने छोट नसत आणि मोठ हि नसत ...
                                       एवढ्या विचार मंथना नंतर आपसूकच वाटून गेल  आपण या थोर माणसांना विसरलोय  का?? 
may 2013 mumbai choufer

जून बालपण नवं बालपण ...

                                      हल्ली सुट्टीत घरच्यांच्या मोठ्या मैफिली बसतात....त्यात सर्व जुन्या आठवणी  त्यांनी जगलेले ते दिवस.....आई बाबा , आजी आजोबा घरातली सगळी मंडळी एकमेकांचे किस्से सांगतात ...या सर्व जुन्या पिढ्यांचं बालपण जरी थोड गरिबीत पिचलेले गेल....तरी हि त्यांना मिळालेला निसर्गच सहवास, त्यांनी खेळलेले खेळ सर्व काही अजबच.....जे आम्हालाही अनुभवायला मिळाल नाही... आईच्या सर्व गोष्टी एकूण तर फारच मजा वाटली... आई सुद्ध असा उद्गगार सहज निघाला....हि घरातली मंडळी नेहमी सांगतात त्यांच्या लहान पणी टिव्ही वैगरे काही नव्हत त्यांचा संपूर्ण दिवस हा कामातच जाई..आई सांगत होती तिच्या लहानपणी ती सूर पारंब्या म्हणजे वादाच्या झाडाला असलेल्या पारंब्या ना झोके घेत, जांभळ, आंबे चोरायला जात, जंगलांमध्ये पक्षंची घरटी शोधायला जात ... नदीवर पोहायला जात, मासे हि पकडत,  तेंव्हा पाणी हि खूपच स्वछ असे, कपडे धुवायला नदीवर जावे लागे, गुरांना चरायला घेऊन जावे लागे, म्हशींचे दुध काढवे हि लागे आणि ताजे दुध प्यायलाही मिळे ...घरात पैसा कमी आणि आणि खाणारी तोंड जास्त होती त्यामुळे सगळ्यांना च दुध विकणे,कलिंगड विकणे, भात विकणे, अशी काम करावीच लागत.. बाबा तर चक्क बारा वर्षाचेअसताना शिक्षण सोडून घरातून बाहेर पडले होते.... आज त्यांच्या कडे बघून आजिबातच वाटत नाही ...कि त्यांनी शेती केली असेल, कुडाच्या घरात राहिले असतील, पाण्यासाठी,लोकांची बोलणी एकली असतील, बाबा ,काका लोक हे सगळ जेंव्हा सांगतात तेंव्हा त्यांच्या डोळ्यात सहज पाणी येत... 
                                        त्यांच्या ह्या सगळ्या कष्टातून शून्यातून वर आलेल्या जीवना कडे पाहिलं कि स्वतःच्या आल्हाद आयुष्याची कीव वाटायला लागते....आणि त्यांच्या कष्टाच्या पण निसर्गाच्या सानिध्यातगेलेल्या बालपणाचा हेवा वाटू लागतो....स्वतःच बालपण आठून पाहिलं तर थोडे फार खेळ आम्हीही खेळलो म्हणजे लगोरी, डब्बा एस पैस, डोंगर का पाणी वैगरे...पण मलासुद्धा मासे बघायचे असतील तर मार्केट मध्ये  मेलेले नाहीतर प्रदर्शनांमध्ये चौकोनी डब्यात ठेवलेल्या मश्यांवारच समाधान मानावं लागे.....माझ बालपण तरी बर होत..निदान खुली हवा तरी खायला मिळाली, पतंग तरी उडवता आला...डोंगरामागून येणारा सूर्य तरी पाहायला मिळाला...आत्ताच्या नव्या बालपणाच काय, एक तर त्यांना खिडकीतूनच बाहेर पाहावे लागते, इमारत सोडून खाली जाताच येत नाही कारण घराखाली कोंबड्यांनी भरलेल आंगण नाही तर फक्त भोंगे वाजविणाऱ्या गाड्यांनी भरलेला रस्ता असतो...हि नवी पिढी जरी चित्रात शाळेत शिकवल्याप्रमाणे डोंगरामागून येणारा सूर्य काढतात तरी त्यंना दिसणारा सूर्य हा उंच इमारती मागून येणारा असतो आणि खुली हवतर येतच नाही त्यासाठी तेरीस्वर जावे लागते ...यांना भेटणारे पक्षी, प्राणी फक्त पुस्तकातच कारण शहरांमध्ये सध्या चिऊ ती हि उरल्या नाहीत...मोबाइल च्या रेंजमुळे...साहजिकच आहे हसण्यासाठी ते कार्टून मधेच गुंतून पडणार .हल्ली कार्टून सुद्धा मोगली सारखे निसर्गाशी मैत्री सांगणारे नसतात...या नव्या पिढीचा सगळा वेळ जतो तो स्कूल आणि वेगवेगळे क्लासेस, कारण यांना पोहायला स्वच नद्याच उरल्या नाहीत उरले आहेत ते फक्त काळे नाले...ज्यात पाण्या एवजी केमिकलच उरल आहे वाहायला, साहजिकच आहे त्यांना पोहण्यासाठी डबके च बांधावे लागणार...आणि स्वतःच्या दोस्तांशीच स्पर्धा करावी लागणार अगदी लहानपाणापासूनच....पुढे जायचं असेल तर कोणाच्या तरी डोक्यावर पाय तुला द्यावाच लागेल हेच तर आहे हल्ली स्पर्धांच शिक्षण ज्याचे क्लासेस आपण आगदी बोलता हि येत नसत मुलांना तेंव्हा पासून लावतो.... प्रगतीच्या नावाखाली जे आयुष्य त्यांच्याकडून हिरावून घेतल जातंय त्याला कोण आहे जबाबदार???  
may 2013 mumbai choufer

झुगारायला हव घोडेछाप  जगण....


                                                       आई च्या पोटात असल्यापासून आपल्या डोक्यावर आघात होत असतो तो आई बाबांच्या भांडणाचा ... आई म्हणते  " माझा मुलगा इंजिनिअर होणार" " नाही तो डॉक्टरच होणार" बाबा आडवे येतात...अश्या या दोघांच्या वादात जन्माला येउन मोठे झालो तरी आपला भारीच गोंधळ राहतो कि काय करायचं??? आई बाबांचं आज्ञाधारक लेकरू असल्याने दहावी नंतर सायन्सच घ्याव लागणार आणि त्यासाठी  ८५ ९० च्या घरात टक्के मिळवावे लागणार, साहजिकच आहे, रट्टा मारून अभ्यास करावा लागणार....(अगदी रट्टा मारायला आवडत नसला तरी) हे अस अगदी ठरुनच टाकलेल असत त्या प्रत्येक मुलाने ज्याच्या मागे 'हुशार' नावाचं लेबल लावलेलं असत.....आई बाबा तर छोटा शिशु -मोठा शिशु पासून ''आमचा मुलगा पहिला नंबर काढतो हो'' अस गावभर सांगतच फिरतात आणि मग आपल्या कार्ट्याने आयुष्य भर पहिला नंबर काढावा म्हणून त्याला बैल जुंपतात त्याप्रमाणे अभ्यासाच्या रगाड्याला जुंपतात...तसा आई बाबांच्या मनात आपल्या मुलाने पुढे जाव मोठ व्हाव हाच हेतू असतो... पण घराच्या परंपरे नुसार डॉक्टर ,इंजिनिअर झाला, वर्षाला लाखाच्या घरात फी असलेल शिक्षण घेतल, ए सी असलेल्या कॉंलेज मध्ये गेला, आयुष्याची सहा सात वर्ष डिग्री पूर्ण करण्यात आणि केट्या सोडवण्यात, घालवली, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत,  याने लेकरू मोठ होत नाही....
                                                        मोठ होण म्हणजे नक्की काय याची व्याख्या आपल्या डोक्यात आधी स्पष्ट करून घ्यायला हवी...मोठ होन म्हणजे घरात ठेवता येणार नाही एवढा पैसा कमावण का? कि खूप काही तरी समाजउपयोगी काम करून समाजात मोठ स्थान निर्माण करण....यासंध्र्भात प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असणार...तरीही दहा वेळा विचार करून मोठ व्हायचं म्हणजे काय व्हायचय हे ठरल... आता कामाला लागा लिहिण्याच्या चांगल्या स्किल मुले जर आज पर्यंत वर्गात पहिले आला असाल तर तर तुमच लिहिण्याच स्किल महत्वाच आहे ना....८० च्या पुढे पडले तर इंजिनिअर, डॉक्टर अस काही तरी ७० च्या आत बाहेर मार्क असतील तर कॉमर्स, आणि त्याखाली असतील तर अप्र्यायास्तव आर्ट हि किती जुनी समज अगदी 'सु'शिक्षितांच्या हि मानसिकतेतून जात नाही...म्हणजे मानसिकतेच्या बाबतीत आपण अजूनही प्रगती केली नाही....आपली आवड  जर झाड लावण त्यांच्या जातींचा अभ्यास करण असेल तर का करू नये त्यामध्ये डिग्री???, अगदी आपल्याला जर चारोळी, किंवा काही तरी अफलातून लिहिता येतंय, नवीन कल्पना सुचत असतात तर आपण अगदी जाहिरात क्षेत्रात हि जाऊ शकतो, सध्याच्या काळात जर आपल्याला अगदी केस ह्या आपल्या अवयवाचा  जरी अभ्यास करायचा असेल तर त्याचा हि डिप्लोमा उपलब्ध आहे आणि तेही इथेच आपल्या मुंबईत.. आपल्यामधील छोट्याशा कौशल्याला जर आपण आपलं मोठ होण्याच साधन बनवलं तर आपल्याला आपल्या कामाचा कंटाळा देखील येत नाही आणि ' आयुष्यात जगायलाच भेटल नाही रे यार असा सरतेशेवटी येणारा विचार हि येत नाही.....जगात अस कोणत हि क्षेत्र नाही कि जे कमी दर्जाच किंवा त्याचा अभ्यास केल्याने काही फायदा नाही ...आपण ९० टक्के मिळून जेंव्हा आवड म्हणून आर्ट घेतो तेंव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीला आर्ट मधून पुढे खुल्या होणार्या असंख्य क्षेत्रांची माहिती देत यायला हवी...अनेकदा आपल्याला नाव नवीन क्षेत्रांची माहितीच नसते आणि त्याचा परिणाम पुढे 'सामान्य रटाळवाण जीवन' असा होतो ...
                                          आता सहज मनात आल असेल तुमच्या ' ते सगळ ठीक आहे पण पैसा मिळेल ना??? नाही तर आवडीच्या नादात पोट रिकामच राहायचं ...' जिथे कोणीही जात नाही त्या क्षेत्रात जर आपलं कौशल्य आजमावण्यासाठी आपण शिरलो, आणि नवीन काही तरी दिलं तर आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही....दुसर्याला हारवण्यासाठी स्पर्धा करण्यापेक्षा ...काही तरी नवीन पुढच्या पिढीला, समाजाला देण्याचा ध्यास ठेऊन स्वतःशीच स्पर्धा केलेली जास्त योग्य नाही का??? घरच्यांच्या हट्टा खातर केली इच्छांची आपण होळी आणि मनाविरुद्ध निवडल आवड नसलेलं क्षेत्र तर आपल्या सारख्या रट्टा मारून पास झालेल्या घोडेछाप लोकांना कोण देणार प्रवेश ते हि  खुर्चीला भर करण्यासाठी....त्यापेक्षा नाही झालो परंपरागत डॉक्टर,वकील, आणि खुशाल जगलो, आवडीच, स्वतःबरोबर समजला देखील पुढे देखील नेऊ शकलो, एखादा चांगला विचार निर्माण करू शकलो, संपूर्ण आयुष्यात थोडेसे जगलो माणूस म्हणून प्रेमाची, पोटाची गरज असलेल्या समाजासाठी, आपण जन्माचा येण्याचा आपल्या घरच्यांव्यतिरिक्त समजल देखील काही तरी उपयोग झाला     तर त्यातून मिळालेलं मोठेपणाला आणि त्या जगलेल्या क्षणांना  नक्किच पैश्यापेक्षा जास्त मोल आहे.....   
may 2013 mumbai choufer

