Thursday, 20 June 2013

may 2013 mumbai choufer 

मौज कि र्हास 

                   उन्हाळ्याची सुट्टी म्हंटली कि तरुणीचे सुरु होतात ते जोरदार प्लानिंग आणि ते हि वार्षिक परीक्षा सुरु व्हायच्या आधीच…. तस हे प्लानिंग आजचीच नाही तर जुन्या पिढयांपासूनच अगदी अनुवांशिक पणे  चालत आलाय …आणि हे प्लानिंग म्हंटले कि आपसूकच डोक्क्यात चमकणारे मुद्दे म्हणजे स्विमिंग क्लास, निसर्ग अभ्यास शिबीर, आणि ट्रेकिंग ….ट्रेकिंग म्हंटल तर जाग्या होतात सगळ्या जुन्या थ्रिलयुक्त  आठवणी डोंगर चढाई च्या , आणि तंबूत काढलेल्या रात्री धमाल, मस्ती सगळे सुंदर क्षण … असे प्लानिग बाबाही करायचे पण फरक इतकाच कि त्यांच्या प्लानिंग मध्ये वनभोजन, फळबागांची राखण, नवीन रोप लावणे हे उपक्रम असत…. 
                     आपणही येणारी सुट्टी योग्य प्रकारे मार्गी लावण्यासाठी जोरदार, आणि वेगळ प्लानिंग करत अस्तो…. त्यात ट्रेकिंग हा तर हल्ली तरुणाई चा वीक पॉइंतच झाला आहे… आणि आपल्याला तर १-२ माहीन्या च्या  सुट्टीत सगळ नवीन आणि जास्तीत जास्त जाणून घ्यायचं असत, अनुभवायचं असत, शिकायचं असत… आणि त्यासाठी असते ती जबरदस्त उमेद आणि इच्छा तरुण उरामध्ये भरलेली… आणि त्यासाठी आपण हमखास ४-५ दिवस काढतोच …. ह्या तरुणाच्या पसंतीचा वापर करून हल्ली ट्रेकिंग हा व्यवसायच झालाय… जश्या टुअर ऎजन्सि असतात तसे शहरांमध्ये लदाख, कान्याकुनारी हे देखील ट्रेक पॉइन्त झाल्यात…. आणि सधन घरातील तरुण अगदी ३-४ शून्यांच्या किमती अगदी सहज भरून एवढ्या दूर जातत… हल्ली मासे, झाड, पाणी दाखवायला देखील पालक सुट्टीतील शिबीर आणि प्रदर्शनाना   अगदी लहानपानापासूनच पाठवतात… 
                     ट्रेकिंगच, थ्रीलचा अनुभव घेताना, दोर्या लाऊन डोंगर चढताना, प्रदर्शनामध्ये पाण्याच्या डब्यात ठेवलेले मासे पाहताना, आपल्याला कधी प्रश्न पडलाय कि जर हे उंच ओबडधोबड, अवाढव्य  डोंगर नसते तर …हे डोंगर दर्यामधले झरे नसते तर …. बाबा जेंव्हा त्यांच्या तारुण्यात पोहायला, हुंदडायला जायचे तेंव्हा त्यांना नजर टाकतील तिथे मिळत होते सुंदर प्रदूषण विरहीत नद्या, आणि भली मोठे  मोठे चारही बाजूला डोंगर  … हल्ली आजूबाजूला पहिलं तर दूरदूर पर्यंत दिसतात डोंगर च्या डोंगर हलवून उभ्या केलेल्या फक्त इमारती उंचच उंच इमारती आणि नद्या शोधायला गेलो तर सापडतील भराव टाकून बुजवलेले, इमारतींखाली दाबले गेलेले, कोलश्याला लाजवतील इतके काळे नाले ज्यात हल्ली पाणी नाही तर फक्त केमिकलच वाहतंय … हे सगळ इतक विदारक चित्र पाहिलं कि वाईट वाटायला लागत कि आपल्याला झाड पाहण्यासाठी, डोंगर चढण्याचा थ्रिल अनुभवण्यासाठी, स्वछ्च पाण्यात मनसोक्त पोहण्यासाठी वर्षभराच्या कॉलेज च्या फी इतके पैसे एका वेळेला मोजावे लागले नसते.… याच्या आपण कधी विचार कि हा सगळा निसर्गाचा र्हास कोणामुळे होतोय?? कि आपल्याला हे सगळ दिसतंय तरीही आपण ह्या सत्याकडे  दुर्लक्ष कर्तोय….   
                   हा आपला पळकुटेपणा  आपण खूप स्वार्थी झाल्याचाच प्रत्यय पदोपदी येतोय ज्या तरुणाईने चौफेर विचार करायला हवा, चौकासतेने  खर खोट याचा शोध घ्यायला हवा तीच तरुणाई गुंतली आहे करिअर, पैसा, चैन, क्लास्सेस, स्पर्धा, आणि मौज ह्या भुलवणाऱ्या गुंत्यांमध्ये …. हा स्वार्थ आपल्याला निर्बुद्ध तर बनवत नाही न… आणि ह्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर लक्षात येत कि आपण इतके दिवस झोपलो तर नव्हतो …आपण मौजेच्या नावाखाली निसर्गाची आणि अदृश्य रित्या मानवाचा म्हणजेच स्वतःचाच र्हास करत नहि ना…. जर स्वतःचा, निसर्गाचा र्हास टाळायचा असेल तर यावर तरुणांनी विचार करायला हवा …. 
may 2013 mumbai choufer 

