आपण आत्मकेंदी होतोय का???
पावसान इंट्री काय मारली अन सगळ जीवन विस्कळीत झाल... उकडतंय म्हणून पावसाची आतुरतेने वाट पाहणारे सगळे चाकरमानी दोन तीन दिवसातच पावसाला शिव्या घालायला लागले....हा अनुभव आहे दोन दिवस पावसात फिरण्याचा...मी हि त्यातलीच एक....आपल कॉलेज आणि पाउस एकत्रच सुरु होतात त्यामुळे पावसाचा आनंद आणि त्रास याचा चांगलाच अनुभव आपण तीन चार महिने घेत असतो...आणि त्यामुळे आपली अनेकदा भारीच चीडचीड होते..
या होणार्या त्रासावरुनच आठवलं तसा आपल्याला अनेक गोष्टींचा त्रास हा होत असतो त्यामध्ये नको त्या छोट्या छोट्या गोस्तींचाही आपल्याला भयंकर त्रास होत असतो... कल्याण स्टेशन पर्यंत पंधरा मिनिटांचा रस्ता पार करायला जेंव्हा काल ट्रेनने पाऊण तास लावला तेंव्हा अगदी गाडीत बसून असलेल्या लोकांना सुधा नकोस झाल होत आणि तीच गत ट्रेनची वाट बघत प्लाटफॉर्मवर थांबलेल्यांची झाली होती...त्याच एवढ्या भर पावसात, माश्यांच्या ताफ्यामध्ये एक पस्तीस चाळीसीची स्त्री स्टेशन वरील प्रतीक्षालायाच्या खिडकीमध्ये मुटकुळ करून गाढ झोपली होती, अंगावर संपूर्ण ठीगळानी भरलेली, रंग हि ओळखून येणार नाही इतकी मळलेली साडी अगदी कुठलीही पर्वा न करता झोपलेल्या त्या स्त्रीकडे बघून घरातल्या सुशिक्षित स्त्रियांनी त्यांच्या सुरक्षेसाठी काय करावे काय करू नये यावर झालेले ,प्रत्येक बालात्काराच्याप्रकारानंतर होणारे सेमिनार आठवले, चानेलपासून टपरीपर्यंत सगळ्याचा स्त्रियानविषयीचा कळवळा आठवला......कॉलेजच्या समोरच्या फुटपाथवर गेली सहा सात वर्ष घरात रहाव तशी फुटपाथवर राहणारी कुटुंब आठवली, पाठ्ठेबाबुराव रोड, ग्रांट रोड वर कोंबून कोंबून बसवलेली वस्त्या, पावसाळ्यात पाणी घरात शिरलाय कि यांनी पाण्यातच घर बांधल्यात असा प्रश्न पडावा अश्या वस्त्या आठवल्या, कोणत्याही प्रकारची ओळख, रेशनकार्ड, चेहराच नसलेली, गेली कित्येक वर्ष वेड्यासारखी एकाच कपड्यांवर आणि अतिशय घाणेरड्या अवस्थेत रस्त्यावर फक्त फिरताना आणि वेड्यासारखं बडबडताना ज्यांना पाहिलंय ज्याच तासनतास बोलण एकलय जे अतिशय विदारक आणि भयानक होत ती सारी लोक आठवत होती...आणि प्रचंड भेडसावत , सतावत होता तो त्यांच्या जिवंत असण्याचा प्रश्न....एखादी छोटी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर चार चौघात ओळख, कुटुंब, पैसा, धेय्य असणारे आपण मानसिक तणावात येउन आत्महत्येचा शेवटचा पर्याय निवडतो...म्हणजे कोणतीही ओळख नसताना, कोणीही तिच्या सुरक्षेसाठी झटत नसताना, जगतेय कशाला याच धेय्य नसताना जगणारी ती प्लाटफॉर्म वरची स्त्री नक्कीच जीवन जगण्याच्या स्पर्धेची विजेती आहे.
थोडक्यात काय तर, नको तेंव्हा जागा होणारा आपल्यातला समाजसेवकास a जे कधी माणसांमध्ये गृहीतच धरले गेले नाहीत, कायम दुर्लक्षित राहिल्यात असे हे होमलेस, परिस्थितीमुळे शेमलेस आणि फेसलेस लोक आजूबाजूला अगदी कोणताही बंड न करता जेंव्हा जगत असतात तेंव्हा आपल्याला डोळे, असतानाही ते का दिसत नाही किंवा योग्य अयोग्य ओळखण्याची समाज असताना आजूबाजूच्या अयोग्य परिस्थितीची जाणीव आपल्याला का होत नाही? आपण इतके ढिम्म का? त्यांच्या माणूस असण्याची, हक्काच्या छपराची जाणीव त्यांना कधी करून देणार ?? आपण आपल्याच आयुष्यात प्रचंड आत्मकेन्द्री होतोय का याचा प्रत्येकाने विचार करायला हवा...
No comments:
Post a Comment