पॉकेटमनी...

                          आय पी एल च्या चाललेल्या जोरदार बातम्या, आणि भारताच्या पराक्रमी वीरांनी केलेले उपद्व्याप या विषयांच जोरदार मंथन चाललेलं आहे.....आय पी एल हे सुरुवातीपासुनच वादाच्या भोवर्यात आहेच त्यात आता वाढत्या  फिक्सिंग च्या  प्रकारामुळे संपूर्ण भारतातच आश्चर्य, रागाने भरलेल्या अश्या उस्फुर्त प्रतिक्रिया एकू येत आहेत.....क्रिकेट प्रेमींचा हा प्रक्षोभ साहजिकच आहे....
                          त्याही पेक्षा भविष्यातील धोका जर टाळायचा असेल तर आपण थोडी आपल्या घरातल्या भविष्याची काळजी घेण गरजेच आहे .....हो  घरातल्याच भविष्याची...... आश्चर्य वाटल ना....पण नवीनच चालू झालेल्या फिक्सिंगमध्ये तरुण गुंतवत आहेत स्वतःची पॉकेटमनी ह्या बातमी मुळे अर्थातच नवीन धक्का बसतो ...
                            क्रिकेट हा भारतातील अतिशय लोकप्रिय खेळ तर आहेच.....अगदी अनुवंशिकतेने चालत आलेल्या आवडीसारखा....आणि पॉकेटमनी हि देखील आपल्या स्वतःच्या खर्चासाठी घरातून दिलेली आपल्या हक्काची रक्कम....जी आपण मजा करण्यासाठी, खाण्याच्या,परावसाच्या  इतर खर्चासाठी वापरतो ...आपला हा पॉकेटमनी आपण फिरण्यावर मजा करण्यावर किती हि उडवला तरी आई बाबा काही आपल्याला आरडा ओरडा करत नाहीत कारण त्यांचा एक आपल्यावर विश्वास असतो कि 'खर्च केला तरी कुठे करणार आहे खाण पिण मजा आणि खरेदी ..एवढ आसू दे ..वाईट तर काही करत नाही न मग झाल तर' ....आता आपण खरचं त्यांचा आपल्यावरचा विश्वास जपतो का हा विचार करण्याचा मुद्दा आहे .....आपल्याला घरच्यांनी दिलेलं पॉकेटमनी हे आई बाबाच्या कष्टाचा असतो हे आपण सोयीस्कर रित्या विसरतो जेंव्हा आपल्या मनातल्या जलद  पैसे कमवायच्या विकृती डोक वर काढू लागतात...आजूबाजूला चाललेला सट्टा, आणि पैशाठी लागलेली स्पर्धा, आणि ज्वलंत विषय म्हणजे आय पी एल आपसूकच आपल्याला आकर्षित करतो...पण वाईट गोष्ट हि कि आपण हि ते वाईट आहे माहित असताना त्याकडे आकर्षित होतो....आपल्या लाखात हि येत नाही कि आपण विकृती कडे वळतोय जी आपल हि आणि आपल्या कुटुंबाच हि आयुष्य बरबाद करेल......सध्या चालू आसलेल्या जोरदार घुसळणी वरून तरी आपण सावध होणे गरजेचे आहे.....निदान स्वतःच्या भविष्यासाठी .....आई बाबांच्या विश्वासासाठी.....आणि अति महत्वाच म्हणजे आई बाबानाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्या मुलांशी घनिष्ट मैत्री करणं आणि सतर्क राहण गरजेच आहे   
may 2013 mumbai choufer..

वाया चाललेलं तारुण्य ... 