 जनसेवा कि दिखावा 
 
               २०१४ च्या निवडणुका वेशीवर येउन ठेपल्यात....आणि जनतेच्या नामधारी जनसेवकांची भंबेरी उडाली आहे.... रस्त्यांमधले  दिवे, डांबरीकरण, गटारांची बांधकामे, वाचनालये,चालू नसलेली बस सेवा, या सर्वांसाठी जास्तीत जास्त शून्याचा निधी उपलब्ध करून घेतला जातो, 'आम्ही वरच्या खुर्ची धारकांच्या  मागे लागून करून घेतो असे ह्या जनसेवाकांचे म्हणणे असते...'जणू जनतेसाठी काय पण' असा विचारच घेऊन आम्ही आलोय असे भासवतात...
                               गणेश मूर्ती शिळवायला त्रास होऊ नये म्हणून ६० अखांचा निधी उपलब्ध केला जातो, नदीच्या पुलाला लागून, सर्वात महागड्या सिमेंटचे ४ ठोकळे उभारले जातात ....आणी ४ महिन्यातच नवीन पूल बांधण्यासाठी (ज्या पुलाचा आराखडा २ वर्ष आधीच तयार केलेला आहे ) नवीनच बांधलेले ६० लाखांचे सिमेंटचे  ठोकले तोडले जातात.....
                                 डांबरीकरण केलेले ३-४ किलोमीटर चे रस्ते सुस्थितीत असताना देखील तोडले जातात कॉक्रीटीकरणासाठी  .......कॉक्रीटीकरणासाठी  लागणारे २-३ वर्ष लोकांच्या होणार्या गैरसोयीला काही महत्व नसते...त्याच वेळी गावातील जनतेला अत्यंत गरज असलेले आणी त्यांचे कॉक्रीटीकरण करणे सोयीचे असलेल्या अंतर्गत रस्त्यांची मात्र दुर्दशाच दुर्दशा ...
                                  जिथे पार्श्वभाग झाकायला मळक फडक मिळत नाही त्या जनतेचा प्रतिनिधी मात्र चार वर्षात अंग झाकायला कपड्यान ऐवजी सोन वापरतो....एकीकडे पाण्याच्या थेंम्बासाठी जनता तडफडते आहे.....आणी दुसरीकडे जनसेवक पाण्याचे टंकर च्या टंकर उत्सवांसाठी स्पॉन्सर करतात......गावातल्या पोरीवर बलात्कार होतो तेंव्हा जो जनप्रतिनिधी आरोपीच्या बाजूने उभा राहतो तोच महिला सबलीकरणाची ऐक दिवसीय शिबीर भरवतो....हळदी कुंकवाच्या नावाखाली सर्व स्त्रियांना एकत्र करून स्त्रियांनी काय करायला हवे, काय करायला नको यावर बोलण्यासाठी समाज अभ्यासक बोलावतो .....धर्मांचा आधार घेऊन,आणी जातीय अस्मिताना हात घालून लढवय्या संस्कृतीच्या नावाखाली जनसेवक खैरात करतात ती हत्यारांची, तलवारींची...म्हणजेच जिथे पाण्याची गरज तिथे हे तेल ओततात....
