जीवन फुलवणारा पाऊस आणि जीवन उध्वस्त पाऊस
" अगदी मी म्हणत होते न तसच झाल....मी म्हंटल होत न ह्यावेळी खूपच जास्त पाऊस पडणार आहे म्हणून".... खूप मोठा गड जिंकल्याच्या तोर्यात शेजारच्या जाधव काकू त्याचं भाकीत खर ठरल्याच सांगत आल्या, त्यांच्याशी चांगलच वाकड असलेली रिया त्यांच्या तोर्याला ठेचत म्हणाली'' अहो तुम्ही पाऊस पंधरा तारखेपर्यंतच पडणार, त्यानंतर एक थेंब हि पडणार नाही अस हि म्हणाला होतात, आणि पाऊस तर पंधरा तारखेनंतरच जास्त पडतोय..'' रियाने केलेला अपमान सहन न झाल्याने काकू मात्र नाक मुरडत घरात निघून गेल्या...पाऊस मात्र खरचं ऐकायला तयार नाही हे सतत जाणवत होत आणि उन्हाळ्यात बरेच दिवस वाट पहिल्याने दिवस रात्र कोसळणारा, रस्त्यावर संसार असलेल्या कुटुंबांच आयुष्य उध्वस्त करणारा( तसा पाऊस हे सासर उध्वस्त व्हायला जबाबदार आहे का? हा मोठा वादाचा विषय आहे) हा पाऊस देखील आपल्या स्वर्थी मनाला आनंद देऊन जातो, कारण कॉलेजपासून रेल्वे च्या ट्रक्स मध्ये, रस्त्यांवर पाणी साठत आणि त्यामुळे आपल्याला सुट्टी मिळणार असते...आपल्याला बाईकवर भिजत फिरायला, मक्याचा बुट्टा खायचा आनंद लुटायला, भजी खायला हक्काची सुट्टी मिळणार असते,...आणि अगदी त्याच्या उलट दिवस मजुरीवर काम करणार्यांना हि सुट्टी उपवास घडवणारी असते, पावसामुळे फुटपाथ हि सोडवा लागतो मग महिन्या महिन्याच्या चिलया पिल्यांना घेऊन पाऊस थांबेपर्यंत रस्त्याच्या कडेला उभे असलेले छोटे टेम्पोमध्ये , हातगाड्यांच्या खाली, पाईपलाईनच्या कामासाठी ठेवलेले मोठे गोल पाईप असे तात्पुरते आसरे शोधावे लागतात...असे आसरे हि त्याचा मालक हकालावत नाही तोपर्यंतच ... ह्या घनघोर पावसात 'भुकेसाठी जीव पण' अशी उदाहरण ह्या दोन दिवसात पाहायला मिळाली...सकाळी टी व्ही मध्ये बघून बाहेर पदाय्च्च कि नाही ते ठरवतो...त्याच बरोबर दोन हि दिवस दादर स्टेशन बाहेर डोफा डोफा भर तुंबलेल्या पाण्यात नेहमीची, वयाची ऐंशी गाठलेली म्हातारी आजी तशीच तुटलेल्या छत्रीच फाटलेल कापड सावरत, फुल लवकर विकली जावी म्हणून लोकांना हाक मारत फुल विकत पाण्यातच बसली होती, रोज दादर ब्रिजवर उभे राहून छोट्या गृहपयोगी वस्तू विकणारे डोळे नसलेले काका हि दोन्ही दिवस दिसले..अशी रोजची रस्त्यात प्रचंड उदाहरण दिसली आणि त्यांच्या कडे बघून का कोण जाणे खूप काही विचार हि डोक्यात कालवाकालव करून गेले...हि परिस्थिती बघून का? याच कारण काय? याला जबादार कोण? हे कधी बदलणार? कस बदलणार? असे प्रश्न हि मेंदू बधिर करायला लागले पण...हे विचार तेवढ्यापुरतेच....पुन्हा हे स्वार्थी मन बुडाल वर्षासहलीच प्लान्निंग करण्यातच ...
No comments:
Post a Comment