                         तारुण्यावर अनेक कवींनी, कविता केआहेतल्या , चित्रकारांनी रंगांमधून तारुण्य दाखवील आहे, तारुण्य हा आपल्या आयुष्यातील  अति महत्वाचा टप्पा मानला जातो...तरुण्यास अन्यायाविरुध्द बंद करण्याच, प्रेम करण्याच, पाय घसरण्याच, कर्तुंव दाखवण्याच, मोठ होण्याच वय म्हणतात .....तारुण्य हे  प्रत्येकाच्या आयुष्यातलं महत्वाच वळण मानल जात जे स्फूर्तीने भारलेल, तल्लख,उत्साही, क्रियाशील,आणि चाणाक्ष मानल जात....आपण अगदी  विदुषी गार्गी, मैत्रेयी, शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, ल संभाजी महाराज, संत द्यानेश्वर,सावित्रीबाई आणि जोत्यीबा फुले , भगत सिंग, बाबासाहेब आंबेडकर...अश्या अनेक महान लोकांच्या तारुण्यातील कथा एकतो, आपल्याला अभ्यासातही त्यांच्या आयुष्यातील घटना धड्यांमध्ये होऊन गेल्यात,..हे सर्व महान लोक त्यांच्या तारुण्यत अगदी सर्व गुणांनी सप्पन असे होते...त्यांनी त्या त्या काळात सर्व चुइकिच्य गोस्तीना विरोध केला खूप शिकली हि सगळी मंडळी, आजूबाजूच्या लीकांमध्ये आपल स्थान निर्माण केल ..... "काय लावलाय तारुण्य म्हणजे हे तारुण्य  म्हणजे ते...यांनी हे केल त्यांनी ते केल...त्यांनी ते केल तर ठीक आहे न पण आम्ही काय करू मग हे सगळ आम्हाल का सांगितल जातंय"    
मला माहित आहे दोस्तांनो तुमच्या ह्याच प्रतिक्रिया असतील हे अस सगळ वाचल्यावर....
                         'वेक अप सिड' मुव्ही पाहिलंय?? हा तोच रणबीर कपूर वाला....त्याच मुव्हीवरून आठवलं .आपण पण खूपच आळशी, झोपाळू, झालो आहोत का??, आपल्याही मेंदूला गंज लागत चाललाय का आणि हे आपल्याला माहित आहे तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय???.....मला तर हल्ली असच वाटू लागल आहे....
किती वचन केली होती आईला, हा क्लास करीन तो क्लास करीन , पुस्तक वाचीन, सगळे सेमिनार अटेण्ड करीन पण दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही पहिले पाढे पंचावन्न....आपण तर अन्याय बिन्याय दूर करण लांबच साधा घरातला कचरा लोटण्याचे हि कस्ट घेत नाही.....ह्या तारुण्याच्या मोठ्या मोठ्या कवींनी रचलेल्या कवी कल्पनांमध्ये आपण तर मोडतच नाही...तस काही मित्र करतात कविता, गाणी, वैगरे, कोण कोणते क्लासेस पण तेवढच काय तें... अस काय....कशाच्या विरुध्द आवाज वैगरे कोणीच करत नाही हल्ली छे....मग आपणच का करा...त्या सुनील ने त्या दिवशी गावाला गेला होता तिथे त्याच्या दारू पिणाऱ्या बापाला म्हणे वठणीवर आणले....आणि कुठल्याशा स्त्रियांच्या आंदोलनात सामील झाला...हा तास मी पण केलाय एकदा...आण्णा हजारेंच्या आंदोलनात दिला होता मी खारीचा वाटा...म्हणजे फेसबुक पेजवर लाईक केल होत......दोस्तांनो मला तर आता सगळा माझा पळकुटेपाणाच वाटायला लागलाय... त्या कोल्ह्याच्या गोष्टीसारख द्राक्ष हातीनही लागत म्हणून आंबट ... काहीच कस करत नाही आपण.....टि.व्ही आणि वाट'स अप, एफ बी, कॉम्पुटर ह्या सगळ्यातून डोकच निघत नाही हल्ली आपल अगदी कंटाळा येतो तरी आपण तेच तेच खेळत बसतोय...तुम्हाला नाही वाटत का अस????
                            काय करू शकतो आपण? मी ठरवलय आता म सगळ्या घरातल्या जुन्या वस्तू घेणार आणि घरातल्याच वापरासाठी काही नवीन बनवता येते का तें करणार...मला चांगल चित्र काढता येत...मी आता माझ्या नवीन कल्पनांच्या जोरावर समाजात मेसेज देणारे चित्र बनवेन...असे अनेक लोक आहेत जे  वयाने ६० च्या पुढे पण मानाने मात्र खरे तरुण जे वंचित समाजासाठी काम करतात त्यांना भेटेन तसे हि ह्या वर्षी ४ दिवस मित्रांसोबत फिरायला जायचा प्लान होता तो पैसा इथे लावेन आणि माझा सगळ्यात मोठा,  थोडा पुढचा निर्धार म्हणजे ह्या वेळी मी आई बाबांना डोनेशन भरू देणार नाही ...जिथे डोनेशन घेत नाहीत तिथेच जाईन पण बाबांचे पैसे नको तिथे वय जाऊ देणार नाही..... कस वाटल प्लानिंग..आणि हो, हे मी खरचं करणार आहे ह्या वेळेला.... तुमच काय प्लान्निंग आहे???
may 2013 mumbai choufer

स्थलांतर 

                             "शी काय ह्या झोपड्या नुसत्या पसरतच चालल्यात, हल्ली....मागच्या दोन वर्षातच वाढल्यात ह्या...त्या वेद संकुल मध्ये चोर्या झाल्या नाही मागे ....इथलीच लोक करत असतील...कस्त नको करायला...आणि काय" " कमी आहे तर रोगराई वाढते ह्या झोपड्यांमुळे यांच्या मुळे आपल्याला त्रास...हातवट का नाहीत काय माहित...." अस आजूबाजूला नेहमीच ऐकायला मिळत.....आपण सो कॉल्ड 'सु' शिक्षित लोक नेहमी नाकाला रुमाल लावत ह्या प्रत्येक शहरांमध्ये वाढलेल्या झोपड्याकडे बघून तोंड वाकड करतो...पण एवढ शिक्षण घेतलेलं असताना आपण हा विचार का करत नाही कि प्रत्येक गोष्टी मागे, घटने मागे काही तरी कारण असते ह्या झोपड्या का तयार झाल्या असतील हि लोक इहे का राहायला आली असतील??? 
                              माणूस हा रानटी अवस्थेत असताना , मानवी संस्कृती नदीच्या काठी वाढत गेली...आणि पुढे तिचा विस्तार होत गेला... आज रेल्वे लाईन हि मानवाची लाइफलाईन झाली आहे....त्यामुळे स्त्लंतर करणारा प्रत्येक कुटुंब छत आणि चार भिंतींच्या गरजे मुळे, रेल्वे लाईन च्या बाजूला आपला तिथून उचललेला संसार आणून टाकतो....आता प्रश्न पडतो का करतात हि लोक स्थलांतर? आपण रोजच tv  वर पाहतो, दुष्काळ, हे स्थलांतराच मोठ कारण आहेच पण देशाच्या अनेक कोपर्यांमध्ये लोक पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी, धुनी भांडी, खाणकाम, अशी अनेक कष्टाची काम करत असतात, तिथे असलेल्या कुपोषण, मुख्य सुविधांची टंचाई,आणि जात, सावकार, अश्या असंख्य कारणांमुळे फक्त जगण्याची इच्छा घेऊन कुटुंबच्या कुटुंब आपली जनावर वैगरे विकून जन्म झालेलं गाव, सावकाराच्या ताब्यात गेलेलं घर,जमिनीचा तुकडा, सर्व अस्तित्व सोडून, आठवणी उराशी बांधून स्थलांतर करतात.. ..ते शहरांकडे...
                                  हे शहरांमध्ये स्थलांतर झालेले लोक....जरी शहरांमध्ये आले तरी आपल्याला माहितच आहे... शहरांमध्ये त्यांना चार भिंती आणि एक छप्पर मिळण किती मुश्कील होत असेल....आणि म्हणूनच हा पूर्वजांपासून चालत आलेला झोपडीचा सहारा( त्याच हि भाडं यांना द्यावा लागत असत, ज्या फुकटचे राहतात म्हणून आपण हिणवतो) ....जरी तिथली घुसमट, उघडा संसार वयात आलेल्या लेकीची, पोराची काळजी आई बापाला असते पण निदान दोन टायमाच खायला तरी मिळत असत, आणि निदान शिक्षण आणि दवा पाण्याच्या सुविधा तरी मिळत असतात...आणि हाच सामान्य विचार करून हि लोक स्थलांतर करत करतात....अश्या असंख्य कोपर्यातून जीवनाच्या व्यथा घेऊन आलेले हे सर्व समदुखी लोक कधी पुलाखाली, रेल्वे जवळच्या मोकळ्या जागांवर पत्री, पत्र्याच्या वस्त्या केलेले दिसतात...आपल्याला आवडणारे  अनेक खाद्यपदार्थ बनविणारे, गृहपयोगी वस्तू, इलेक्ट्रिक प्लग, पासून दुय्यम गरजेच्या सर्व वस्तू बनविणारे हात इथलेच असतात, इथे छोट्या हातांपासून म्हातार्या हातांपर्यंत सगळ्यांना काम कराव लागत.....तश्या पिण्याच पाणी, शोचालय, ह्या समस्या इथेही असतातच, पावसात तर प्रश्नच असतो झोपड्यात पाणी साचलाय कि झोपड्च पाण्यात बांधलाय... ह्या रस्त्यावरच्या आयुष्याला कुठलच संरक्षण नसत, आणि स्वयंसंरक्षणासाठी चे क्लासेस पण नसतात, तश्या अनेक वाईट गोष्टींचा इथे जन्म होतो तो..... फक्त परिस्थितीमुळे  .....पण मुद्दा असतो तो फक्त पोट भरण्याचा..म्हणूनच तर असते ना ही आयुष्याची सर्कस आणि पोटासाठीच स्थलांतर....              
may 2013 mumbai choufer..

फिक्सिंग एक वाळवीच...
 