                                   जनसामान्यांची मानसिकता ओळखून हे पक्ष प्रमुख उभ करतात ते सामान्य जनते मधलच  एखाद बुजगावण, नाहीतर परंपरागत चालत आलेले गावातले VIP प्रतिनिधी म्हणून....निवडून आलेले हे जनतेचे प्रतिनिधी मूलतः वरच्या लोकांच्या ताताखाल्च मांजर.... यांच्या हालचालींच्या दोर्याच असतात वारच्यांच हातात ....पूर्वी पोटा मिळेल ते काम करणारा, कुठेही अस्तित्व नसलेला अतिसामान्य माणुस  जनप्रतिनिधी बनवला जातो .....पुढे खड्यात असलेल्या रस्त्यांवरून चार चार कोटींच्या आलिशान गाडीत फिरतो....प्रचाराच्या  रालीत दिसलेला हा जनप्रतिनिधी पुन्हा दिसतो तो पुढच्या निवडणुकांची जाग आल्यावरच.....
                                  घोडा मैदान जवळ आल्यावर जनसेवकांन आलेली ही जाग पाहून कधी कधी प्रश्न पडतात अंग झाकायला सोन्याचा वापर करून जनसेवक जनतेसाठी कापड तर वाचवत नाहीत ना ?.....भले जनतेला प्यायला पाणी मिळत नाही पण स्थानिक कंपन्यांना पाणी देण्यामागे जनसेवकांचा 'शहराची प्रगती होईल, मग कंपन्यांमुळे काळ्या पडलेल्या नद्या , कंपन्याच शुद्ध कारतील भले ती प्रगती उपभोगायला सामान्य  जनताच उरली नसेल '......असा काही दूरदृष्टीकोन तर नसेल?     "आमच्या गावातल्या सुधारणांसाठी आम्ही  ६० लाख ह्याला, २३ कोटी त्याला, १५ कोटी पुलाला एवढा खर्च केला भले त्यातली एकाच गोष्ट अस्तित्वात आहे कारण दुसर्या दोन तोडल्या नवीन काही तरी  बांधण्यासाठी" अस जन्सेवाकांना गर्वाने सांगता येईल म्हणून, किंवा "आमच्या गावातील स्त्रिया एका दिवसात सबळ झाल्या असे गोडवे गाता यावेत...सर्व तरुण हत्यार हाती घेऊन धर्मांध शिवाजी बनावेत असा काही उच्च हेतूनी तर नसतील न प्रतिनिधींनी  एवढा मोठा जनसेवेचा घाट घातला....
                            नियम तोडून हाणामारी करणारे..कायद्याचा चुकीचा वापर करणारे....नियम धाब्यावर बसवणारे....छुपी पाकीटमारी करणारे हे जनसेवक..
                             ह्या एवढ्या मोठ्या सुकार्यांमध्य, 'हे जनसेवक चुकीचे कि बरोबर' अशा  तर्कांमध्ये  अडकलेल्या पामरांचा मात्र गोंधळ उडतो कि हि जनसेवा कि दिखावा...
मे २० १ ३ मुंबई चौफेर 

दुष्काळ...निसर्गाच्या घशाला पडलेली कोरड....