                              " आरे न्यूज एकली का....श्रीशांत ला आय पी एल मधून काढला .." असे सारखे  मेसेज वर मेसेज....आय पी एल सध्या फोर्मात असताना ह्या खेळाडूंनी घोळ च घातला म्हणायचा....सगळ घर हल्ली सुट्टी असल्याने घरात बसून आय पी एल चा अंड लुटत असत...कमी आहेच तर आय पी एल सुरु व्हायच्या आधीच आय पी एल चा बजेट, खर्च, खेळाडूंच्या लावल्या गेलेल्या बोल्या, बदललेले युनिफॉर्म आणि त्याच्या वरचे ब्रान्ड्स, आणि मुख्य म्हणजे झाम्पिंग झापंग चे जोरदार वारे सुरु झालेच होते .....आणि तरुण वर्ग आय पी एल चा वेडा झालाच....आय पी एल चे स्टेडीअम तिथली गर्दी, लोकांच ओरडण, त्यांनी खरेदी केलेली लाईटवाली शिंग, झुझु चे मुकुट, भोंगे, टी शर्टस मलिंगाच्या केसंसारखा केसांचा विग हे सगळ पाहून आपणही तिथे जायल हव अस आपसूकच वाटायला लागत आणि आपण स्टेडीअंम च्या तिकिटांच्या चोकशी हि करतो...हि आहे आय पी एल ची धामधूमी.....
                                 स्पॉट फिक्सिंग च्या प्रकारानंतर आय पी एल चे तोटे पुन्हा बाहेर यायला लागले....आपले खेळाडू अस काही करू शकतात ....या गहन दुखाला धरून तरुणांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जातेय.....आय पी एल सुरु व्हायच्या आधी आय पी एल मुले होणार्या पैश्याच्या उधळपट्टी चा, एकच जागी साठणार्या पैशाचा सगळीकडून चांगलाच कीस पडला गेला पण कोणी ते मनावर घेतल नाही....आणि आय पी एल व्हायची थांबली तर नाहीच किंबहुना जास्तच जोरात झाली आणि आज.... फटाकेही फुटले....अनेक जुन्या खेळाडूंनी, समीक्षकांनी या प्रकारासंधर्भात आपली नाराजी व्यक्त केली, कोणाच मत होत ' यांसारख्या खेळाडूंवर कडक कारवाई व्हायला हवी ह्या भारताच्या प्रतिमेला काळिमा फासत आहेत, यांना फक्त आय पी एल नाही तर सगळ्या च माचेस मधून काढून टाकायला पाहिजे' ...तर कोणी म्हणत होत 'आय पी एल हा एक असा बिसनेस आहे ज्यामध्ये बघणाऱ्यांची लुट आणि पैसा गुंतवनारयांची चांदी नाही सोन आहे.....तरीहि खेळाडूंनी आवघ्या करिअरच्या सुरुवातीलाच अस पाउल  का उचलाव!!! क्रिकेटमधील खेळाडूंना मिळणाऱ्या गडगंज पैशाच्या किमती पाहून अनेक तरुण आणि तरुणांचे पालक ह्या  क्षेत्राकडे वळताना दिसतात ......
                                   आजच्या तीन श्रीशांत, अंकित चव्हाण, आणि अजित चंडीला ह्या भारतीय वीरांच्या   एका ओव्हरला ६० लाख(सत्तेबाजाकडून  ओव्हर फिक्स करण्यासाठी घेतलेल्या ) रकमा  अश्या पराक्रमामुळे अनेक गोष्टी उघडकीला आल्यात एकच नाही तर एकूण तीन माच फिक्स करण्यात आल्या होत्या आणि त्यात अगदी इशार्यांनी गोष्टी फिक्स केल्या होत्या.... 'डी' कंपनीचाहि  हात होता अस पोलिसांनी देखील उघडकीला आणलय.... ह्या प्रकाराच्या चर्चा रंगल्या असताना तरुणांमध्ये माच फिक्सिंग च देखील वेड  निर्माण होत असल्याच हि लक्षात येतंय ...जलद रित्या पैसा कमवायचा उत्तम उपाय अस तरुणाच देखील म्हणन आहे अस आढळतंय ..म्हणजेच फिक्सिंग ची हि वाळवी फक्त क्रिकेटच नाही तर तरुणाची मानसिकता ही पोखरते आहे....या वर लवकरात लवकर तरुणांनीच उपाय करायला हवा....    
may 2013 mumbai choufer..

खरे पिक्चर वेगळे आणि दाखवायचे पिक्चर वेगळे.....

                                    आपण ज्यांच्यावर सोलिड फिदा असतो, ज्यांची मंदिर बांधली जातात, ज्यांना  लोकांच्या मनापासून घरातल्या देव्हार्यांपर्यंत स्थान असत.....ते म्हणजे वर्षानुवर्ष तरुण दिसणारे, अन्यायाविरुद्ध लढणारे, फायटिंग करणारे(फक्त कॅमेरासामोरच) स्टारस, तरुणाच्या भाषेत हिरोस ....स्टारस, हिरोस ह्या त्यांना सुरुवातीपासून मिळत आलेल्या उपमा, आणि जोरदार लोकप्रियता...त्यांचे चाहते त्यांना दुसर्याच दुनियेतून आल्यासारखे समजतात....त्यांना खरोखरच आकाशातले तारे नाहीतर शक्तिमान सारखे लोकांना वाचवणारे हिरो समजतात....जी तरुणांची स्वप्ने असतात, ती स्वप्ने हे हिरोस सिनेमांमध्ये प्रत्यक्षात  करत असतात त्यामुळे साहजिकच तरुण वर्गाला ते भावतात...
                                      प्रत्यक्षात मात्र काही तरी वेगळच चित्र आहे.....कालची बातमी माहित असेल तुम्हाला...तरुण वर्गाचा फेवरीट संजूबाबा ला ३ वर्षाची शिक्षा...बातमी एकुन आवघा तरुण वर्ग हळहळला...जसा काही कोन महापुरुषावर घोर अन्याय होतोय...काय ड्रामा झाला होता अगदी रस्त्यावर संजय दत्त रडला काय, धडला काय, कदाचित ह्यावेळी वडील हि नव्हते चुकांवर पांघरून घालयला, आणि बाळासाहेब ठाकरे हि नव्हते वाचवायला...म्हणून त्याने प्रयत्न करून पहिला असेल स्वतःच्या ड्रामेबाजीचा काही उपयोग होतोय का??...तसा झाला हि होता परीनाम्तारून उसळले होते, विधानसभेतही काही तारयांनी अगदी गोंधळ घातला होता..त्याचं तर म्हणन हास्यास्पदच होत..  'संजूबाबा लोकांच्या मनावर राज करतो...त्याचा कामाचा काळी मोठा आहे त्याने खूप चांगल्या भूमिका वठवल्या आहेत त्यामुळे त्याला शिक्षा होण चुकीच आहे,  त्याला शिक्षा नाही व्हायला पाहिजे....ह्या ताऱ्यांचे संजूबाबा च्या बाजूचे सूर समजू शकतो कारण कितीही झाल तरी एका क्षेत्रातले.....पण अतिरेकी हल्ल्यांच्या वेळी रडारड करणाऱ्या जनसेवक नेत्यांच काय जे संजूबाबाला शिक्षा होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत....यांचा तर अतिरेक्यांपेक्षा अतिरेक.... कसाब, अफजल गुरु, अश्या अनेकांना फाशी देण्यात यावी यासाठी फेसाबुकच्या भिंती रंगवल्या गेल्या....मोर्चे ,सभा, सगळ्यांनी गरम तव्यावर आपआपल्या पोळ्या शेकून घेतल्या...अन भाड्याच्या टटटुनी चांगलीच वातावरण निर्मिती केली... या सगळ्यात  अफजल गुरु, कसाब, संजय दुत्त, आणि इतर अतिरेकी याचे गुन्हे सारखेच पण घरातल्या दयनीय परिस्थितीमुळे , गरजेसाठी, पैसंसाठी हि वाईट काम केलेले, जन्मठेपेची,फाशीची शिक्षा भोगणारे अतिरेकी, आणि संजुबाबासारखे चैन, आवड, आणि अंडरवल्ड मधील आपले संबध टिकावे म्हणून गुन्हे करणारे, आपल्या काळ्याकृत्यांच्या परिणामांची चांगली जाणीव  असलेले माजलेले हिरो, ज्यांना होते ती तुटपुंजी शिक्षा ती हि ते  कमी करत ,लांबवत नेतात...हा कुठला न्याय???? हे सगळे जनसेवक, जनतेचे हिरोस मिळून मिसळून   आपल्याला ह्या नशेत झुलत ठेवतात आणि आपले खिसे कापतात हे आपल्या कधी लक्षात येणार....या सगळ्यामध्ये असे tv  वरचे अनेक हिरो असतातच आणि हिरोइनस बद्दल काही बोलाव कि नाही हे पण काळात नाही कारण त्या तर फक्त शोपीस म्हणूनच वापरल्या जातात...आणि तरीही आपण तरुण खऱ्या अभिनय या कले एवजी...ह्या फसव्या स्वार्थी जगाकडे आकर्षित होतो ते हि तिथल्या झगमगटामुळे आणि पैश्यांमुळे....
                                    आपण ह्या सगळ्यात जेंव्हा गुंतून पडतोय, हे जग फसवं आहे हे माहित असताना त्याकडे आकर्षित होतोय तेंव्हा आपल्याला आईने लहानपणी दिलेल्या शिकवणी का नाही आठवत? आपल्याला आई बाबांनी दिलेल्या जन्माचा त्यांना पाछाताप होणार नाही याकडे तरुणांनी लक्ष द्यायला हव, कोणीही आपला वापर करून घेऊ नये यासाठी आपण जग राहायला हव.. आपल्याला कोणताही वाईट हव्यास स्वर्थी तर बनवत  नाही न......या साठी आपण नेहमी सजग राहायला हव आणि आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी डोळे उघडे ठेऊन विचार करायला हवा....    
may 2013 mumbai choufer

रागिंग........