                                     १५० वर्षाची परंपरा असलेलं बुलढाण्यातल भेंडवळच भाकीत खरच ठरायला हव अशी आहे सर्वच शेतकऱ्यांची इच्छा.....या वर्षी पाऊस उत्तम होणार सर्वी पिकं चांगल उत्पन्न करून देणार ह्या सारंगधर महाराजांच्या भाकीतान शेतकऱ्यांचा जीव अगदी भांड्यात पडलाय.....आता आपण म्हणणार काय असल्या भाकितांनी काय दुष्काळ जाणार आहे का'!!  'हि खेडवळ लोक कशावर पण विश्वास ठेवतात'... पण इथे भाकीत खरी कि खोटी असा प्रश्नच उरत नाही.....साध्या फक्त भाकीत खरंच व्हायला पाहिजे असाच विचार शेतकरी करणार कारण 'ज्याची जळते त्यालाच  कळते... '
                                     सध्या दुष्काळी प्रदेशांमध्ये चक्क ८-१० दिवसांनी १ टाकी पाण्याची मिळते त्यात घरात ६ ते ८ माणस, त्यात प्यायला, जेवणासाठी, गुरांसाठी, आंघोळी, कपडे भांडी धुण्यासाठी अस एवढ्या बाजूने पाणी पुरवावं लागत, इथे ८ दिवसांनी येणाऱ्या पाण्यात हि कोणी आंघोळ करायची यासाठी क्रम लावल्यात, लोक खाटे वर बसून अंघोळ करतात आणि खाटे खाली मोठी भांडी ठेवतात पाणी साठवण्यासाठी ते अंघोळी च सह्लेल पाणी कपडे नाही तर गुरांना पिण्यासाठी दिले जाते....काही गावात रोजगारासाठी सर्व पुरुष मुंबईत स्थलांतरित झाल्यात तर काही गावात कुटुंबाच्या कुटुंब स्थलांतरित झाल्यात गावच्या गाव ओसाड पडल्यात...काही गावात फक्त पुरुषच राहिल्यात सर्व स्त्रिया मुले आजोळी जाऊन राहिल्यात.....काही ठिकाणी पाण्याच्या समान आणि जास्तीत जास्त वाटपासाठी सरपंच आणि गावकर्यांनी अनेक छोटे छोटे पर्याय करून लेकर जागवायला घेतल्यात ...या दुष्काळा बद्दल जेवढ लिहाव तेवढ कमीच कारण यावेळचा दुष्काळ जर जास्तच वाईट आहे....दुष्काळ हा इथल्या शेतकऱ्याला नवीन नाही पण त्याचबरोबर दरवर्षीच्या कागदानावारचे  कोटीच्या आकड्यांचे निधी, आणि आश्वासन देखील नवीन नाहीत .....
                                        भाज्यांचे वाढलेले भाव पहिले कि आपल्या जीवाची तगमग होते पण आपण त्याच्या मागे काय कारण असेल याचा विचार देखील करत नाही...आपल्याला असे वाटते कि दुष्काळ ग्रामीण भागात च पडलाय पण दुष्काळ हा अप्रत्यक्षरीत्या आपल्यावर पण प्रभाव पडत असतो ....