                                  "घुसमट होतेय माझी तिथे , मी नाही जाणार परत होस्टेलला, नका न पाठू मला तिथे, त्या मुली घाणेरड्या आहेत, त्या मला त्रास देतात .....नका न पाठू मला परत तिकडे, मला नाही राहायच्य त्या होस्टेलला.."नेहा ला पाहताच निशी घडाघडा बोलू लागली , तिचे डोळे अत्यंत त्रासलेले, थकलेले दिसत होते, निशी हुंदके देऊन रडत होती... होस्टेल वरून आल्यापासून तीन दिवस कोपर्यात फक्त तंद्री लाऊन बसलेली निशी कोणाशीच काही बोलत नव्हती. घरातले प्रचंड घाबरले होते,चांगल्या वाईट अनेक शंका घराच्याच्या मनात येउन गेल्या.. आणि त्यामागे कारण होती स्वतः निशी कारण ती काही बोलायलाच तयार नव्हती....'काय असेल ते एवढ रागिंग म्हणजे??..थोडी फार थत्त ,तव्ल्या तर करतात...एवढ काय त्यात घाबरण्यासारख!!! का हि जास्तच भयानक थट्टा तर नसेल कि जी मनावर एवढा आघात करते????"
                                     रागिग.. म्हणजे एक प्रकारची मनाला जडलेली विकृतीच... जी मानवी मनातील वर्चस्व भावनेचा प्रत्यय देते...रागिंग म्हणजे एक प्रकारचा आसुरी आनंद आसतो जो दुसर्याला कमी लेखून मिळत असतो, आपण इतरांपेक्षा काही प्रमाणात वेगळे आहोत ,समोरच्या पेक्षा श्रेष्ट आहोत हे दाखविण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर केलेले मानसिक आघात , दुसर्याला त्रास देऊन, आनंद मिळवण्याची एक घाणेरडी प्रवृत्ती ,वाईट प्रवृत्ती.... three idiats, munnabhai M B B S  ह्या कोलेजमधील आयुष्यावर बनवलेल्या चित्रपटांमध्ये रागिंग हा विषय देखील हाताळण्यात आलाय....त्या चित्रपटावरून लक्षात येत कि रागिंग किंवा एखाद्याला त्रास देण्याची वृत्ती किती विकोपाला जाऊ शकते.....आणि आताची एका अनेक कलामध्ये बक्षीस मिळवलेल्या तरुणाची आत्महत्या रागिंग ह्या विकृतीचे परिणाम किती वाईट होऊ शकतात हे लक्षात येते ..... या आधी एखाद्या परीक्षेत नापास झाल्याने केलेल्या आत्महत्या अनेक ऐकिवात येत पण रागिंग मूळे केले आत्महत्या हि कोणाच्याही मनास चटका लावणारी ठरतेय.....
                                     रागिंग हे फक्त कोलेज मधेच चालत का ? तर नाही ऑफिसेस, अगदी घरामध्ये हि चालते रागिग ...आश्चर्य वाटल ना पण हो एखाद्याला त्याच्या मनाविरुद्ध चिडवण, नकारत्मक गोष्टी बोलून मानसिक खच्चीकरण करण, ठरवून एखाद्या व्यक्तीच्या प्रगती मध्ये आडथळा आणण, शारीरिक, मानसिक छळ  कारण हे सर्व रागिंग मधेच समाविष्ट होतात....एखादा अनाथ मुलगा नातेवाईकांकडून पळून जातो त्यामागे अनेकदा हीच कारणे असतात, ऑफिसेस मध्ये देखील अस रागिंग अएका सहा कराव लागत..बॉसची हिटलरशाही हि सगळीकडे पाहायला मिळते....त्या सोबतच बढतीसाठी दिला जाणारा त्रास, होणार्या स्पर्धा हे सगळ रागिग च असत... का निर्माण झाल्या असतील रागिंग सारखे प्रकार.....सतत स्पर्धा, आणि दुसर्याचे पाय खेच्याची दुसर्याला कमी लेखण्याची, दुसर्याला त्रास देऊ आनंद मिळवण्याची असुरी वृत्ती आपल्यामध्ये वाढायला  आपली विचार न करण्याची अंगवळणी पडलेली सवय तर कारणीभूत नाही ना याचा विचार हि आपण करायला हवा...आणि कृतीत बदल करून हि विकृती थांबवायला हवी नाही तर अनेक तरुणांना अश्या मानसिक विकृतीला आणि त्रासाला समोर जाव लागेल आणि देशाच भविष्य हि विकृतच जन्म घेईल...    
may 2013 mumbai choufer

मतांसाठी काय पण..


                                 मुंबईत लोकल ट्रेनचा प्रवास हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे ...लोकल ट्रेनच्या संबधित कोणताही मुद्दा असो, दर वाढवणे असो किंवा ट्रेनचे डब्बे वाढवणे असो ...रेल्वे सोबत होणार्या प्रत्येक घटनेचा थेट परिणाम पडत असतो तो दररोज ट्रेनने प्रवास करणाऱ्या सामन्यांवर म्हणजेच आपल्यावर...कदाचित सामन्यांसारखा प्रवास करून पाहावा ह्याच हेतू ने कि काय....राजकारणात ग्रेटच म्हणून ओळखल जाणार, त्यांच्या राजनीतीवर चक्क पुस्तक छापली गेली आहेत ,जे उत्तम जन संवादासाठी ओळखले जातात.. त्यांच्या अनेक उद्योगांमुळे त्याचं थोर मोठ्यांमध्ये खूपच  नाव आहे असे....केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार.....यांनी काही मिनिटांसाठी का होइना, फर्स्ट क्लास ने चक्क रविवारी सिक्युरिटीच्या भर गर्दीत प्रवास केला.....ठाण्यातील काही प्रगती संदर्भातील कामांनिमित्त आलेले पवारसाहेब मुंब्रा ते कळवा ट्रेनने आले...काही मिनिटांचा पवार साहेबांचा हा प्रवास...सगळ्या मुंब्रा कळवा भागात गर्दी करून गेलाच आणि ..तरुणांमध्ये काहीसी छाप पडून गेला...
                                   तसा नेत्यांचे ट्रेनचे प्रवास काही आपल्याला नवीन नाहीत या आधी हि राज्यकर्ते गांधी घराण्यातील सुपुत्र, तरुणांचे हितचिंतक, युवा नेते  राहुल गांधी यांनीही असाच पश्चिमरेल्वे मार्गाने प्रवास केला होता ..ज्याची सगळीकडे भारीच हवा पसरली होती .....आणि तरुणांमध्ये हि जोरदार चर्चा होती.....तशी ट्रेनच्या प्रवासात संवाद साधण्याची सुरुवात यांचीच ......त्यानंतर ठाकरे घराण्यातील मराठी तरुणाचे नेते, मराठी तरुणाचे उद्धारकर्ते राज ठाकरे यांनीही असाच विकास कामांच्या पाहणी साठी , मध्य रेल्वे मार्गाने ट्रेनचा प्रवास केला होता......
                                       तरुणांसंदार्भातील , सामान्यांसंदार्भातील या सर्व जनसेवकांचा  जिव्हाळा पहिला कि अगदी तरुणांमध्ये जोरदार तरुण नेत्यांचे वारे वाहू लागतात....तसेही यांच्या सभा आणि भाषणे, आश्वासने, याच वाटप-त्याच वाटप, मजुरीत केलेल्या अचानक ८% ने केलेला वाढी यांमुळे आपण वेडे झालेलोच असतो....त्यानंतर च्या यांच्या अश्या दोर्यांमुळे त्याचं सामन्यांमध्ये भारीच वजन तयार होत ...या सर्व जनसेवक, हितचिंतक, जन सामन्यांच्या तारणहारांचा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा असा जनतेबद्दलचा कळवळा पहिला कि प्रश्न पडतो....यांचा विचार काय असेल नक्की??? सामन्यांच जीवन थोडे क्षण जागून पाहूया? कि बरेच वर्ष झाले ट्रेनचा प्रवास केलाच नाही चला आज करूया..., जनतेसाठी काय पण.. कि मतांसाठी काय पण????                                      
may 2013 mumbai choufer

  गिरण्या नसलेल्या गिरगावचा फेरफटका.......