दुष्काळावरच्या रोजच्या बातम्या, A C मध्ये बसून झाडलेल्या चर्चा, निधींचे ५- ६ शून्य असलेले आकडे, ३-४ दिवसांचे दौरे करून दुष्काळावर बात ठोकणारे,  या सगळ्या भंपक पणाला भलतच उधाण आलाय....हे सगळ वातावरण बघून एक तर काही लोक कंटाळला असाल आणि काही लोकांच्या मनात काहूर माजलं असेल कि 'अरे काय करता येईल? ' निधी गोळा करून पाठवायचा का? कि पाण्याचे न गळणारे टंकरच  पाठवायचे? कि त्यांना पाण्याच नियोजन शिकवायला जायचं? अस वाटण साहजिकच आहे पण आपण ह्याचा विचारच केला नाही कि आपल्याला स्वतःहून जाऊन देत येणार का पाणी? आपण दिलेला निधी त्यांच्या पर्यंत पोहतोय का? त्यांची मूळ गरज सध्या पाणी असल्याने त्यांना आपण शिस्त किंवा नियोजनाचे धडे देऊन ते त्यांना सध्या महत्वाचे वाटतील का?...तर नाही आपण इथे बसून या सगळ्या गोष्टींची स्वप्नच बघू शकतो, त्या पेक्षा सोपा उपाय  म्हणजे....  आपल्याला थोडासा त्याग करावा लागेल... 'लयाला गेलेली, संपलेली जमिनीतल्या पोटातली पाण्याची पातळी.....आणि अर्थातच संपलेले जिमीनी वरचे पाणी...आणि त्याचे संपूर्ण आजूबाजूच्या निसर्गावर झालेले विपरीत परिणाम, म्हणजे दुष्काळ... त्या सर्व भागातील पाण्याची पातळी संपण्यासाठी आपल्या घरातील फ्लश,शोवर, २४ तास वाहणारे नळ आणि पाणी शिळ होत त्यामुळे टाक्या रोज खाली करायला हव्यात अश्या शहरांमधील अंधश्रद्धा, उत्सवांसाठी हजारो लिटरने ठिकठिकाणी खाली केलेले टंकर, शहरातील लाकडांची गरज भागवण्यासाठी संपवलेली जंगले आणि मुंबईतील मोठमोठ्या उद्योगांसाठी, पेयांसाठी केलेली पाण्याची लुटालूट  ......ह्या सगळ्या आपल्या पाण्याच्या निरर्थक उपस्यांमुळे ज्यांची धरण, ज्यांच्या जमिनींवर उभी राहिलेली धरण त्या शेतकऱ्यांना मात्र त्यांच्याच पाण्यासाठी तरसाव लागत, अगदी दुष्काळातच  नाही तर पावसळ्यात सुद्धा..... गावानालागून धरण पण नळ नाहीत त्यामुळे हा पाण्याचा त्रास १२ हि महिने चालूच आहे ...आता आपला छोटासा त्याग लक्षात आलाच असेल ...काही चांगल्या पाणी गरजे पुरता वापरायच्या योग्य सवयी लाऊन घ्यायला हव्यात शोवर, फ्लश यांचा वापर टाळायलाच हवा .....तर हि निसर्गाच्या घशाला लागलेली तहान आपण शमउ शकू.....आणि आटत चाललेली  माणुसकी जिवंत ठेऊ शकू..