                                      आज 'गिरण्या नसलेल्या 'गिरणगावात चक्कर मारली आत्तापर्यंत फक्त कानावर असलेले गिरणी कामगार, त्यांची हक्कासंठीची चळवळ किंवा त्यांचे मोर्चे हे शब्द फक्त शब्द म्हणूनच माहित होते. आज ते गिरण्या असलेले गिरणगाव, आणि इतिहासजमा झालेल्या गिरणी कामगारांसंबधीतील   आठवणी प्रत्यक्ष अनुभवल्या.
                                        गिरणी कामगार आणि गिरण्यांची वाताहत याआधी थोडीफार परिचयाची होतीच  पण आज गिरणगावात फिरताना सत्तेसाठी हापापलेल्या ह्या राजकारणी लांडग्यांचे भक्ष ठरलेल्या असंख्य कामगारांना पोसणार्या त्या गिरण्यांचे आवशेष, त्या लांडग्यांनी तोडलेल्या लचक्यांची साक्ष देत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या बिटीडी चार माजली चाली आक्रोश करताना भासत होत्या, सांगत होत्या " बघून घ्या लेकरांनो गिरणगाव, काही वर्षांनी आवशेष देखील ठेवणार नाहीत हे लांडगे". अगदी खरच होता त्यांचा आक्रोश एकेकाळी दिवस-रात्र राबणाऱ्या गिरण्या जमीन दोस्त होत आहेत आणि त्या जागी उभे राहत आहेत ते सुखवस्तू मॉल, टोंवर्स, आणि अजून मोठी दरी, विषमता निर्माण करणारा एक 'गोल्डन क्लास' तेथे उभारी घेऊ पाहत आहे...
                                       एकेकाळी असंख्य कामगारांनी भरलेला रस्ता आता गाड्यांच्या वर्दळीने भरलेला दिसतो तो हि फ्लायओवरने दुभागालेला ....जसे गिरण्यांची जागा काचेच्या टोंवर्स ने घेतली तसे माणसांची जागा देखील ' माणसाच लेबल लावलेल्या माणूसपण हरवलेल्या रोबोट्स ने घेतली.गिरण्यावाचून आणि चाली शेवटच्या श्वास घेत असताना भर वर्दळीत गिरणगाव निर्मनुष्य, भकास वाटत होते...
                                       गिरण्यांच्या गावाच्या इतिहाची पानं उलटताना आम्ही मिनी कोल्हापूर आणि गिरणगावालगतच्या कोकणावर देखील नजर टाकली. आम्ही पावल टाकत होतो अस्प्स्त होत चाललेला गिरणगाव मनात साठवत. ते ऐतिहासिक गिरणगाव अनुभवताना आठवत होती ती नारायण सुर्व्यांची 'सत्य' कविता, ते गिरणी कामगारांच तडजोडवादी भकास आयुष्य ....आणि स्मशान जवळ आलं तरी हक्कासाठी लढणारे चिवट गिरणीकामगार ...गिरणगावाबरोबर मिरची गल्ली, भारतमाता टोंकीज, हनुमान नाट्यगृह, चिवडा गल्ली, शतायुषी इमारती सगळे काही पहिले. चहा आणि शिरापोहाचे ठेले आणि त्यांचे गिरणगावाशी असलेले ऋणानुबंधहि जाणून घेतले. ती सर्व ठिकाण गिर्न्गावाचा एक कालचा तहात सांगत होते.
                                        गिरणगावातल्या गिरण्यांच काम जाणून घेताना येथील कामगारांनी दिलेल्या मालकांविरुद्ध च्या विद्रीही संघर्ष एकूण अंगावर काटे उभे राहत होते पण दुसर्या बाजूला अतिसामान्य नागरिक मानवनिर्मित 'पाय्खेचू' जातींच्या दलदलीत रुतलेले होते आणि  त्यानुसारच कामे देखील वाटली होती हे ऐकून वाईट वाटत होत.....तसे एके काळी हि जाती धर्माची दलदल वाढवू पाहणाऱ्या कामगारांच्या नेतृत्वाचा आव आणणार्या शिवसेनेसारख्या जातीवादी धर्मवादी लांडग्यांच्या टोळ्या आजही कार्यरत आहेतच. भारतमाता(लालबाग) ते करीरोड स्टेशन असा गोल टाकलेला 'गिरण्या नसलेल्या गिरणगावाचा फेरफटका बरच काही सांगून गेला.
                                         गिरण्यांमुळे पाया धरू लागलेली स्त्री-पुरुष समता सांगून गेला, बंद पडलेल्या गिरण्यांमागची कामगारांच्या मुलांची भीषण अवस्था सांगून गेला, गिरणगावातले उत्सव सांगून गेला आणि कामगारांच्या मुलांची भीषण अवस्था सांगून गेला, आणि कामगारांच्या दोन दशके चालू असलेल्या आकंठ आक्रोशामागाची 'कडू' पण सत्य कथा सांगून गेला.....
may 2013 mumbai choufer 

मौज कि र्हास 


                   उन्हाळ्याची सुट्टी म्हंटली कि तरुणीचे सुरु होतात ते जोरदार प्लानिंग आणि ते हि वार्षिक परीक्षा सुरु व्हायच्या आधीच…. तस हे प्लानिंग आजचीच नाही तर जुन्या पिढयांपासूनच अगदी अनुवांशिक पणे  चालत आलाय …आणि हे प्लानिंग म्हंटले कि आपसूकच डोक्क्यात चमकणारे मुद्दे म्हणजे स्विमिंग क्लास, निसर्ग अभ्यास शिबीर, आणि ट्रेकिंग ….ट्रेकिंग म्हंटल तर जाग्या होतात सगळ्या जुन्या थ्रिलयुक्त  आठवणी डोंगर चढाई च्या , आणि तंबूत काढलेल्या रात्री धमाल, मस्ती सगळे सुंदर क्षण … असे प्लानिग बाबाही करायचे पण फरक इतकाच कि त्यांच्या प्लानिंग मध्ये वनभोजन, फळबागांची राखण, नवीन रोप लावणे हे उपक्रम असत…. 
                     आपणही येणारी सुट्टी योग्य प्रकारे मार्गी लावण्यासाठी जोरदार, आणि वेगळ प्लानिंग करत अस्तो…. त्यात ट्रेकिंग हा तर हल्ली तरुणाई चा वीक पॉइंतच झाला आहे… आणि आपल्याला तर १-२ माहीन्या च्या  सुट्टीत सगळ नवीन आणि जास्तीत जास्त जाणून घ्यायचं असत, अनुभवायचं असत, शिकायचं असत… आणि त्यासाठी असते ती जबरदस्त उमेद आणि इच्छा तरुण उरामध्ये भरलेली… आणि त्यासाठी आपण हमखास ४-५ दिवस काढतोच …. ह्या तरुणाच्या पसंतीचा वापर करून हल्ली ट्रेकिंग हा व्यवसायच झालाय… जश्या टुअर ऎजन्सि असतात तसे शहरांमध्ये लदाख, कान्याकुनारी हे देखील ट्रेक पॉइन्त झाल्यात…. आणि सधन घरातील तरुण अगदी ३-४ शून्यांच्या किमती अगदी सहज भरून एवढ्या दूर जातत… हल्ली मासे, झाड, पाणी दाखवायला देखील पालक सुट्टीतील शिबीर आणि प्रदर्शनाना   अगदी लहानपानापासूनच पाठवतात… 
                     ट्रेकिंगच, थ्रीलचा अनुभव घेताना, दोर्या लाऊन डोंगर चढताना, प्रदर्शनामध्ये पाण्याच्या डब्यात ठेवलेले मासे पाहताना, आपल्याला कधी प्रश्न पडलाय कि जर हे उंच ओबडधोबड, अवाढव्य  डोंगर नसते तर …हे डोंगर दर्यामधले झरे नसते तर …. बाबा जेंव्हा त्यांच्या तारुण्यात पोहायला, हुंदडायला जायचे तेंव्हा त्यांना नजर टाकतील तिथे मिळत होते सुंदर प्रदूषण विरहीत नद्या, आणि भली मोठे  मोठे चारही बाजूला डोंगर  … हल्ली आजूबाजूला पहिलं तर दूरदूर पर्यंत दिसतात डोंगर च्या डोंगर हलवून उभ्या केलेल्या फक्त इमारती उंचच उंच इमारती आणि नद्या शोधायला गेलो तर सापडतील भराव टाकून बुजवलेले, इमारतींखाली दाबले गेलेले, कोलश्याला लाजवतील इतके काळे नाले ज्यात हल्ली पाणी नाही तर फक्त केमिकलच वाहतंय … हे सगळ इतक विदारक चित्र पाहिलं कि वाईट वाटायला लागत कि आपल्याला झाड पाहण्यासाठी, डोंगर चढण्याचा थ्रिल अनुभवण्यासाठी, स्वछ्च पाण्यात मनसोक्त पोहण्यासाठी वर्षभराच्या कॉलेज च्या फी इतके पैसे एका वेळेला मोजावे लागले नसते.… याच्या आपण कधी विचार कि हा सगळा निसर्गाचा र्हास कोणामुळे होतोय?? कि आपल्याला हे सगळ दिसतंय तरीही आपण ह्या सत्याकडे  दुर्लक्ष कर्तोय….   
                   हा आपला पळकुटेपणा  आपण खूप स्वार्थी झाल्याचाच प्रत्यय पदोपदी येतोय ज्या तरुणाईने चौफेर विचार करायला हवा, चौकासतेने  खर खोट याचा शोध घ्यायला हवा तीच तरुणाई गुंतली आहे करिअर, पैसा, चैन, क्लास्सेस, स्पर्धा, आणि मौज ह्या भुलवणाऱ्या गुंत्यांमध्ये …. हा स्वार्थ आपल्याला निर्बुद्ध तर बनवत नाही न… आणि ह्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर लक्षात येत कि आपण इतके दिवस झोपलो तर नव्हतो …आपण मौजेच्या नावाखाली निसर्गाची आणि अदृश्य रित्या मानवाचा म्हणजेच स्वतःचाच र्हास करत नहि ना…. जर स्वतःचा, निसर्गाचा र्हास टाळायचा असेल तर यावर तरुणांनी विचार करायला हवा …. 
may 2013 mumbai choufer 