                                                                                                                                      मुक्ती  
मे २ ० १ ३ मुंबई चौफेर 

मातृ अवस्था दीन

                      ' आपली संस्कृती सांगते 'मातृ देव भवः' जन्म देणारी आई हि देव समान असते, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, आई असते जन्माची शिदोरी सरत हि नाही उरत हि नाही'...... हे आहेत मातृदिनाचे ठीक ठिकाणी गायले जाणारे गोडवे ....जे वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये भलतेच भाव खाउन जातात.... हाच स्पर्धे मध्ये भाषण ठोकणारा खाली बसलेल्या श्रोत्यांच्या टाळ्या मिळवणारा, भाषण शेवटी 'आता आईला मदत करणार ना...' असे एकदम छाप पडणारे प्रश्न विचारणारा,आणि आईच्या जीवावर बक्षीस मिळवणारा तरुण घरी गेल्यावर आईशी खरच भाषणात बोलल्याप्रमाणे वागतो का?... हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारून पहा...हमखास आपल भित्र, पळकुट मन उत्तर देत " अरे नाय रे माझ माझ्या आई वर जाम प्रेम आहे" पण कधी पर्यंत जो पर्यंत ती सगळ आयत हातात देते, जो पर्यंत ती चुका पोटात घालते, जो पर्यंत दुखाची, पैसैची झळ लागू देत नाही, जो पर्यंत तिच्यासाठी काही कराव लागत नाही, तो पर्यंत जो पर्यंत तिला बाबांची पेन्शन येतेय... लागतंय ना मनाला पण सध्यातरी हेच विकोपाला जात चाललेलं समाजातील सत्य आहे....
                            कोणी आपल्याला विचारल " तुझी आई काय करते?'' तर आपण सहज बोलतो "घरातच असते" पण खरच आई काहीच करत नसते का?? तर नाही घरात आई एवढ काम कोणीच करत नसत ते हि कर्तव्य समजून ( त्याबदल्यात कोणत्याच प्रकारची किंमत तिला नसते) जी आई पैसेही कमावते, ऑफिस ला जाते, शेतावर जाते, ती तर कामावर जायच्या आधी घराची स्वच्छता ,जेवण बनवून , मुलांची तयारी, त्यांना शाळेत पोहचून मग ट्रेनचा प्रवास, ऑफिस मध्ये काम, पुन्हा ट्रेनचा प्रवास घरी आल्यावर किंचित सुद्धा उसंत न घेता पुन्हा जेवण आणि सगळा रगडा हा असतोच तरीही ढासळत चाललेल्या प्रकृतीचीही चिंता न करता किंबहुना दुर्लक्षच करत आई हि फक्त जगत असते नात्यांसाठी आणि फक्त आई म्हणूनच.....तिला तीच स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही तिच्या कडे कोणी माणूस म्हणून पाहतच नाही ....एक साधा विचार केला तर लक्षात येत कि रोज प्रवास करून घरी आलेले आपण आई हक्काची गुलाम असल्यासारखे तिच्याशी किती वागतो आपण!!प्रत्येक गोष्टीत तिला किती कमी लेखतो आपण!! " आई तुला समजत नाय तर कशाला कटकट करते." "आई प्लीज मला माझी काम आहेत"."तू माझा विचारच करत नाहीस"." तू अशीच वागते नेहमी" हि आपली नेहमीची वाक्य  रोजच्या आई वरच्या उतू जाणार्या प्रेमाचा सहज प्रत्यय देतात ...जिथे बोलण्यातून आई च्या असण्याला सन्मान नसतो तिथ तिच्या भांडी धुण्याचा, कपडे धुण्याचा, जेवण करण्याचा भार हलका करून, तिच्या शारीरिक स्वास्थ्याचा, तिच्या वैचारिक प्रगती साठीच्या प्रयत्नांचा प्रश्न तर लांबच राहतो......
                                 मुळात जन्माआधी पासूनच समाजाने दुय्यम ठरवली गेलेल्या 'स्त्री' ला स्वतःच्या आयुष्याचे चांगले-वाईट निर्णय घेणेच नाकारले जाते अगदी तुला स्वतःचे निर्णय सुद्धा योग्य घेता येणारच नाहीत हे अगदी बिंबवल्यासारखे....मग त्यामध्ये जीवनसाथी निवडण्याचा असो किंवा गर्भ संधर्भात असोत....नवी बंधन(नाती) म्हणाली लवकर बाळ पाहिजे ती बाळ देणार,....सासू ,नवरा म्हणाला घराण्याला वारस पाहिजे ती वारस देईपर्यंत मुलीचे गर्भ चिरडत राहणार अगदी मशीन सारखी...इथे जरी तिला त्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं असल, जरी ती गर्भाला जन्म देणार असली तरी तिचा निर्णय काय याचा प्रश्नच येत नाही.... 
                                हल्ली तर आईवरच प्रेम दाखवण्यासाठी facebook , wat's up सारख्या माध्यमांमुले इमाजेस, फोटोस, मेसेजेस, मातृप्रेम कविता यांची चांगलीच चलती आहे, ते हि सीजन नुसार mothersday week मधेच...मग कधी कधी तिलाही खंत वाटत असेल कि ज्या आईने मरणप्राय त्रास सहन करून जन्म दिला,जी आयुष्यभर झटतेय तिच्या पिल्लांसाठी तिच्यावरच्या प्रेमाचा उत्सव फक्त दिवसापुरताच आणि तोही एकमेकांना शुभेच्छा देण्यापुरताच मर्यादित .....प्रत्यक्ष कृतीत 'मात्र मातृ अवस्था दीन'...