 जनसेवा कि दिखावा 
 



               २०१४ च्या निवडणुका वेशीवर येउन ठेपल्यात....आणि जनतेच्या नामधारी जनसेवकांची भंबेरी उडाली आहे.... रस्त्यांमधले  दिवे, डांबरीकरण, गटारांची बांधकामे, वाचनालये,चालू नसलेली बस सेवा, या सर्वांसाठी जास्तीत जास्त शून्याचा निधी उपलब्ध करून घेतला जातो, 'आम्ही वरच्या खुर्ची धारकांच्या  मागे लागून करून घेतो असे ह्या जनसेवाकांचे म्हणणे असते...'जणू जनतेसाठी काय पण' असा विचारच घेऊन आम्ही आलोय असे भासवतात...
                               गणेश मूर्ती शिळवायला त्रास होऊ नये म्हणून ६० अखांचा निधी उपलब्ध केला जातो, नदीच्या पुलाला लागून, सर्वात महागड्या सिमेंटचे ४ ठोकळे उभारले जातात ....आणी ४ महिन्यातच नवीन पूल बांधण्यासाठी (ज्या पुलाचा आराखडा २ वर्ष आधीच तयार केलेला आहे ) नवीनच बांधलेले ६० लाखांचे सिमेंटचे  ठोकले तोडले जातात.....
                                 डांबरीकरण केलेले ३-४ किलोमीटर चे रस्ते सुस्थितीत असताना देखील तोडले जातात कॉक्रीटीकरणासाठी  .......कॉक्रीटीकरणासाठी  लागणारे २-३ वर्ष लोकांच्या होणार्या गैरसोयीला काही महत्व नसते...त्याच वेळी गावातील जनतेला अत्यंत गरज असलेले आणी त्यांचे कॉक्रीटीकरण करणे सोयीचे असलेल्या अंतर्गत रस्त्यांची मात्र दुर्दशाच दुर्दशा ...
                                  जिथे पार्श्वभाग झाकायला मळक फडक मिळत नाही त्या जनतेचा प्रतिनिधी मात्र चार वर्षात अंग झाकायला कपड्यान ऐवजी सोन वापरतो....एकीकडे पाण्याच्या थेंम्बासाठी जनता तडफडते आहे.....आणी दुसरीकडे जनसेवक पाण्याचे टंकर च्या टंकर उत्सवांसाठी स्पॉन्सर करतात......गावातल्या पोरीवर बलात्कार होतो तेंव्हा जो जनप्रतिनिधी आरोपीच्या बाजूने उभा राहतो तोच महिला सबलीकरणाची ऐक दिवसीय शिबीर भरवतो....हळदी कुंकवाच्या नावाखाली सर्व स्त्रियांना एकत्र करून स्त्रियांनी काय करायला हवे, काय करायला नको यावर बोलण्यासाठी समाज अभ्यासक बोलावतो .....धर्मांचा आधार घेऊन,आणी जातीय अस्मिताना हात घालून लढवय्या संस्कृतीच्या नावाखाली जनसेवक खैरात करतात ती हत्यारांची, तलवारींची...म्हणजेच जिथे पाण्याची गरज तिथे हे तेल ओततात....
                                   जनसामान्यांची मानसिकता ओळखून हे पक्ष प्रमुख उभ करतात ते सामान्य जनते मधलच  एखाद बुजगावण, नाहीतर परंपरागत चालत आलेले गावातले VIP प्रतिनिधी म्हणून....निवडून आलेले हे जनतेचे प्रतिनिधी मूलतः वरच्या लोकांच्या ताताखाल्च मांजर.... यांच्या हालचालींच्या दोर्याच असतात वारच्यांच हातात ....पूर्वी पोटा मिळेल ते काम करणारा, कुठेही अस्तित्व नसलेला अतिसामान्य माणुस  जनप्रतिनिधी बनवला जातो .....पुढे खड्यात असलेल्या रस्त्यांवरून चार चार कोटींच्या आलिशान गाडीत फिरतो....प्रचाराच्या  रालीत दिसलेला हा जनप्रतिनिधी पुन्हा दिसतो तो पुढच्या निवडणुकांची जाग आल्यावरच.....
                                  घोडा मैदान जवळ आल्यावर जनसेवकांन आलेली ही जाग पाहून कधी कधी प्रश्न पडतात अंग झाकायला सोन्याचा वापर करून जनसेवक जनतेसाठी कापड तर वाचवत नाहीत ना ?.....भले जनतेला प्यायला पाणी मिळत नाही पण स्थानिक कंपन्यांना पाणी देण्यामागे जनसेवकांचा 'शहराची प्रगती होईल, मग कंपन्यांमुळे काळ्या पडलेल्या नद्या , कंपन्याच शुद्ध कारतील भले ती प्रगती उपभोगायला सामान्य  जनताच उरली नसेल '......असा काही दूरदृष्टीकोन तर नसेल?     "आमच्या गावातल्या सुधारणांसाठी आम्ही  ६० लाख ह्याला, २३ कोटी त्याला, १५ कोटी पुलाला एवढा खर्च केला भले त्यातली एकाच गोष्ट अस्तित्वात आहे कारण दुसर्या दोन तोडल्या नवीन काही तरी  बांधण्यासाठी" अस जन्सेवाकांना गर्वाने सांगता येईल म्हणून, किंवा "आमच्या गावातील स्त्रिया एका दिवसात सबळ झाल्या असे गोडवे गाता यावेत...सर्व तरुण हत्यार हाती घेऊन धर्मांध शिवाजी बनावेत असा काही उच्च हेतूनी तर नसतील न प्रतिनिधींनी  एवढा मोठा जनसेवेचा घाट घातला....
                            नियम तोडून हाणामारी करणारे..कायद्याचा चुकीचा वापर करणारे....नियम धाब्यावर बसवणारे....छुपी पाकीटमारी करणारे हे जनसेवक..
                             ह्या एवढ्या मोठ्या सुकार्यांमध्य, 'हे जनसेवक चुकीचे कि बरोबर' अशा  तर्कांमध्ये  अडकलेल्या पामरांचा मात्र गोंधळ उडतो कि हि जनसेवा कि दिखावा...
मे २० १ ३ मुंबई चौफेर 

दुष्काळ...निसर्गाच्या घशाला पडलेली कोरड....

                                     १५० वर्षाची परंपरा असलेलं बुलढाण्यातल भेंडवळच भाकीत खरच ठरायला हव अशी आहे सर्वच शेतकऱ्यांची इच्छा.....या वर्षी पाऊस उत्तम होणार सर्वी पिकं चांगल उत्पन्न करून देणार ह्या सारंगधर महाराजांच्या भाकीतान शेतकऱ्यांचा जीव अगदी भांड्यात पडलाय.....आता आपण म्हणणार काय असल्या भाकितांनी काय दुष्काळ जाणार आहे का'!!  'हि खेडवळ लोक कशावर पण विश्वास ठेवतात'... पण इथे भाकीत खरी कि खोटी असा प्रश्नच उरत नाही.....साध्या फक्त भाकीत खरंच व्हायला पाहिजे असाच विचार शेतकरी करणार कारण 'ज्याची जळते त्यालाच  कळते... '
                                     सध्या दुष्काळी प्रदेशांमध्ये चक्क ८-१० दिवसांनी १ टाकी पाण्याची मिळते त्यात घरात ६ ते ८ माणस, त्यात प्यायला, जेवणासाठी, गुरांसाठी, आंघोळी, कपडे भांडी धुण्यासाठी अस एवढ्या बाजूने पाणी पुरवावं लागत, इथे ८ दिवसांनी येणाऱ्या पाण्यात हि कोणी आंघोळ करायची यासाठी क्रम लावल्यात, लोक खाटे वर बसून अंघोळ करतात आणि खाटे खाली मोठी भांडी ठेवतात पाणी साठवण्यासाठी ते अंघोळी च सह्लेल पाणी कपडे नाही तर गुरांना पिण्यासाठी दिले जाते....काही गावात रोजगारासाठी सर्व पुरुष मुंबईत स्थलांतरित झाल्यात तर काही गावात कुटुंबाच्या कुटुंब स्थलांतरित झाल्यात गावच्या गाव ओसाड पडल्यात...काही गावात फक्त पुरुषच राहिल्यात सर्व स्त्रिया मुले आजोळी जाऊन राहिल्यात.....काही ठिकाणी पाण्याच्या समान आणि जास्तीत जास्त वाटपासाठी सरपंच आणि गावकर्यांनी अनेक छोटे छोटे पर्याय करून लेकर जागवायला घेतल्यात ...या दुष्काळा बद्दल जेवढ लिहाव तेवढ कमीच कारण यावेळचा दुष्काळ जर जास्तच वाईट आहे....दुष्काळ हा इथल्या शेतकऱ्याला नवीन नाही पण त्याचबरोबर दरवर्षीच्या कागदानावारचे  कोटीच्या आकड्यांचे निधी, आणि आश्वासन देखील नवीन नाहीत .....
                                        भाज्यांचे वाढलेले भाव पहिले कि आपल्या जीवाची तगमग होते पण आपण त्याच्या मागे काय कारण असेल याचा विचार देखील करत नाही...आपल्याला असे वाटते कि दुष्काळ ग्रामीण भागात च पडलाय पण दुष्काळ हा अप्रत्यक्षरीत्या आपल्यावर पण प्रभाव पडत असतो ....दुष्काळावरच्या रोजच्या बातम्या, A C मध्ये बसून झाडलेल्या चर्चा, निधींचे ५- ६ शून्य असलेले आकडे, ३-४ दिवसांचे दौरे करून दुष्काळावर बात ठोकणारे,  या सगळ्या भंपक पणाला भलतच उधाण आलाय....हे सगळ वातावरण बघून एक तर काही लोक कंटाळला असाल आणि काही लोकांच्या मनात काहूर माजलं असेल कि 'अरे काय करता येईल? ' निधी गोळा करून पाठवायचा का? कि पाण्याचे न गळणारे टंकरच  पाठवायचे? कि त्यांना पाण्याच नियोजन शिकवायला जायचं? अस वाटण साहजिकच आहे पण आपण ह्याचा विचारच केला नाही कि आपल्याला स्वतःहून जाऊन देत येणार का पाणी? आपण दिलेला निधी त्यांच्या पर्यंत पोहतोय का? त्यांची मूळ गरज सध्या पाणी असल्याने त्यांना आपण शिस्त किंवा नियोजनाचे धडे देऊन ते त्यांना सध्या महत्वाचे वाटतील का?...तर नाही आपण इथे बसून या सगळ्या गोष्टींची स्वप्नच बघू शकतो, त्या पेक्षा सोपा उपाय  म्हणजे....  आपल्याला थोडासा त्याग करावा लागेल... 'लयाला गेलेली, संपलेली जमिनीतल्या पोटातली पाण्याची पातळी.....आणि अर्थातच संपलेले जिमीनी वरचे पाणी...आणि त्याचे संपूर्ण आजूबाजूच्या निसर्गावर झालेले विपरीत परिणाम, म्हणजे दुष्काळ... त्या सर्व भागातील पाण्याची पातळी संपण्यासाठी आपल्या घरातील फ्लश,शोवर, २४ तास वाहणारे नळ आणि पाणी शिळ होत त्यामुळे टाक्या रोज खाली करायला हव्यात अश्या शहरांमधील अंधश्रद्धा, उत्सवांसाठी हजारो लिटरने ठिकठिकाणी खाली केलेले टंकर, शहरातील लाकडांची गरज भागवण्यासाठी संपवलेली जंगले आणि मुंबईतील मोठमोठ्या उद्योगांसाठी, पेयांसाठी केलेली पाण्याची लुटालूट  ......ह्या सगळ्या आपल्या पाण्याच्या निरर्थक उपस्यांमुळे ज्यांची धरण, ज्यांच्या जमिनींवर उभी राहिलेली धरण त्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्याच पाण्यासाठी तरसाव लागत, अगदी दुष्काळातच  नाही तर पावसळ्यात सुद्धा..... गावानालागून धरण पण नळ नाहीत त्यामुळे हा पाण्याचा त्रास १२ हि महिने चालूच आहे ...आता आपला छोटासा त्याग लक्षात आलाच असेल ...काही चांगल्या पाणी गरजे पुरता वापरायच्या योग्य सवयी लाऊन घ्यायला हव्यात शोवर, फ्लश यांचा वापर टाळायलाच हवा .....तर हि निसर्गाच्या घशाला लागलेली तहान आपण शमउ शकू.....आणि आटत चाललेली  माणुसकी जिवंत ठेऊ शकू..