                                                                                                                                   मुक्ती 
मे २०१३  मुंबई चौफेर 

काय असेल त्या चिमुकल्या जीवात.......

                              “काय असेल त्या ४ वर्षाच्या चिमुकल्या शरीरात आणि निरागस जीवात कि ,बापाच्या वयाच्या माणसाची वासना जागृत व्हावी?” अगदी परवा-तेरवाची गोष्ट एका पाठोपाठ एक स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या बातम्या ‘ह्या’ अजून दुय्यमच आहेत आशी ग्वाही देत धडकल्या, आणी मेंदूवर आदळल्या मग नेहमीच्याच झालेल्या अमानुष अत्याचारांच्या बातम्यांसोबातच्या नेहमीच्या का? कशासाठी? चे शुष्क, कोरडे प्रश्नांचा झंझावात जोरदार सुरु झाला.
                एकतर्फी प्रेमातून झालेल्या ऑसिड  ह्ल्ल्यांच्या बातम्या नेहमीच्याच झाल्यात आहेत हल्ली...  त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय तर “ती कारटीचं ‘वाया गेलेली’ असेल, “ही आज कालची प्रेमाबिमाची थेर, मग नडतात आशी”, आज कालच्या पोरी सगळ्या ‘कॅरेक्टरलेस’, 'पोरींना नुसती नाटवेगिरी करत हिंडायला पाहिजे", "बाईच्या जातीनं कसं जरा मर्यादेत राहव”, ह्या आश्या वाक्याचे तर कधी कधी आर्थच लागेनासे होतात. का ‘ती’लाचं ‘कॅरेक्टरलेस’ ही पदवी? का ‘ती’नेच सगळ्या मर्यादा पाळाव्या? का तिने कोणावर प्रेम करू नये? का ‘ती’ने मोकळा श्वास घेऊ नये, का ‘ती’ला ‘नाही’ म्हणण्याचा अधिकारच नाकारला जातोय.....
                समाज काळजी पोटी बोलतोय ना मग होऊ दया ना 'ती’ला’ सबळ जगू दया स्वछंद आगदी तिला हव तसं, तुम्ही कोण ठरविणारे कि “तिला निर्णय घेता येत नाहीत म्हणून” ह्या पुरुषसत्तेनेच तिची निर्णय क्षमता खुंटवली आणि केली चाकोरीबद्ध ह्या खुंटीत मानसिकतेत कारण पुरुष सत्तेलाच नकोय ‘ती’ स्वछंद, निर्णयक्षम, ह्या पुरुष सत्तेल भीती आहे, ‘ती’च्या वरची मालकी ती झुगारेल, उत्तुंग भरारी घेईल, जाती धर्माची चौकट तोडेल, पुरुषसत्तेविरुद्ध बंड करेल, जाती धर्माची निरर्थक, जाचक बंधन ती तोडेल आणी तीचं हे माणूस बनण या ढोंगी समाजाला आणि पुरुषसत्तेलाच नकोय.
               आश्या असंख्य “कळ्या” ज्यांना आजून स्वताचं आस्तित्वच माहित नाही, आशा घाणेरड्या लैंगिक अत्याचारांनी कुस्करल्या जात आहेत, कुटुंबंतर्गत बालात्कारांनी, आत्याचारांनी चिरडल्या जात आहेत. आणि फक्त यांची पुरुषसत्तेत गुंडाळलेली अब्रू, इज्जत सांभाळण्यासाठी त्यांचा आक्रोश दाबला जातोय, समाजाकडून त्या फेटाळल्या जात आहेत, हिणवल्या जात आहेत मग न्याय तर लांबचीच गोष्ट राहिली. थोडा फार  आक्रोश व्हायला लागला... हा गुन्हा, ह्या बातम्या वर यायला लागल्या (तोही फक्त वर्तमान पात्रांच्या ३-४ पानावर आणि न्यूजचायनालवर शुल्लक  वेळे साठी .) तरीही लोकांना सततच्या, रटाळवाण्या आणि पालकांना मुलाना बिडघावणाऱ्या वाटू लागल्या ह्या बातम्या, समाज हे ओंगाळवाण सत्य पोटात घालू पाहतायत, दुर्लक्ष करू पाहतायत .....का?
                स्त्रियांच्या छेडछाडीमुळे आत्मह्त्तेचा आकडा १ हजार १६०  इतका वेगाने वाढतो आहे. 'ती' दिवसेंदिवस नागवली जात आहे. स्त्रीवर झालेल्या लैंगिक आत्याचार मागे पुरुषी वासना तर असतेच, पुरुषसत्ता गाजवणे हा मुख्य हेतू आसतो. स्त्री ही प्रत्येक कुटुंबातील दुखती नस म्हणून, प्रगती करू पाहणारी गौण जातीतली स्त्री चिरडणे हा जातीव्यवस्थेतील, समाजातील, उतरंडीचा सत्ता दर्शविण्याचा आधीनियमच बनला आहे.....किव येते मग आश्या विकसनशील भारतातल्या 'सु'शीक्षित समाजाची .... जगण शोधत धावपळीत जखडलेल्या (जखडवलेल्या ) माणसातला माणूस गोठ्लेल्या (गोठवलेल्या ) चालत्या बोलत्या प्रेतांची कीव येते.... मग पुन्हा भेडसावतो गहिवरून टाकतो शुष्क, कोरडा प्रश्न काय आसेल त्या ४-६ वार्षाच्या चिमुकल्या जीवात  कि बापाच्या वयाच्या माणसाची वासना जागृत व्हावी?
                                               ....मुक्ती 
गेल्या मे महिन्यापासून म्हणजेच दीड  झाला मी ' मुंबई चौफेर ' ह्या मराठी दैनिकामध्ये रोज ( रविवार वगळता ) लेख लिहित आहे ते लेख इथे पुन्हा पोस्ट  करतेय………