                                                                                                                                      मुक्ती  
मे २ ० १ ३ मुंबई चौफेर 

दुष्काळ...निसर्गाच्या घशाला पडलेली कोरड....

                                     १५० वर्षाची परंपरा असलेलं बुलढाण्यातल भेंडवळच भाकीत खरच ठरायला हव अशी आहे सर्वच शेतकऱ्यांची इच्छा.....या वर्षी पाऊस उत्तम होणार सर्वी पिकं चांगल उत्पन्न करून देणार ह्या सारंगधर महाराजांच्या भाकीतान शेतकऱ्यांचा जीव अगदी भांड्यात पडलाय.....आता आपण म्हणणार काय असल्या भाकितांनी काय दुष्काळ जाणार आहे का'!!  'हि खेडवळ लोक कशावर पण विश्वास ठेवतात'... पण इथे भाकीत खरी कि खोटी असा प्रश्नच उरत नाही.....साध्या फक्त भाकीत खरंच व्हायला पाहिजे असाच विचार शेतकरी करणार कारण 'ज्याची जळते त्यालाच  कळते... '
                                     सध्या दुष्काळी प्रदेशांमध्ये चक्क ८-१० दिवसांनी १ टाकी पाण्याची मिळते त्यात घरात ६ ते ८ माणस, त्यात प्यायला, जेवणासाठी, गुरांसाठी, आंघोळी, कपडे भांडी धुण्यासाठी अस एवढ्या बाजूने पाणी पुरवावं लागत, इथे ८ दिवसांनी येणाऱ्या पाण्यात हि कोणी आंघोळ करायची यासाठी क्रम लावल्यात, लोक खाटे वर बसून अंघोळ करतात आणि खाटे खाली मोठी भांडी ठेवतात पाणी साठवण्यासाठी ते अंघोळी च सह्लेल पाणी कपडे नाही तर गुरांना पिण्यासाठी दिले जाते....काही गावात रोजगारासाठी सर्व पुरुष मुंबईत स्थलांतरित झाल्यात तर काही गावात कुटुंबाच्या कुटुंब स्थलांतरित झाल्यात गावच्या गाव ओसाड पडल्यात...काही गावात फक्त पुरुषच राहिल्यात सर्व स्त्रिया मुले आजोळी जाऊन राहिल्यात.....काही ठिकाणी पाण्याच्या समान आणि जास्तीत जास्त वाटपासाठी सरपंच आणि गावकर्यांनी अनेक छोटे छोटे पर्याय करून लेकर जागवायला घेतल्यात ...या दुष्काळा बद्दल जेवढ लिहाव तेवढ कमीच कारण यावेळचा दुष्काळ जर जास्तच वाईट आहे....दुष्काळ हा इथल्या शेतकऱ्याला नवीन नाही पण त्याचबरोबर दरवर्षीच्या कागदानावारचे  कोटीच्या आकड्यांचे निधी, आणि आश्वासन देखील नवीन नाहीत .....
                                        भाज्यांचे वाढलेले भाव पहिले कि आपल्या जीवाची तगमग होते पण आपण त्याच्या मागे काय कारण असेल याचा विचार देखील करत नाही...आपल्याला असे वाटते कि दुष्काळ ग्रामीण भागात च पडलाय पण दुष्काळ हा अप्रत्यक्षरीत्या आपल्यावर पण प्रभाव पडत असतो ....दुष्काळावरच्या रोजच्या बातम्या, A C मध्ये बसून झाडलेल्या चर्चा, निधींचे ५- ६ शून्य असलेले आकडे, ३-४ दिवसांचे दौरे करून दुष्काळावर बात ठोकणारे,  या सगळ्या भंपक पणाला भलतच उधाण आलाय....हे सगळ वातावरण बघून एक तर काही लोक कंटाळला असाल आणि काही लोकांच्या मनात काहूर माजलं असेल कि 'अरे काय करता येईल? ' निधी गोळा करून पाठवायचा का? कि पाण्याचे न गळणारे टंकरच  पाठवायचे? कि त्यांना पाण्याच नियोजन शिकवायला जायचं? अस वाटण साहजिकच आहे पण आपण ह्याचा विचारच केला नाही कि आपल्याला स्वतःहून जाऊन देत येणार का पाणी? आपण दिलेला निधी त्यांच्या पर्यंत पोहतोय का? त्यांची मूळ गरज सध्या पाणी असल्याने त्यांना आपण शिस्त किंवा नियोजनाचे धडे देऊन ते त्यांना सध्या महत्वाचे वाटतील का?...तर नाही आपण इथे बसून या सगळ्या गोष्टींची स्वप्नच बघू शकतो, त्या पेक्षा सोपा उपाय  म्हणजे....  आपल्याला थोडासा त्याग करावा लागेल... 'लयाला गेलेली, संपलेली जमिनीतल्या पोटातली पाण्याची पातळी.....आणि अर्थातच संपलेले जिमीनी वरचे पाणी...आणि त्याचे संपूर्ण आजूबाजूच्या निसर्गावर झालेले विपरीत परिणाम, म्हणजे दुष्काळ... त्या सर्व भागातील पाण्याची पातळी संपण्यासाठी आपल्या घरातील फ्लश,शोवर, २४ तास वाहणारे नळ आणि पाणी शिळ होत त्यामुळे टाक्या रोज खाली करायला हव्यात अश्या शहरांमधील अंधश्रद्धा, उत्सवांसाठी हजारो लिटरने ठिकठिकाणी खाली केलेले टंकर, शहरातील लाकडांची गरज भागवण्यासाठी संपवलेली जंगले आणि मुंबईतील मोठमोठ्या उद्योगांसाठी, पेयांसाठी केलेली पाण्याची लुटालूट  ......ह्या सगळ्या आपल्या पाण्याच्या निरर्थक उपस्यांमुळे ज्यांची धरण, ज्यांच्या जमिनींवर उभी राहिलेली धरण त्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्याच पाण्यासाठी तरसाव लागत, अगदी दुष्काळातच  नाही तर पावसळ्यात सुद्धा..... गावानालागून धरण पण नळ नाहीत त्यामुळे हा पाण्याचा त्रास १२ हि महिने चालूच आहे ...आता आपला छोटासा त्याग लक्षात आलाच असेल ...काही चांगल्या पाणी गरजे पुरता वापरायच्या योग्य सवयी लाऊन घ्यायला हव्यात शोवर, फ्लश यांचा वापर टाळायलाच हवा .....तर हि निसर्गाच्या घशाला लागलेली तहान आपण शमउ शकू.....आणि आटत चाललेली  माणुसकी जिवंत ठेऊ शकू..